गेल्या लेखात नमूद केलेले त्याप्रमाणे निफ्टी निर्देशांक २५,८०० च्या वरच्या लक्ष्यासमीप झेपावल्याने बाजारात तेजीचे वातावरण सुरू झाले. ‘आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी’ अशी भावना गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली. या सणासुदीच्या दिवसांत, गुंतवणूकदारांना हे वर्ष सुख, समृद्धी, आनंदाचे जावो अशा शुभेच्छा ‘निफ्टी’ देईल काय? याचा आढावा आज आपण घेऊया.
या स्तंभातील १ सप्टेंबरच्या ‘तीन पावलं’ या लेखात अमर, अकबर, ॲन्थनी आठवून पाहा. या तिघांनी त्या वेळच्या गडद मंदीत तेजीचे आलेखन केले. तसेच काहीसे आता निफ्टी निर्देशांकावर शाश्वत तेजी टिकण्यासाठी आपण तांत्रिक विश्लेषणातील ‘कल निर्धारण रेषा’ (ट्रेंड लाइन) संकल्पनेला लक्षात घेऊ आणि तिच्याद्वारा आपण भविष्यकालीन वाटचाल रेखाटूया.
‘कल निर्धारण रेषा’ काढण्यासाठी दोन उच्चांक अथवा दोन नीचांकाची गरज असते. आज आपण दोन उच्चांकावर आधारलेली ‘कल निर्धारण रेषे’चा विचार करूया. यासाठी आपण गेल्या वर्षीचा २७ सप्टेंबर २०२४ चा २६,२७७ चा ऐतिहासिक उच्चांक आणि ३० जून २०२५चा २५,६६९ उच्चांक. असे हे दोन उच्चांक गृहीत धरू. हे दोन उच्चांक सांधत जी कल निर्धारण रेषा येत आहे तिची आजची किंमत ही २५,४१५ येत आहे. इतके दिवस तेजीच्या मार्गातील हा भरभक्कम अडथळा होता. सरलेल्या सप्ताहात निफ्टी निर्देशांकाने २५,४०० ते २५,५०० चा स्तर लीलया पार केला आहे आणि आता प्रत्यक्ष निफ्टी निर्देशांक २५,७७९ वर झेपावला आहे. आता येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने २५,८०० ते २५,४०० स्तरादरम्यान तेजीची पायाभरणी केल्यास, भविष्यात निफ्टी निर्देशांक २६,३००…२६,५०० ते २६,८०० अशा नवीन उच्चांकला गवसणी घालेल. पुढील लेखात आपण वरील नवीन उच्चांकाची लक्ष्य कशी काढली आणि ती साध्य होण्याचा कालावधी याचा विस्तृत आढावा घेऊया (क्रमशः)
निकालपूर्व विश्लेषण
१) कोलगेट पामोलिव्ह इंडिया लिमिटेड:
१७ ऑक्टोबरचा बंद भाव : २,२९५.७५ रुपये
तिमाही वित्तीय निकाल: गुरुवार,२३ ऑक्टोबर
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,२८० रुपये
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून २,२८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,३५० रुपये, द्वितीय लक्ष्य २,५०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: २,२८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,१५० रुपयांपर्यंत घसरण
२) हिंदुस्थान युनिलिवर लिमिटेड:
१७ ऑक्टोबरचा बंद भाव: २,६०४.७५ रुपये
तिमाही वित्तीय निकाल: गुरुवार, २३ ऑक्टोबर
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,५७० रुपये
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून २,५७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,७०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,८५० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: २,५७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,४८० रुपयांपर्यंत घसरण
३) डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड
१७ ऑक्टोबरचा बंद भाव: १,२५६ रुपये
तिमाही वित्तीय निकाल: शुक्रवार, २४ ऑक्टोबर
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,२४० रुपये
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून १,२४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,३२० रुपये, द्वितीय लक्ष्य १,४०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: १,२४० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,१९० रुपयांपर्यंत घसरण
४) कोटक महिंद्रा बँक :
१७ ऑक्टोबरचा बंद भाव : २,२०५.५० रुपये
तिमाही वित्तीय निकाल: शनिवार, २५ ऑक्टोबर
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:२,१५० रुपये
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून २,१५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,३०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,५०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: २,१५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,०५० रुपयांपर्यंत घसरण
ashishthakur1966@gmail.com
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.