असे कुठले कौशल्य तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने विकसित केले तर त्याचा तुमच्या कारकीर्दीवर सर्वाधिक सकारात्मक परिणाम होईल? ते लक्षात घेत ते कौशल्य हे तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक विकासाचा लक्ष्यबिंदू राहिला पाहिजे.
या प्रश्नाचं उत्तर शोधून काढणं आणि त्यानंतर तुमची सगळी ऊर्जा त्या विशिष्ट क्षेत्रातील कामगिरी सुधारण्यावर केंद्रित करणं ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. तुमच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत विकासासाठीचा हा प्रमुख निश्चित हेतू बनतो. त्यासाठी एक विशिष्ट कालमर्यादा ठरवा. एक योजना तयार करा. तुमच्या योजनेनुसार कृती करा आणि त्यानंतर या विशिष्ट कौशल्याचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होण्यासाठी दररोज काहीतरी करा.
तुम्हांला परिणाम मिळवून देणाऱ्या सर्वात कमकुवत क्षेत्रावर तुम्ही एकदा प्रभुत्व मिळवलंत की पुन्हा हा प्रश्न विचारा की कोणते कौशल्य मला सर्वाधिक मदत करेल? आणि मग त्या क्षेत्रावर प्रभुत्व मिळेपर्यंत प्रयत्न करा. तुम्ही विशिष्ट प्रतिभा आणि क्षमता घेऊन जन्माला आला आहात. हे लक्षात घेतलंत की त्यासंबंधित कार्यक्षेत्रांत तुम्ही चांगल्या प्रकारे प्रगती साधू शकाल आणि त्याचा तुम्हांला आनंदही घेता येईल.
जागतिक दर्जाचा मायकेल जॉर्डन एकदा म्हणाला होता, ‘प्रतिभा सर्वाकडे असते, पण क्षमतेसाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात.’                                
‘गोल्स’ – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन, पृष्ठे – २५६, किंमत – २२५ रु.

Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…