Money Mantra बऱ्याचदा काही अपरिहार्य कारणांमुळे पैशांची तातडीची गरज निर्माण होते. (उदा: कुटुंबातील गंभीर आजारावरील उपचारांसाठी, अपघात) त्यावेळी जवळ शिल्लक नसेल तर तातडीने पैसे उभे करणे गरजेचे असते. मात्र अशा वेळी आपल्या ओळखीच्या अथवा जवळच्या नातेवाईकाकडून अपेक्षित रक्कम मिळेलच असे नाही. तसेच बँक,कर्मचारी सोसायटी अशा पर्यायांतून विनातारण कर्ज त्वरित मिळेलच असेही नाही. अशा वेळी गरजेपोटी लोक झटपट कर्ज इन्स्टंट लोन) हा पर्याय निवडतात. असे झटपट कर्ज देणारी बरीचशी अ‍ॅप्स मोबाईलवर उपलब्ध आहेत. उदा: गुगलपे, फोनपे, पेटीएम यासारख्या मोबाईल अ‍ॅप्सवरून झटपट कर्ज मिळविता येते.

याशिवाय काही बँका, एनबीएफसीज सुद्धा आता मोबाईल अॅपवरून झटपट कर्ज देऊ करतात. यासाठी मोजकीच कागदपत्रं देऊन कमीतकमी कालावधीत कर्ज मिळविता येते. असे असले तरी काही मोबाईल अ‍ॅप्सवरून झटपट कर्ज घेताना खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा नजीकच्या भविष्यात कर्जदार चांगलाच अडचणीत येतो प्रसंगी अशा कर्जदाराने या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची उदाहरणेही गेल्या काही दिवसांत उघडकीस आली आहेत.

womans right to decide on abortion
गर्भपाताचा निर्णय घेण्याचा अधिकार महिलेचाच!
Car bike tyre safety tips for monsoon
Monsoon Bike Riding: मान्सूनमध्ये लाँग ड्राईव्हला जाताय? मग आधी ‘हे’ वाचाच; प्रवास होईल सुखकर
beetroot-pineapple-lemon juice remedy for iron deficiency
रक्तातील लोह वाढवण्यासाठी ‘बीट, अननस अन् लिंबाचा रस ठरेल का फायदेशीर? काय सांगतात तज्ज्ञ?
ginger health benefits
तुम्ही रोज रिकाम्या पोटी आल्याचा तुकडा चघळल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Will hanging your head off the side of the bed result in hair growth
झोपण्याआधी ४ ते ५ मिनिटे बेडवर ‘या’ स्थितीत राहिल्याने केसवाढीला मिळतो वेग? तज्ज्ञांनी सांगितली प्रक्रिया व फायदे
fake cooking oil harmful for health
भेसळयुक्त खाद्यतेलाचे आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात? पाहा काय सांगतात डॉक्टर….
Mumbai Monsoon control room of MMRDA marathi news
एमएमआरडीएचा पावसाळी नियंत्रण कक्ष आजपासून कार्यान्वित
Milk tea and coffee harmful to health
विश्लेषण: तरतरी येत असली, तरी दुधाचा चहा, कॉफी आरोग्यास घातकच? काय सांगतात आयसीएमआरची मार्गदर्शक तत्त्वे?

हेही वाचा…Money Mantra: फंड विश्लेषण: आयसीआयसीआय प्रुडेंशिअल मिड कॅप फंड

सापळ्यात अडकू नका

आजच्या वेगवान जगात, झटपट कर्ज मिळणे ही गरज आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर अ‍ॅप वरून कर्जाचा अर्ज पूर्ण करू शकता. तथापि, सर्व झटपट कर्ज अ‍ॅप्स सुरक्षित असतीलच असे नाही. प्रथमदर्शनी अशी अ‍ॅप्स आर्थिक समस्यांचे जलद समाधान वाटू शकतात. मात्र तीच अ‍ॅप्स आर्थिक घोटाळे आणि माहितीचोरीचा सापळादेखील असू शकतात. अशा सापळ्यात सावज अलगद सापडू शकते. त्यादृष्टीने नेमकी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे हे आता पाहू.

कोणती खबरदरी घ्याल?

– आपण ज्या लोन अ‍ॅपवरून कर्ज घेणार आहात त्याची विश्वासहार्यता तपासून पहा , शक्य तोवर बँका तसेच सुपरिचित
एनबीएफसीज (उदा: बजाज फायनान्स , टाटा फायनान्स , श्रीराम फायनान्स , महिंद्र फायनान्स ई.) यांच्या लोन अ‍ॅपवरून कर्ज घ्या . तसेच आता काही पी२पी कंपन्या (उदा:फेअर सेंट, फ्रीन्झी, जीराफ ई.) सुद्धा झटपट कर्ज देत आहेत. अशा कर्ज देणाऱ्या कंपन्या आरबीआयकडे नोंदणीकृत आहेत का हे पहा.
-अशा अ‍ॅपवर आपण देत असलेली माहिती (डेटा) सुरक्षित आहे ना, याची खात्री करून घ्या.

हेही वाचा…‘हायब्रिड’च्या निमित्ताने …

-अशा विविध अ‍ॅपवरून देण्यात येणाऱ्या कर्जाच्या अटी, व्याजदर, परतफेडीचा कालावधी व अन्य चार्जेस यांचा तौलनिक अभ्यास करूनच निर्णय घ्यावा .
– विविध छुपे खर्च तपासून पहा उदा:प्रोसेसिंग फी, प्रीपेमेंट चार्जेस, पेनल्टी व जीएसस्टी
-आपण घेणार असलेल्या कर्जाचा इएमआय किती आहे हे पाहून घ्या. सध्या बहुतेक सर्व बँका, एनबीएफसीज आपल्यावेबसाईटवर इएमआय कॅलक्यूलेटर उपलब्ध असतात त्याचा वापर करून मिळणारे कर्ज व व्याजाचा दर यानुसार इएमआय काढता येतो.
-आपला सीबीएल स्कोर पाहून मिळणारा व्याज दर योग्य आहे का, हे ही पाहणे गरजेचे असते.
-आपल्या गरजे इतकेच कर्ज घ्या केवळ मिळतेय म्हणून अनावश्यक कर्ज घेऊ नका, येणाऱ्या कर्जाच्या इएमआय
आपल्याला नियमित देणे शक्य आहे का हे पाहूनच कर्ज घ्या.

हेही वाचा…मार्ग सुबत्तेचा : दीर्घकाळासाठी नियोजन करताना…

थोडक्यात असे म्हणता येईल की, गरजेच्या वेळी झटपट मिळणारे कर्ज घेऊन आपली तातडीची निकड अवश्य भागविता येते मात्र असे करताना आवश्यक खबरदारी घ्यावी म्हणजे, यातून होणारी फसवणूक वा पिळवणूक टाळता येईल.