गुंतवणूक, घराची खरेदी- विक्री, शेअर आदी सर्व व्यवहारांच्या संदर्भात आपल्याला नेहमी अनेक प्रश्न पडतात. कधी ते कर वाचविण्याच्या संदर्भात असतात तर कधी करपरताव्याच्या संदर्भात, कधी दीर्घकालीन नफ्या संदर्भात या सर्व प्रश्नांची उत्तरे दर शनिवारी मनीमंत्र सदरातील तज्ज्ञ देतील!

प्रश्नं तुमचे, तज्ज्ञांची
तुमच्या मनातल्या शंका-प्रश्न नक्की पाठवा


प्रश्न:१ गृह कर्जासाठी बँकांचे प्रमुख निकष काय असतात ?
आपली कर्ज परतफेडीची क्षमता हा निकष प्रमुख्याने विचारात घेतला जातो , व ती आपले उत्पन्न , सध्या चालू असलेले कर्जाचे हप्ते , कौटुंबिक जबबदारी, आपले वय , आपल्या पती/पत्नीचे उत्पन्न, व्यवसाय/ नोकरीचे स्वरूप व त्याचे भविष्यातील स्थैर्य यांचा एकत्रित विचार करून ठरविली जाते. याशिवाय अर्जदाराचा सीबील किंवा तत्सम स्कोर सुद्धा विचारात घेतला जातो.

प्रश्न:२ होम लोन इन्शुरन्स म्हणजे काय व तो घेणे बंधनकारक असते का?
होम लोन विमा ही अशी एक योजना आहे जी कर्जदाराच्या परतफेडीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या थकबाकी कर्जाची परतफेड करेल. या पॉलिसीचे कव्हर दरवर्षी ज्या प्रमाणात कर्जाची परतफेड होत असते त्या प्रमाणात पॉलिसी कव्हर कमी होत असते. कालावधीदरम्यान कर्जदाराच्या मृत्यूनंतर, विमा कंपनी बँकेकडे असलेली थकबाकीची कर्ज संपूर्ण परतफेड विमा कंपनी कडून कर्ज देणाऱ्या वित्त संस्थेस केली जाते.कर्जदाराच्या मृत्यूनंतर तसेच कर्ज दुसऱ्या बँकेकडे वर्ग केले असता ही पॉलिसी संपुष्टात येते. पॉलिसी घेणे बंधनकारक नसले तरी पॉलिसी घेणे निश्चितच हितावह असते. पॉलिसी प्रीमियम एकरकमी असून तो कर्ज रकमेत समाविष्ट करून त्यानुसार इएमआय दिला जातो.

प्रश्न:३ गृहकर्जा वर आकारला जाणारा फ्लोटिंग व्याज दर बदलता येतो का?
पूर्वी असा बदल करता येत नव्हता मात्र दिनांक १७/ ८/२०२३ च्या आरबीआयच्या परिपत्रकानुसार बँकांना १/१/२०२४ पासून बँकांना फ्लोटिंग ते फिक्सड ते फ्लोटिंग असा बदल करू देण्याचा पर्याय ग्राहकांना द्यावा लागणार आहे. कर्ज परतफेडीच्या कालवधीत असा बदल किती वेळा करता येईल हेही ग्राहकांना कळविणे आता आवश्यक असणार आहे.यामुळे बाजारातील व्याज दरात होणाऱ्या बदलानुसार आपल्याला सोयीचा असणारा पर्याय आता गृह कर्जदारास निवडता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रश्न:४ गृह कर्जावरील व्याज आकारणी कशी होते?
गृह कर्जावरील व्याज आकरणी प्रामुख्याने मंथली किंवा डेली रिड्युसिंग पद्धतीने होते . कर्ज घेण्यापूर्वी बँक यातील कोणत्या पद्धतीने व्याज आकारणी करणार आहे याची माहिती अर्जदाराने करून घेणे गरजेचे आहे . शक्य तोवर डेली रिड्युसिंग पद्धतीने व्याज आकारणी करणारी बँक निवडावी.