रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट वाढवल्यानंतर बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरच्या व्याजदरात वाढीचा सिलसिला सुरूच आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयआयसीआय बँकेने बल्क एफडीवर व्याजदर वाढवला आहे. बँकेने २ कोटींपासून ५ कोटी रुपयांपर्यंत एफडी वाढवला आहे. नवे दर २२ मार्च २०२३ पासून लागू झाले आहेत. बँकेनं बल्क एफडीवर व्याज ०.२५ टक्क्यांनी वाढवलं आहे. बँक १५ महिन्यांच्या एफडीवर आता ७.२५ टक्के व्याज ग्राहकांना देते. आयसीआयसीआय बँकेने गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये बल्क एफडी व्याजदरात वाढ केली होती. आता केलेल्या वाढीनंतर ७ दिवस ते १४ दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकाला ४.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.७५ टक्के व्याज दिलं जाणार आहे. १५ दिवस ते २९ दिवसांच्या कालावधीतील एफडीवर आता सामान्य ग्राहकाला ४. ७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.७५ टक्के व्याज मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२० दिवसांच्या एफडीवर मिळणार ६.५० टक्के व्याज

३० दिवस ते ४५ दिवसांच्या एफडीवर आता सामान्य नागरिकाला ५.५० टक्के आणि सीनिअर सिटीजनला ५.५० टक्के व्याज मिळेल. ४६ दिवस ते ६० दिवसांच्या एफडीवर सामान्य जनता आणि ज्येष्ठ नागिरकांना ५.७५ टक्के व्याज मिळते. अशा प्रकारे ६१ दिवस ते ९० दिवसांच्या एफडीवर ६ टक्के, ९१ दिवस ते १२० दिवसांच्या एफडीवर ६.५० टक्के, १२१ दिवस ते १५० दिवसांच्या एफडीवर ६.५० टक्के आणि १५१ दिवस ते १८४ दिवसांच्या एफडीवर ६.५० टक्के व्याज मिळेल.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The second largest private bank in the country will give more benefits customers will get 7 25 percent interest vrd
First published on: 24-03-2023 at 11:44 IST