गेल्या तीन महिन्यांचा आढावा घेता, निफ्टी निर्देशांक २४,३०० ते २५,६६९ या परिघात मार्गक्रमण करत आहे. त्यातही विशेषत्वाने २४,७०० ते २५,२०० या चुंबकीय परिघाभोवतीच निफ्टीची परिक्रमा चालू आहे. हाच परीघ डोळ्यासमोर ठेवत येणाऱ्या दिवसातील तेजी-मंदीच्या वाटचालीचे आलेखन करूया.

गेल्या सहा महिन्यांत आपण ‘अस्मानी, सुलतानी’ संकटातून मार्गक्रमण करत, निफ्टी निर्देशांकाच्या २५,०००च्या ‘शाश्वत तेजीच्या स्तरावर पोहोचलो आहोत.’ यात भारत पाकिस्तान युद्ध, आयात शुल्काचा ‘जिझिया कर’ यातून जरा स्थिरस्थावर होत नाही, तर नाकातोंडात पाणी जाईल असं ‘अस्मानी पुराच संकट.’ या सर्व बिकट परिस्थितीतून गुंतवणूकदारांची, निफ्टी निर्देशांकाची वाटचाल चालू होती. वाचकांसाठी विकसित केलेले, काळाच्या कसोटीवर उतरलेले निफ्टी निर्देशांकावरील दोन ‘महत्त्वाचे केंद्रबिंदू स्तर’ ज्यात २४,००० चा तेजीसाठीचा आधारभूत स्तर, हा आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाने राखला तर आहेच. पण शाश्वत तेजीचा असा २५,०००च्या पल्याडदेखील झेपावयाचा त्याचा प्रयत्न करत आहे. हेच सूत्र हाताशी ठेवत निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल रेखाटूया.

या साठी ‘गॅन कालमापन पद्धती’चा आधार घेता, १६ ते २३ ऑक्टोबर हा महत्त्वाचा कालावधी येत आहे. हा कालावधी काढण्यासाठी ४ आणि ७ मार्चचा, २१,७४३ चा नीचांक गृहीत धरून, त्यावर ३४ दिवसांचं ‘गॅन चक्रा’चा आधार घेत १६ ते २३ ऑक्टोबरचा कालावधी येत आहे. या कालावधीत निफ्टी निर्देशांकाने २५,५००… २५,८०० ते २६,००० चा दुहेरी, तिहेरी उच्चांक प्रस्थापित केल्यास या स्तरावरून एक हलकी-फुलकी घसरण अपेक्षित आहे. या घसरणीनंतर निफ्टी ताजीतवानी होऊन २६,३०० ते २६,८०० चा नवीन उच्चांक दृष्टीपथात येईल. ही नाण्याची एक बाजू झाली. या तेजी पथावरील वाटचालीत मध्येच ट्रम्प यांची ट्विटरवाणी झाल्यास आणि ती निराशाजनक असल्यास निफ्टी निर्देशांक २४,७००चा स्तर तोडत, २४,४००, २४,१५० ते २३,८०० पर्यंत घसरू शकतो. ही नाण्याची दुसरी बाजू दुर्लक्षिली जाऊ नये.

निकालपूर्व विश्लेषण

१) ॲक्सिस बँक

१० ऑक्टोबरचा बंद भाव: १,१८०.१० रुपये

तिमाही वित्तीय निकाल: बुधवार, १५ ऑक्टोबर

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,१६० रुपये

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून १,१६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,२१० रुपये, द्वितीय लक्ष्य १,३४० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: १,१६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,१२० रुपयांपर्यंत घसरण

२) इन्फोसिस लिमिटेड

१० ऑक्टोबरचा बंद भाव : १,५१४.२५ रुपये

तिमाही वित्तीय निकाल: गुरुवार, १६ ऑक्टोबर

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,४८० रुपये

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून १,४८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५३० रुपये, द्वितीय लक्ष्य १,६३० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: १,४८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,४३० रुपयांपर्यंत घसरण

३) एचडीएफसी बँक

१० ऑक्टोबरचा बंद भाव : ९८०.९० रुपये

तिमाही वित्तीय निकाल: शनिवार, १८ ऑक्टोबर

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ९६० रुपये

निकाल उत्कृष्ट असल्यास: या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून ९६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,०१० रुपये, द्वितीय लक्ष्य १,०५० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: ९६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९४० रुपयांपर्यंत घसरण

४) आयसीआयसीआय बँक

१० ऑक्टोबरचा बंद भाव: १,३८०.६५ रुपये

तिमाही वित्तीय निकाल: शनिवार, १८ ऑक्टोबर

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,३६० रुपये

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून १,३६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,४२० रुपये, द्वितीय लक्ष्य १,४७० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: १,३६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,३१० रुपयांपर्यंत घसरण

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणी ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.