प्रवीण देशपांडे

मागील लेखात आपण घर आणि शेतजमिनीच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर वाचवण्यासाठीच्या तरतुदी बघितल्या. या लेखात स्थावर मालमत्ता आणि इतर संपत्तीच्या म्हणजेच सोने, शेअर्स, म्युच्युअल फंडातील युनिट्सच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी काय तरतुदी आहेत ते बघू.

Commodity SEBI Developed Commodity Futures Market print eco news
क… कमॉडिटीचा : हवामान वायद्यासाठी ‘सेबी’ने तत्परता दाखवावी
Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

जमीन किंवा इमारतीच्या विक्रीवर झालेला भांडवली नफा : कलम ५४ ईसी या कलमानुसार दीर्घमुदतीच्या स्थावर मालमत्तेची विक्री करून झालेल्या भांडवली नफ्यावरील कर बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास कर वाचू शकतो. पूर्वी कोणत्याही दीर्घमुदतीच्या संपत्तीची (शेअर्स, सोने, वगैरे) विक्री करून झालेल्या भांडवली नफ्यासाठी या बॉंडमध्ये गुंतवणूक करता येत होती. परंतु १ एप्रिल, २०१८ पासून फक्त स्थावर मालमत्तेसाठी ही वजावट मर्यादित करण्यात आली. ज्या करदात्यांनी जमीन, घर किंवा इमारतीची (मूळ संपत्ती) विक्री केली आहे अशांनी या कलमानुसार ठराविक बॉंडमध्ये गुंतवणूक करून त्याची वजावट घेतल्यास कर वाचू शकतो. ही वजावट सुद्धा दीर्घमुदतीच्या भांडवली संपत्तीसाठी आहे. या कलमानुसार मूळ संपत्तीची विक्री केल्या तारखेपासून ६ महिन्यात ठराविक बॉंडमध्ये दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याची गुंतवणूक केल्यास त्याची वजावट घेता येते. या ठराविक बाँडमध्ये गुंतवणुकीला मर्यादा आहे. या कलमानुसार ही मर्यादा ५० लाख रुपये इतकी आहे.

हेही वाचा… Money Mantra : बनावट कस्टमर केअर नंबरवरुन होणारी फसवणूक कशी होते आणि ती टाळण्यासाठी काय करावं?

एका आर्थिक वर्षात एक किंवा त्यापेक्षा जास्त मूळ संपत्तीची विक्री करून आलेल्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी त्या वर्षात आणि त्याच्या पुढील वर्षातील ठराविक बॉंड मधील गुंतवणूक ५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसली पाहिजे. ही बॉंड मधील गुंतवणूक ५ वर्षांसाठी आहे. या ५ वर्षांच्या काळात ही गुंतवणूक रोख रकमेत परावर्तीत केल्यास, ज्या वर्षी ती रोख रकमेत परावर्तीत केली त्या वर्षीचा भांडवली नफा म्हणून तो करपात्र होईल. हे बॉंड तारण ठेऊन कर्ज किंवा आगाऊ रक्कम घेतल्यास कलम ५४ ईसी मध्ये घेतलेली वजावट रद्द होते. या बॉंडवर दरवर्षी ५% दराने व्याज मिळते. हे व्याज करपात्र आहे. या कलमांतर्गत रुरल इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, इंडिअन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थांनी बॉंड जारी केले आहेत. या कलमानुसार सवलत घेतांना या बॉंडचा कालावधी, त्यावर मिळणारे करपात्र व्याज, महागाई निर्देशांक, करदात्याचे वय, वगैरेंचा विचार करून बॉंड मध्ये गुंतवणूक करावी. बॉंडच्या गुंतवणुकीवर मर्यादा असल्याने करदात्याचा भांडवली नफा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास पूर्ण सवलत घेता येत नाही.

सोने, शेअर्स, जमीन, वगैरे संपत्तीवर झालेला भांडवली नफा : करदात्याने घर किंवा शेत जमीन किंवा स्थावर मालमत्तेची विक्री केल्यास कर कसा वाचू शकतो हे आपण बघितले. करदात्याने घराच्या व्यतिरिक्त म्हणजे सोने, समभाग, म्युचुअल फंड, जमीन, प्लॉट, दुकान, वगैरे संपत्ती विकल्यास त्याला करसवलत मिळते का? यासाठी प्राप्तिकर कायद्यात कलम ५४ एफ नुसार कोणत्याही संपत्तीची (निवासी घर सोडून) (मूळ संपत्ती) विक्री केल्यावर होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर सवलतीची ही तरतूद आहे. या कलमानुसार नवीन घरात गुंतवणूक केल्यास वजावट मिळते. करदाता नवीन घर घेण्यासाठी सोने, समभाग, म्युचुअल फंड, जमीन, प्लॉट, दुकान, वगैरे संपत्ती विकून पैसा जमा करतो.

हेही वाचा… Money Mantra : स्टार्टअप्सचे मर्जर अ‍ॅक्विझिशन

पागडी तत्वावरील असणारे घर किंवा दुकान विकून होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी या कलमानुसार गुंतवणूक करता येते. या सर्व संपत्तीच्या विक्रीवरील भांडवली नफा हा करपात्र आहे. कर भरल्यामुळे रोकड सुलभता कमी होते, त्यामुळे नवीन घर घेण्यासाठी कर सवलत प्राप्तिकर कायद्यात आहे. ही वजावट दीर्घमुदतीच्या संपत्तीच्या विक्रीवर झालेल्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी मिळते. अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यासाठी या कलमानुसार वजावट मिळत नाही.

या कलमानुसार सुद्धा नवीन घर घेण्यासाठीचा कालावधी कलम ५४ प्रमाणेच आहे. ही गुंतवणूक मूळ संपत्ती विक्री केल्या तारखेपूर्वी एका वर्षाच्या आत किंवा विक्री केल्या तारखेपासून २ वर्षात (खरेदी केल्यास) किंवा ३ वर्षात (बांधल्यास) करणे बंधनकारक आहे. या कलमानुसार मूळ संपत्तीची संपूर्ण विक्री रक्कम (विक्री खर्च वजा जाता) म्हणजेच निव्वळ विक्री किंमत नवीन घरात गुंतविल्यास त्यावर संपूर्ण वजावट मिळून कर भरावा लागत नाही. निव्वळ विक्री रकमेपेक्षा कमी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास नवीन घराचे मूल्य आणि विक्री किंमत याच्या प्रमाणात वजावट मिळते. कलम ५४ आणि कलम ५४ एफ मध्ये फरक हा आहे की कलम ५४ नुसार एक घर विकून दुसऱ्या घरात गुंतवणूक करतांना फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याएवढी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास कर भरावा लागत नाही आणि कलम ५४ एफ नुसार निव्वळ विक्री किंमत नवीन घरात गुंतवावी लागते. या कलमानुसार फक्त एकाच नवीन घरात आणि भारतातच गुंतवणूक करता येते.

या सवलतीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून काही अतिरिक्त अटी या कलमामध्ये आहेत, ज्या कलम ५४ मध्ये नाहीत. करदात्याला या कलमानुसार वजावट मिळत नाही जर :

करदात्याकडे मूळ संपत्ती विकण्याच्या तारखेला एकापेक्षा जास्त (नवीन घर सोडून) घरे असतील तर, किंवा
करदात्याने मूळ संपत्तीच्या विक्रीनंतर एका वर्षात कोणतेही घर खरेदी (नवीन घराव्यतिरिक्त) केले तर, किंवा
करदात्याने मूळ संपत्तीच्या विक्रीनंतर तीन वर्षात कोणतेही घर बांधले (नवीन घराव्यतिरिक्त) तर.

हेही वाचा… Money Mantra : ७० हजाराचे सरकारी मानकरी, हे PSU शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?

करदात्याने ५४ एफ या कलमानुसार वजावट घेतल्यानंतर पुढील दोन वर्षात अजून एक घर खरेदी केले किंवा तीन वर्षात अजून एक घर बांधले तर करदात्याने पूर्वी घेतलेली वजावट रद्द होते. तसेच या कलमानुसार सुद्धा नवीन घर (ज्या घराच्या गुंतवणुकीवर वजावट घेतली होती) खरेदी केल्यापासून किंवा बांधल्यापासून तीन वर्षांच्या आत विकल्यास पूर्वी घेतलेली वजावट रद्द होते. करदात्याने आर्थिक नियोजन करताना या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. असे न केल्यास पूर्वी घेतलेली वजावट रद्द होऊ शकते आणि जास्त कर भरावा लागू शकतो.

१ एप्रिल, २०२३ नंतर या कलमानुसार १० कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त रक्कम नवीन घरात गुंतविता येत नाही. नवीन घरात १० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास १० कोटी रुपयांच्या वरती रकमेवर कर भरावा लागेल.

ज्या आर्थिक वर्षात मूळ संपत्ती विकली त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी नवीन घरात गुंतवणूक न केल्यास, निव्वळ विक्री रक्कम कॅपिटल गेन स्कीमच्या अंतर्गत बँकेत जमा करावी लागते. ही रक्कम मुदतीत या खात्यात जमा केली नाही तर वजावट मिळत नाही. निव्वळ विक्री रक्कम पुढील २ वर्षात (खरेदी केल्यास) किंवा ३ वर्षात (बांधल्यास) नवीन घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी न वापरल्यास तीन वर्षानंतर भांडवली नफ्याची रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाते. कॅपिटल गेन स्कीमच्या अंतर्गत उघडलेल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र बँकेला सादर करावे लागते.