· फंड घराणे – एचडीएफसी म्युच्युअल फंड

· फंडाचा प्रकार – मिड कॅप इक्विटी फंड

Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती
IPL 2024 Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024 LSG vs PBKS: इम्पॅक्ट प्लेयरचा चतुराईने वापर, आता राहुलही इम्पॅक्ट प्लेयर
Shares of Crystal Integrated closed lower on the first day
क्रिस्टल इंटिग्रेटेडचे समभाग पहिल्या दिवशी घसरणीसह बंद

· एन. ए. व्ही. (१ मार्च २०२४ रोजी) ग्रोथ पर्याय – १५७ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता (३१ जानेवारी २०२४ रोजी ) – ५९०२७ कोटी रुपये.

· फंड मॅनेजर – चिराग सेटलवाड.

फंडाची स्थिरता ( ३१ जानेवारी २०२४ )

· पोर्टफोलिओ टर्नओव्हर १९.०९ %

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन ४.०६ %

· बीटा रेशो ०. ८७ %

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडापेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे. उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशनचा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

हेही वाचा – Money Mantra : सव्वा लाख कोटीच्या सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, मार्केटला बूस्टर डोस !

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

· मध्यम आकाराच्या कंपन्यातील भविष्यकालीन वाढ अधिक वेगाने होते.

· मिडकॅप श्रेणीतील सर्व प्रकारच्या सेक्टरमध्ये आणि कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो.

· कमीत कमी दहा ते पंधरा वर्षाचा विचार करूनच पोर्टफोलिओ बांधला जातो.

· ‘बॉटम अप’ या पद्धतीने शेअर्स निवडले जातात.

· शेअर्स विकत घेतल्यावर कमी काळात विकण्यापेक्षा जास्त काळ गुंतवणूक करून त्याचा फायदा मिळेल अशी रणनीती अवलंबली जाते.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

१ मार्च २०२४ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· एक वर्ष – ५५. ८२ %

· दोन वर्षे – ३४. ०९ %

· तीन वर्षे – २८. ८९ %

· पाच वर्षे – २४. ९८ %

· दहा वर्षे – २२. २८ %

· फंड सुरु झाल्यापासून – १७. ९७ %

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

३१ जानेवारी २०२४ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार पोर्टफोलिओमध्ये ६८ शेअर्सचा समावेश आहे. यातील ५३.२२% मिडकॅप तर अठरा टक्के स्मॉल कॅप शेअर्समधील गुंतवणूक आहे. आघाडीच्या पाच शेअर्समध्ये पोर्टफोलिओतील १७ % गुंतवणूक केली गेली आहे, तर आघाडीच्या तीन सेक्टरमध्ये पोर्टफोलिओतील १९% गुंतवणूक दिसते.

इंडियन हॉटेल्स, अपोलो टायर, मॅक्स हेल्थकेअर, फेडरल बँक, टाटा कम्युनिकेशन, इंडियन बँक, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस, पर्सिस्टंट सिस्टीम, हिंदुस्तान पेट्रोलियम हे आघाडीचे दहा शेअर्स पोर्टफोलिओ मध्ये आहेत.

हेही वाचा – Money Mantra: वाहन कर्ज घेताना कोणत्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावं ?

कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ६.९२%, फार्मा ६.६१%, टायर ५.८८%, पब्लिक सेक्टर बँक ५.१४%, वित्त संस्था ५ % अशा प्रमुख क्षेत्रांमध्ये पोर्टफोलिओतील गुंतवणूक केली गेली आहे.

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

· एक वर्षापासून एसआयपी केली असती तर ५७.०९ %

· दोन वर्षे ४२.६६ %

· तीन वर्षे ३३.५१ %

· पाच वर्षे ३१.६९ %

· सलग दहा वर्ष २०.९५ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

  • नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.