वसंत कुलकर्णी

करोनापश्चात स्मॉल-कॅप गुंतवणुकीने सोन्यासारखा परतावा दिला असल्याने म्युच्युअल फंडातील एकूण ‘एसआयपी’ गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंतवणुकीचा ओघ स्मॉल कॅप फंडात आला. स्मॉल कॅप कंपन्यांचे मूल्यांकन विक्रमी उच्चांकी पातळीवर असले तरी या धोक्याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदार स्मॉल कॅपमधील गुंतवणूक वाढवत असल्याचे आकडेवारी दर्शवीत आहे. ‘एसआयपी’ गुंतवणुकीमार्फत संपत्ती निर्मितीसाठी संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ॲक्सिस स्मॉल कॅप फंडाची शिफारस करीत आहे.

Mixed trend in global markets and selling by investors in banking finance and consumer goods stocks
पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय

ॲक्सिस स्मॉल कॅप फंडाची सुरुवात नोव्हेंबर २०१३ मध्ये क्लोज-एंडेड फंड म्हणून झाली. नोव्हेंबर २०१८ मध्ये फंड गुंतवणुकीस कायम खुला (ओपन-एंडेड) फंड म्हणून रूपांतरित झाला. या फंडाने २५ नोव्हेंबर २०१३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत २३.७७ टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

मागील वर्षभरात जसे इतर स्मॉल कॅप फंडांनी भरघोस परतावा दिला तसा ॲक्सिस स्मॉल कॅप फंडानेसुद्धा वार्षिक ४२ टक्के परतावा दिला आहे. आमच्या म्युच्युअल फंड संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणक प्रणालीने (अल्गोरिदम) स्मॉल कॅप गटात कूस बदललेला फंड (ट्रेंड रिव्हर्सल) म्हणून ॲक्सिस स्मॉल कॅप फंडाची निवड केली. हा लेख लिहायचा ठरला म्हणून या फंडाचे निधी व्यवस्थापक श्रेयस देवलकर यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान, ‘गुंतवणूकदारांनी मागील एका वर्षाचा परतावा पाहून, त्याच परताव्याच्या अपेक्षेने नवीन गुंतवणूक करू नये. मागील वर्षभरातील असाधारण परतावा भविष्यात प्रतिबिंबित होण्याची शक्यता नाही. गुंतवणूकदारांनी आपापल्या जोखीम सहिष्णुतेनुसार आपल्या गुंतवणुकीत स्मॉल कॅप गुंतवणुकीची मात्रा ठरवावी.’

हेही वाचा >>>Money Mantra : भांडवली संपत्तीत कशाचा समावेश होतो? त्यानुसार करनियोजन कसे करावे?

स्मॉल कॅप वर्गातील कंपन्यांनी मागील वर्षभरात भरघोस परतावा दिला आहे ‘निफ्टी स्मॉल कॅप १०० टीआरआय’ राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातील सर्वाधिक परतावा दिलेला निर्देशांक ठरला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च जोखीम घेण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांना या फंडाची निवड करावी. स्मॉल कॅप फंडांचे अस्थिर स्वरूप लक्षात घेऊन, या फंडात नियोजनबद्ध पद्धतीने (एसआयपी) गुंतवणूक करणे हितावह ठरेल.

फंडाची कामगिरी

ॲक्सिस स्मॉल कॅप फंडाच्या ‘एनएफओ’मध्ये गुंतविलेल्या १ लाख रुपयांचे ३१ जानेवारी रोजी ८.९० लाख रुपये झाले असून, फंडाने २३.९५ टक्के वार्षिक दराने परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत, (१ फेब्रुवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२४) फंडाने वार्षिक २७.८५ टक्के दराने (सीएजीआर) परतावा दिला आहे. या कालावधीत फंडाने ‘निफ्टी स्मॉल कॅप १०० टीआरआय’ या मानदंडसापेक्ष २.२७ टक्के अधिक परतावा मिळविला आहे. मालमत्ता क्रमवारीत हा फंड स्मॉल कॅप फंड गटात चौथ्या क्रमांकावर आहे. मागील पाच वर्षांतील २० तिमाहींपैकी १७ तिमाहीत हा फंड ‘अपर मिडल’ किंवा ‘मिडल क्वारटाइल’ श्रेणीत राहिला.

हेही वाचा >>>Money Mantra : रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, व्याजदर जैसे-थे, बाजाराचा निराशेचा सूर !

फंडाचा पोर्टफोलिओ

ॲक्सिस स्मॉल कॅप फंडाचा पोर्टफ़ोलिओ सक्रियपणे व्यवस्थापित केला जातो. फंडाच्या गुंतवणुकीत प्रामुख्याने उद्योगक्षेत्राच्या सरासरीपेक्षा वाढ नोंदविणाऱ्या कंपन्यांचा समावेश असतो. ॲक्सिस स्मॉल कॅप फंडाच्या पोर्टफोलिओत ३१ डिसेंबर २०२३च्या आकडेवारीनुसार २.२१ टक्के लार्ज कॅप, ५३.५४ टक्के मिड कॅप, ३५.२० टक्के स्मॉल कॅप आणि ९.०४ टक्के रोकडसंलग्न गुंतवणुका आहेत. मागील महिन्याभरात निधी व्यवस्थापकांनी अपार इंडस्ट्रीज, महिंद्र लाइफस्पेसेस, केईआय इंडस्ट्रीज, हॅप्पी फोर्जिंग, आयनॉक्स इंडिया या कंपन्यांचा नव्याने समावेश केला तर सिम्फनी लिमिटेडला पोर्टफोलिओतून वगळण्यात आले. फंडाच्या गुंतवणुकीत अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, गैरबँकिंग वित्तीय कंपन्या, स्थावर मालमत्ता विकासक ही सर्वाधिक गुंतवणूक असलेली, तर सिमेंट, उत्पादने, आरोग्य निगा, बँका ही सर्वात कमी गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे आहेत. बिर्ला सॉफ्ट, नारायणा हृदयालया, ब्रिगेड एंटरप्राईजेस, चोलामंडलम फायनान्शियल होल्डिंग्ज, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, गॅलेक्सी सरफेक्टंट या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. किमान पाच वर्षे मुदतीसाठी या फंडाची शिफारस करीत आहे.

shreeyachebaba@gmail.com