· फंड घराणे – बडोदा बीएनपी पारिबा म्युच्युअल फंड

· फंडाचा प्रकार – इक्विटी फंड

Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क

· फंड कधी लॉन्च झाला ? – २३ सप्टेंबर २००४.

· एन. ए. व्ही. (१९ जानेवारी २०२४ रोजी) ग्रोथ पर्याय – १८३ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता (३१ डिसेंबर २०२४ रोजी ) – १६९३ कोटी रुपये.

· फंड मॅनेजर – जितेंद्र श्रीराम.

फंडाची स्थिरता ( ३१ डिसेंबर २०२४ )

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन १३.७५ %

· बीटा रेशो ०. ९४

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडापेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे. उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२ % परतावा मागच्या पाच वर्षांत दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशनचा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षांत फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

हेही वाचा – अझीम प्रेमजींकडून विप्रोचे १ कोटी समभाग ‘गिफ्ट’

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

भारताचा पुढच्या दहा ते पंधरा वर्षांतील प्रगतीचा आलेख बघता सध्या दर्जेदार व्यवसाय असणाऱ्या कंपन्यांना सुगीचे दिवस येणार हे निश्चित आहे आणि म्हणूनच लाटेवरील मिडकॅप आणि स्मॉलकॅपपेक्षा लार्ज कॅप कायमच फायदेशीर असतील असे फंड मॅनेजरचे धोरण सांगते.

कोणत्या कंपन्या निवडायच्या ? सरकारी धोरणाचा कमीत कमी धोका टाळून ज्यांचा व्यवसाय देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुरक्षित आहे त्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे फंड मॅनेजरचा कल आहे. ‘ग्रोथ एट रिझनेबल प्राइस’ (GARP) या मॉडेलचा वापर फंड मॅनेजर करताना दिसतात.

कंपनीवर कर्जाचा डोलारा असलेल्या कंपन्या फंड मॅनेजर पसंत करत नाही असे दिसते. पुढील एक ते दोन वर्षांत डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर, जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे व्यवसायामध्ये झालेले बदल आणि भारताची वाढती उत्पादनक्षमता यावर आधारित कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असाव्यात असा फंड मॅनेजरचा प्रयत्न आहे.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

१९ जानेवारी २०२४ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· एक वर्ष – २५.७६ %

· दोन वर्षे – १२.९२ %

· तीन वर्षे – १५.९१ %

· पाच वर्षे – १७.०६ %

· दहा वर्षे – १५.७६ %

· फंड सुरु झाल्यापासून – १६.२३ %

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

३१ डिसेंबर २०२३ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार पोर्टफोलिओमध्ये ४८ शेअर्सचा समावेश करण्यात आलेला आहे व यातील लार्ज कॅप ६३ % तर मिड आणि स्मॉल कॅप १३ % आहेत.

एचडीएफसी बँक ८ %, आयसीआयसीआय बँक ७ %, रिलायन्स ६ %, लार्सन ५%, टाटा कन्सल्टन्सी ४ %, आयटीसी ३ %, इन्फोसिस ३ %, कोटक महिंद्रा बँक २.४३ %, भारती एअरटेल २ % मारुती सुझुकी २ % हे ‘टॉप-१०’ शेअर्स पोर्टफोलिओमध्ये आहेत.

हेही वाचा – ८ लाखांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर लागणार नाही का? बजेटमध्ये मिळू शकते आनंदाची बातमी!

कोणत्या क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक केली आहे ?

पोर्टफोलिओचा सर्वाधिक हिस्सा खासगी बँकांचा असून १८ % गुंतवणूक या क्षेत्रात केली आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर १० % रिफायनरी ६ % इंजिनिअरिंग आणि बांधकाम उद्योग ६ % एफएमसीजी, वाहन उद्योग ५ % असा पोर्टफोलिओ आहे.

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

· एक वर्षापासून एसआयपी केली असती तर ३७. १५ %

· दोन वर्षे २४. १३%

· तीन वर्षे १८. ९ %

· पाच वर्षे १९. ०१ %

· सलग दहा वर्ष १४. ७१ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

  • नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षांच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.