हेल्थ केअर अर्थात आरोग्यसेवा क्षेत्राची गुणवत्ता आणि कार्यकक्षा रुंदावत असून त्यासंबंधित सेवा पुरविणाऱ्या प्रशिक्षित व्यक्ती, तंत्रज्ञ आणि व्यावसायिकांची गरज दुणावली आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील शिक्षणक्रम आणि व्यवसाय संधींची ओळख –

हेल्थ केअर म्हणजे रुग्णाच्या रोगाचे अचूक निदान, रोगातून मुक्त होण्यासाठी करावी लागणारी उपचार योजना, शुश्रूषा व रोगाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावी अंमलबजावणी. गेल्या काही वर्षांत आरोग्यसेवा उद्योग (हेल्थकेअर इंडस्ट्री) मोठय़ा प्रमाणात वाढीस लागल्याचे निदर्शनास आले आहे. आरोग्यसेवा या क्षेत्राची गुणवत्ता व कक्षा वेगाने रुंदावत आहेत. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची, तंत्रज्ञांची, व्यावसायिकांची गरजही वाढली आहे.
आजच्या घडीला हेल्थ केअर क्षेत्राचा सेवा उद्योगात मोठा वाटा आहे आणि तज्ज्ञांनी वर्तवलेल्या आकडेवारीनुसार, पुढील काही वर्षांत यात सातत्याने वाढ होणार आहे. मेडिकल टुरिझम- हे वैद्यकीय सेवा उद्योगाशी संबंधित नव्याने उदयास आलेले व दिवसेंदिवस वृिद्धगत होणारे सेवा क्षेत्र आहे. जगातील इतर अनेक देशांतील नागरिक काही विशिष्ट प्रकारच्या वैद्यकीय सेवा किंवा काही ठरावीक रोगांवर उपचार घेण्यासाठी भारतात येण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. उदा. काही ठरावीक उपचार – हृदय शस्त्रक्रिया, गुडघ्यावरील उपचार, विविध सौंदर्योपचार, निसर्गोपचार, दंतचिकित्सा वगरे. अशा प्रकारच्या रुग्णभ्रमंतीला मेडिकल टुरिझम किंवा हेल्थ टुरिझम असे संबोधले जाते.
देशातील वैद्यकीय सेवांचे मूल्य परदेशांशी तुलना करता खूपच वाजवी आहे. अद्ययावत उपचारांसाठी आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञान, व्यवसाय कुशलता, ज्ञान याबाबत दर्जेदार सेवा उपलब्ध होत असल्याने हेल्थकेअर उद्योगाने आपल्या देशात चांगलेच मूळ धरले आहे. या क्षेत्राला आलेली मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले कुशल व्यावसायिक व तांत्रिकदृष्टय़ा प्रशिक्षित मनुष्यबळ मुबलक प्रमाणात विकसित करणे हे नजीकच्या भविष्यात हेल्थकेअर उद्योगासमोर आव्हान आहे. यासाठी डॉक्टर व परिचारिका या महत्त्वाच्या व्यावसायिकांबरोबरच इतर अनेक पेशांतील अनुभवी प्रशिक्षित व्यक्तींची आवश्यकता मोठय़ा प्रमाणावर भासेल.
शिक्षणक्रम व उपलब्ध महाविद्यालये
०     बी.एस्सी. इन हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन. कालावधी- तीन वष्रे, पात्रता- बारावी विज्ञान उत्तीर्ण. ए. डी. एन. मेडिकल कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स, नागपूर.
०     बी.एच.एम. हॉस्पिटल मॅनेजमेन्ट. कालावधी- तीन वष्रे, पात्रता-  बारावी विज्ञान उत्तीर्ण (५० % गुणांसह), एस.एन.डी.टी महाविद्यालय, मुंबई.  
०     एम.बी.ए. हेल्थ केअर मॅनेजमेन्ट. कालावधी- दोन वष्रे , पात्रता- पदवीधर किंवा द्विपदवीधर ४५ % गुणांसह. दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट रिसर्च, नागपूर.
०     एम.बी.ए. इन हॉस्पिटल, हेल्थ केअर मॅनेजमेन्ट.  कालावधी- दोन वष्रे. पात्रता-  पदवीधर ५० % गुणांसह, सिम्बॉयसिस इन्टरनॅशनल युनिव्हर्सटिी, पुणे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे.
०     एम.बी.ए. इन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट. कालावधी- दोन वष्रे, पात्रता- एम.बी.बी.एस., एम. जी. एम. मिशन, नवी मुंबई.       डी. वाय. पाटील युनिव्हर्सटिी, नवी मुंबई.   
०     एम.एस्सी. इन हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन. कालावधी- दोन  वष्रे. पात्रता- विज्ञान किंवा समकक्ष शाखेतून पदवीधर (५५ % गुणांसह), ए.डी.एन. कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स, नागपूर.
०     मास्टर इन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट- कालावधी- दोन वष्रे, पात्रता- पदवीधर किंवा समकक्ष शिक्षण, आम्र्ड फोस्रेस मेडिकल कॉलेज, वानवडी पुणे, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई.
०     डिप्लोमा इन हेल्थ, हॉस्पिटल मॅनेजमेन्ट- कालावधी- एक वर्ष, पात्रता-  बारावी उत्तीर्ण, युनिव्हर्सटिी ऑफ पुणे.
०     डिप्लोमा इन हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन – कालावधी- एक वर्ष, पात्रता-  बारावी उत्तीर्ण, युनिव्हर्सटिी ऑफ पुणे, आम्र्ड फोस्रेस मेडिकल कॉलेज वानवडी पुणे, एस.एन.डी.टी. कॉलेज, मुंबई, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई.
०     डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट- कालावधी एक वष्रे, पात्रता-  बारावी उत्तीर्ण, युनिव्हर्सटिी ऑफ पुणे, वसंतदादा पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट, सांगली.
०     पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेन्ट- कालावधी- एक वर्ष, पात्रता-  पदवीधर. के. सी. कॉलेज ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज, महाराष्ट्र युनिव्हर्सटिी ऑफ हेल्थ सायन्सेस, युनिव्हर्सटिी ऑफ मुंबई. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन कालावधी- एक वर्ष, पात्रता- पदवीधर, गरवारे इन्स्टिटय़ूट, मुंबई.  
०     अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन फूड न्युट्रिशन मॅनेजमेन्ट  – कालावधी- दोन वष्रे, पात्रता- पदवीधर, इंडिअन इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट स्टडीज, पुणे.
०     पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिको लीगल सिस्टीम कालावधी- अर्धवेळ एक वर्ष, पात्रता-  पदवीधर, सिम्बॉयसिस सेंटर ऑफ हेल्थकेअर, पुणे.
वरील शिक्षणक्रम देशातील अन्य राज्यांतील शैक्षणिक संस्थांकडूनही चालविले जातात. हे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना खालील आस्थापानांत नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात.
व्यवसाय संधी
रुग्णालये, आरोग्य विमा क्षेत्र, स्वयंसेवी संस्था, सरकारी आरोग्यसेवा प्रकल्प, हेल्थकेअर विपणन क्षेत्र, हेल्थकेअर डायग्नोस्टिक चेन्स, आरोग्य पुनर्वसन केंद्र, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना वगरे.
या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये कामाचे स्वरूप किंवा हुद्दे खालीलप्रमाणे  – बिझनेस डेव्हलपमेन्ट मॅनेजर, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, ऑपरेशन्स एक्सलन्स मॅनेजर, युटिलिटी सíव्हस मॅनेजर, टोटल क्वॉलिटी मॅनेजर, पेशंट वेल्फेअर कोऑर्डिनेटर, फ्लोअर मॅनेजर, पेशंट केअर मॅनेजर, क्लिनिकल सíव्हस मॅनेजर, सपोर्ट सíव्हस मॅनेजर.
तेव्हा मित्रमत्रिणींनो,  आरोग्यसेवा, मेडिकल टुरिझम या क्षेत्रांचा विचार करायला काय हरकत आहे? त्याचप्रमाणे १० + २ हा शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर तुलनेने कमी गुण मिळाल्याने, इच्छा असूनही वैद्यक शिक्षणक्रमातील प्रवेशाला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय व्यवसायाशीच संबंधित विषयांतील शिक्षण घेण्याची, नोकरी किंवा स्वयंरोजगार मिळवण्याची खरे तर ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.