एमपीएससी मंत्र : फारुक नाईकवाडे

महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून भरण्यात येणारी पदे, त्यासाठीच्या अर्हता, सर्वसाधारण परीक्षेचे स्वरूप याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या आणि पुढील लेखामध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, अभ्यासक्रम व गुणांकन इत्यादी बाबत चर्चा करण्यात येत आहे.

पूर्व परीक्षा योजना

प्रश्नपत्रिका  एक.  प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे : पूर्व परीक्षा निकाल वस्तुनिष्ठ स्वरूपांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. तसेच प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.

भरायच्या एकूण पदांच्या सुमारे ८ पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील. अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची सीमारेषा (Cut Off Line)  निश्चित करण्यात येते. तद्नंतर, दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक प्रवर्गातील पदांसाठी १० पट उमेदवार उपलब्ध होतील अशा रीतीने सीमारेषा खाली ओढली जाते. तथापि अशा पद्धतीने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेले अतिरिक्त उमेदवार केवळ त्यांच्या राखीव प्रवर्गासाठीच्या पदावरच निवडीसाठी पात्र ठरतात.

केवळ सर्वसाधारण (अमागास) उमेदवारांच्या सीमारेषेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची उमेदवारी अंतिम निवडीच्या वेळी सर्वसाधारण (अमागास) पदासाठी विचारात घेतली जाते. सर्वसाधारण (अमागास) उमेदवारांसाठी असलेली सीमारेषा शिथिल करून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेले उमेदवार अंतिम शिफारशीच्या वेळी फक्त संबंधित आरक्षित पदासाठी पात्र ठरतात.

मुख्य परीक्षा व मुलाखतीबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.