आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन, समजून घेऊया आपल्या कुटुंबाच्या भविष्य उभारणीमध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा असलेल्या महिला वर्गाच्या गुंतवणूक निर्णयांविषयी.

आपल्या समाजात महिलांचे स्थान बदलत चालले असले तरीही आर्थिक निर्णय घेण्यात अजूनही महिलावर्ग तितकासा आघाडीवर नाही. घरात मिळालेला पैसा काटकसरीने आणि निगुतीने खर्च करणे हे काम भारतीय महिलांनी वर्षानुवर्ष चोख केलेले असले तरीही आता गरज आहे ती स्वतःचा पैशाचा आराखडा तयार करण्याची.

man lose over rs 20 lakhs in fake stock market trading scams
शेअर ट्रेडींगमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेबावीस लाखांची फसवणूक
11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
BJP spent 38 crores in online advertisements in three months
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च; ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ

स्मार्ट बना आणि खर्च ओळखा

गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन दर महिन्याला आपल्या हातात किती पैसे येतात आणि त्यातले किती पैसे नेमक्या कोणत्या कारणासाठी खर्च होतात याची पक्की आकडेवारी आपल्या हातात असायला हवी. आजकालच्या स्मार्टफोनच्या जमान्यात हे अगदी सहज शक्य आहे. त्यामध्ये ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून खर्चाचे वर्गीकरण करता येते. त्यामुळे अनावश्यक खर्च कोणते? आवश्यक खर्च कोणते? याचा हिशोब मांडता येतो. जर ही पायरी पार केली तर गुंतवणुकीसाठी किती पैसा शिल्लक आहे याचा विचार करता येईल.

हेही वाचा… Money Mantra : फंड विश्लेषण: एचडीएफसी मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड

आपल्या पगारातील किती टक्के पैसा आपल्यासाठी ?

ज्या घरांमध्ये महिला नोकरी करतात आणि त्यांनी आपल्या कुटुंबासाठी स्वतःचे वैयक्तिक निर्णय बदलून नोकरी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना आपल्या भविष्यासाठी पैसे साठवण्याचा अधिकार मिळतो का याचा विचार करा. तुम्ही कमवत असलेल्या पगारापैकी किमान पाच टक्के पैसे तुमच्या स्वतःसाठी म्हणजेच स्वतःच्या आर्थिक भविष्यासाठी बाजूला काढा.

न टाळता येण्याजोगे खर्च आणि टाळता येण्याजोगी खर्च कोणते हे आपल्याला समजले तरच अनावश्यक खर्च कमी करता येतात.

नवीन लग्न झालेल्या मुलींनी आपल्या जोडीदाराबरोबर पैशाशी होणारे सर्व व्यवहार खुलेपणाने डिस्कस करावेत व कुटुंबाचा एक प्लॅन तयार करावा यामुळे आर्थिक निर्णय घेणे सोपे जाते. तुम्ही बाळाचा विचार (कुटुंब नियोजन) करत असाल तर त्या दृष्टीने आपल्या गाठीशी किती पैसे आहेत ? याचा विचार नवीन लग्न झालेल्या जोडप्याने करायला पाहिजे आणि यामध्ये त्या स्त्रीचा वाटाही तितकाच महत्त्वाचा असतो याची सुरुवात स्त्रीकडूनच झाली पाहिजे.

महिलांसाठी आरोग्य विमा अधिक महत्त्वाचा

बदलत्या जीवनशैलीनुसार भारतीय समाजामध्ये असलेले आरोग्यविषयक प्रश्न बदलताना दिसतात. अधिक उत्पन्न मिळायला सुरुवात झाल्याने जंक फूड खाण्याची वाढती सवय, व्यायामाची कमतरता, घरकाम आणि ऑफिस मधील काम यांच्यात बॅलन्स साधताना उडणारी तारांबळ व त्यामुळे निर्माण होणारा ताण या दृष्टीने तुमच्याकडे पुरेसा आरोग्य विमा आहे का ? याचा विचार करा.

वय २५ ते ३० या वयोगटातील मुलींनी लहान वयातच उत्तम भविष्यासाठी सुरक्षित आरोग्य विमा कवच घ्यायला हवे. ज्यांनी अजूनही सुरुवात केली नाही त्यांनी किमान पाच लाख विमा कवच देणारा आरोग्य विमा विकत घ्यायला हवा. जसजसे वय वाढेल तसा तुमचा आरोग्य विमा सुद्धा वाढायला हवा.

हेही वाचा… Money Mantra : सव्वा लाख कोटीच्या सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, मार्केटला बूस्टर डोस !

वर्किंग वुमन आणि टर्म इन्शुरन्स

लग्नाचे वय भारतातील शहरी आणि ग्रामीण भागातील शिकलेल्या तरुणींमध्ये वाढताना दिसते आहे. त्याचबरोबर घर विकत घेण्यासाठी, वाहन विकत घेण्यासाठी सर्रासपणे कर्ज सुद्धा घेतले जाते. सुशिक्षित आणि उत्तम पैसे कमावणाऱ्या तरुण महिलांचा टर्म इन्शुरन्स बऱ्याचदा काढलेला नसतो. घरात घरातील कर्त्या पुरुषाचा जसा इन्शुरन्स मध्ये विचार केला जातो तसाच तो तुमचाही झाला पाहिजे या दृष्टीने आखणी करायला हवी.

शेअर ट्रेडिंग कुणासाठी ?

गेल्या काही वर्षात गृहिणींमध्ये शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा कल वाढताना दिसतो आहे. सकाळची कामे आटोपून मधल्या वेळात शेअर ट्रेडिंग करणे जरी सोपे वाटत असले तरी तो तुमचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत नाही हे कायम मनात ठेवायला हवे. अर्धवट अभ्यास करून कोणाच्यातरी सल्ल्यावर अवलंबून राहून एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून येणाऱ्या टिप्स वाचून कष्टाचे पैसे शेअर ट्रेडिंगमध्ये वाया घालवू नका. या ऐवजी म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एस आय पी) च्या माध्यमातून पैसे गुंतवणूक करण्याचा मार्ग अवलंबून स्थिरता अनुभवा.

शेअर बाजाराचा अभ्यास कसा करायचा ?

कंपनी कशी चालते ? तिचा अभ्यास कसा करायचा ? प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट यांचा अभ्यास कसा करायचा ? आर्थिक घडामोडी घडतात त्याचा शेअर बाजारावर होणारा परिणाम कसा होतो ? याचा अभ्यास करून हळूहळू आपला दीर्घकालीन लॉन्ग टर्म पोर्टफोलिओ तयार करा.

हेही वाचा… Money Mantra: वाहन कर्ज घेताना कोणत्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावं ?

निफ्टी इंडेक्स फंडातील गुंतवणूक

विनासायास आणि सहज, कमीत कमी रिसर्च करून गुंतवणूक करता येईल असे प्रॉडक्ट म्हणजे इंडेक्स फंड किंवा निफ्टी ETF होय. यामध्ये निफ्टीतील ५० शेअर्समध्ये जशी गुंतवणूक असते त्याच प्रमाणामध्ये गुंतवणूक केली जाते. यामुळे जोखीम टाळता आली नाही तरी कमी नक्कीच होते.

महिला सक्षमीकरणाचा मार्ग आर्थिक सक्षमीकरणातून जातो हे कायम लक्षात ठेवा. महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !