भारत सरकारच्या कॅबिनेटने गुरुवारी सुमारे सव्वा लाख कोटी रुपये इतकी गुंतवणूक अपेक्षित असलेल्या तीन चिप निर्मिती प्रकल्पांना हिरवा कंदील दिला. भारताला सेमीकंडक्टर उद्योगाच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. भारतातील टाटा उद्योग समूहाच्या आणि तैवानच्या कंपनीच्या संयुक्त माध्यमातून हे प्रकल्प राबवले जाणार आहेत. तैवानमधील पॉवरचिप सेमीकंडक्टर आणि टाटा ग्रुप समूह यांच्या भागीदारीतून गुजरात मधील ढोलेरा येथे अंदाजे ९१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला फाउंड्रीचा प्रकल्प उभा राहणार आहे. दरवर्षी ३०० कोटी चिप निर्मिती करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प संगणक, इलेक्ट्रिक वाहने, संरक्षण विषयक उपकरण, ग्राहकांसाठी आवश्यक असणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, घरगुती वापरासाठीची उपकरणे याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

जगातील आघाडीच्या दहा सेमीकंडक्टर उद्योगांमध्ये गणल्या जाणाऱ्या तैवानच्या कंपनीबरोबर हा प्रकल्प होत असल्याने याचे महत्त्व सर्वाधिक आहे. प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली की पहिली सेमीकंडक्टरची बॅच तयार होण्यासाठी चार ते पाच वर्षाचा कालावधी लागतो. यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होणे देशाच्या औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कोविडच्या जागतिक संकटानंतर चीनमधील उद्योग व्यवसाय भारतामध्ये यावे यासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न होण्यास सुरुवात झाली. चीन आणि तैवानचे राजकीय संबंध लक्षात घेता सेमीकंडक्टर उद्योगांमध्ये भारत पश्चिमेकडील देशांसाठी एक भरवशाचा साथीदार म्हणून पुढे येणे महत्त्वाचे आहे. या उद्योगातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एक लाख एकूण रोजगार तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि चीननंतर सेमीकंडक्टरची सगळ्यात जास्त मागणी भारतामध्ये नोंदवली जाते. याच सेमीकंडक्टरचे उत्पादन भारतामध्ये होणे महत्त्वाचे मानले जात आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

हेही वाचा : Money Mantra: वाहन कर्ज घेताना कोणत्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावं ? 

सेमीकंडक्टर म्हणजे काय?

कोणत्याही विजेवर चालणाऱ्या उपकरणांमध्ये किंवा यंत्रामध्ये सेमीकंडक्टर असतोच. मुख्य इलेक्ट्रिक प्रवाह उपकरणापर्यंत पोहोचवण्यासाठी सेमीकंडक्टरची गरज असते. थोडक्यात सिलिकॉनसारख्या धातूंपासून तयार केलेल्या चिप्सचा समूह त्या यंत्रासाठी महत्त्वाचा असतो. एखाद्या मोबाईल फोनमधला किंवा कॉम्प्युटरमधला मेंदू म्हणजेच मायक्रोप्रोसेसर असतो. म्हणजेच जेवढे हार्डवेअर अत्याधुनिक तेवढेच त्या उपकरणाचे काम अधिक दर्जेदार होणार.

सेमीकंडक्टर व्यवसाय भारतामध्ये तयार होण्यासाठी फक्त परदेशी कंपन्यांना आमंत्रण देणे एवढेच पुरेसे ठरणार नाही त्यासाठी लागणारी यंत्रणाच नव्याने उभारावी लागणार आहे. या व्यवसायातून तयार होणारी उत्पादने संरक्षणविषयक गरजा पूर्ण करत असल्याने त्याच्या गोपनीयतेविषयी सुद्धा तेवढीच काळजी घ्यावी लागते. असे प्रकल्प उभारण्यात लागणारा वेळ आणि लागणारी गुंतवणूक मोठी असते. जर दिलेल्या वेळेत प्रकल्प उभारून झाला नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळेच सरकारी पातळीवर फास्टट्रॅक धोरणे राबवताना विविध मंत्रालय, विभाग आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणाऱ्या कंपन्या यांच्यात ताळमेळ असण्याची गरज आहे. सेमीकंडक्टर उद्योग संपूर्णपणे स्वदेशी असणे अशक्य आहे मात्र, परदेशी तंत्रज्ञानाच्या संयुक्त भागीदारीतून भारतात याची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हेही वाचा : Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी? 

टाटा उद्योग समूहतर्फे चिप असेंबली कारखाना आसाममध्ये उभारला जाणार आहे. या कारखान्यातून तयार झालेल्या चिप भारतातील वाढत्या वाहन उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. एका दिवसाला ४८ दशलक्ष चिप बनवण्याची क्षमता असलेला हा कारखाना असणार आहे. टाटा कंपनी ज्यांच्यासाठी या चिप बनवून देणार आहे त्यांच्याकडूनच आवश्यक असे तंत्रज्ञान मिळणार आहे.

तिसऱ्या प्रकल्पामध्ये सीजी पॉव्हर या कंपनीतर्फे गुजरात मधील सानंद येथे जपानच्या कंपनीच्या भागीदारीमध्ये चिप निर्मितीचा कारखाना उभारला जाणार आहे. यामध्ये एकूण ७६०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातून तयार होणाऱ्या चिप बहुतांश प्रमाणावर संरक्षण आणि अंतराळ संशोधनासाठीच बनवल्या जाणार आहेत. या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या उत्पादनासाठी इस्रो हा प्रमुख खरेदीदार असेल.

हेही वाचा : Money Mantra: ‘सिबिल स्कोअर’चे महत्त्व

5G तंत्रज्ञान, इंटरनेट ऑन थिंग्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक, स्मार्ट मोबिलिटी, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग अशा बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर सेमीकंडक्टर उद्योगात होणारी ही गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे.