भांडवली बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण असून मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये कशाप्रकारे गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात कायम संभ्रमाची परिस्थिती असते. यासाठीच आजच्या लेखात आपण पद्धतशीर हस्तांतरण योजनेच्या (सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन-एसटीपी) मदतीने गुंतवणूक कशाप्रकारे करावी याची माहिती घेऊ या.

पद्धतशीर हस्तांतरण योजनेच्या (एसटीपी) मदतीने आपण म्युच्युअल फंडाच्या एका योजनेतून रक्कम काढून दुसऱ्या योजनेत गुंतवणूक करू शकतो. थोडक्यात एसआयपीच्या अगदी विरुद्ध पद्धतशीर हस्तांतरण योजना (एसटीपी) असते. एसआयपी म्हणजे बचत खात्यातून म्युच्युअल फंडात पैसे हस्तांतरित करणे, तर एसटीपी म्हणजे एका म्युच्युअल फंड योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे हस्तांतरित करणे. याकरिता आपल्याला म्युच्युअल फंड कंपनीला केवळ एक सूचना द्यायची असते आणि त्यानंतर दरमहा ठरावीक तारखेला एका योजनेतून रक्कम काढून दुसऱ्या योजनेत गुंतवणूक करणे शक्य होते. ( दररोज / दर आठवड्यालादेखील ट्रान्सफर करण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध आहे.)

rbi kotak mahindra bank marathi news, kotak bank latest marathi news
विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

हेही वाचा – क…कमॉडिटीचा : व्याजदरवाढीमुळे सोने साठीतच म्हातारे

एसटीपीचे फायदे –

१) गुंतवणुकीतील जोखीम कमी होते

समभाग संलग्न म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना शेअर बाजारात तेजी आल्यास पुढील १-२ वर्षांत गुंतवणुकीचे मूल्य कमी होण्याची जोखीम असते. गुंतवणुकीतील ही जोखीम कमी करण्यासाठी ‘एसटीपी’ची सुविधा उपयुक्त ठरते. जर गुंतवणूकदाराने रोखे संलग्न म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक केली आणि त्यातील ठरावीक रक्कम दरमहा समभागसंलग्न म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची सूचना दिली तर गुंतवणुकीतील जोखीम कमी करूनदेखील गुंतवणूकदार खूप चांगला नफा मिळवू शकतात. एका उदाहरणाच्या मदतीने हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. सुरेशने १ जानेवारी २०११ रोजी समभाग संलग्न म्युच्युअल फंडात १० लाखांची गुंतवणूक केली आणि त्याचा मित्र रमेश याने आर्थिक सल्लागाराच्या मदतीने रोखे संलग्न म्युच्युअल फंडात १० लाखांची गुंतवणूक केली आणि दरमहा ‘एसटीपी’च्या मदतीने २०,००० रुपयांची गुंतवणूक समभाग संलग्न म्युच्युअल फंडात केली. १/३/११ ते १/९/१३ या कालावधीत याप्रकारे सुमारे ६ लाख रुपयांची समभाग संलग्न म्युच्युअल फंडात रमेशने गुंतवणूक केली. १/९/२०१३ रोजी सुरेशने केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य ८.४० लाख रुपये होते तर रमेशने ‘एसटीपी’च्या मदतीने गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणुकीचे मूल्य ११.३७ लाख रुपयांपर्यंत वाढले. रमेशला १.३७ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला. एका तक्त्याच्या मदतीने हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल.

सुरेशरमेश
१ जानेवारी २०११ समभाग संलग्न 
म्युच्युअल म्युच्युअल गुंतवणूक
१० लाख
१ जानेवारी २०११ रोखे संलग्न 
म्युच्युअल फंड गुंतवणूक 
१० लाख
गुंतवणुकीचा प्रकारएकरकमी एसटीपी
१ सप्टेंबर २०१३ रोजीचे मूल्य८.४० लाख ११.३७ लाख
नफा / तोटा  १.६० तोटा १.३७ नफा

(आकडेवारी रुपयांमध्ये)

नोंद – दीर्घकालावधीसाठी समभाग संलग्न म्युच्युअल फंडात उत्तम परतावा मिळत असला तरीही सुरुवातीच्या २-३ वर्षांत उदाहरणात दर्शवल्याप्रमाणे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुंतवणुकीतील ही जोखीम कमी करण्यासाठी ‘एसटीपी’च्या मदतीने केलेली गुंतवणूक उपयुक्त ठरते.

२) आर्थिक उद्दिष्ट जवळ आल्यावरदेखील गुंतवणूकदार ‘एसटीपी’चा प्रभावीपणे वापर करून गुंतवणुकीतील जोखमीचे नियंत्रण करू शकतात. अनेकदा गुंतवणूकदार गरजेच्यावेळी शेअर बाजारात मंदी असेल तर नुकसान होईल या भीतीने गुंतवणूक करणे टाळतात. एका अर्थाने हे बरोबरदेखील आहे. कारण दीर्घकालावधीसाठी समभाग संलग्न म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तरीही जर विक्रीच्या वेळेस शेअरबाजारात मंदी असेल तर अपेक्षित लाभ मिळत नाहीत. अर्थात याकरिता गुंतवणूक न करणे या ऐवजी गुंतवणूक विक्रीचेदेखील योग्य नियोजन करणे अधिक योग्य ठरते. आर्थिक उद्दिष्ट जवळ आल्यावर समभाग संलग्न म्युच्युअल फंडातून ‘एसटीपी’च्या मदतीने रोखे संलग्न म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. उदा. मार्च २०३२ मध्ये आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करावयाचे असेल तर मार्च २०३१ पासून ‘एसटीपी’च्या मदतीने रोखे संलग्न म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी.

३) ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’चा लाभ – एसआयपीबद्दलच्या लेखात आपण ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’चा लाभ कशाप्रकारे होतो याची माहिती घेतली. जर आपण रोखे संलग्न म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक केली आणि ‘एसटीपी’च्या मदतीने समभाग संलग्न म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर गुंतवणुकीतील जोखीम कमी होणे आणि ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’ असा दुहेरी लाभ आपल्या पदरी पडतो.

हेही वाचा – Money Mantra : बँकांमधील दावा न केलेली रक्कम शोधणे आता सोपे, खातेदारांना कशी नोंदणी करता येणार? पाहा संपूर्ण प्रक्रिया

‘एसटीपी’बद्दल महत्त्वाचे मुद्दे –

  • ‘एसटीपी’मध्ये आपण दरमहा एका योजनेतून युनिटची विक्री करून दुसऱ्या योजनेत गुंतवणूक करत असतो साहजिकच आपल्याला अल्पकालीन भांडवली लाभ कर (शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स) आणि दीर्घकालीन भांडवली लाभ कर (लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स) द्यावा लागू शकतो. अर्थात आपल्याला द्यावा लागणाऱ्या करापेक्षा ‘एसटीपी’मुळे मिळणारे फायदे निश्चितच खूप जास्त असतात.
  • गुंतवणूक करताना आणि गुंतवणुकीची विक्री करून आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे अशा दोन्ही वेळेस ‘एसटीपी’ची सुविधा अत्यंत उपयुक्त ठरते.
  • ‘एसटीपी’च्या मदतीने गुंतवणूक करताना सुरुवातीच्या २-३ वर्षांत फारसा फायदा झाला नाही, तरीही दीर्घकालावधीमध्ये निश्चितच खूप चांगला फायदा होतो.

महत्त्वाचे – गुंतवणुकीतील जोखीम कमी करून उत्तम परतावा मिळवण्यासाठी ‘एसटीपी’च्या मदतीने गुंतवणूक फायदेशीर ठरते.

लेखक पुणेस्थित व्याख्याते आणि आर्थिक प्रशिक्षक आहेत

dgdinvestment@gmail.com