02 June 2020

News Flash

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा भूगोल प्रश्न विश्लेषण

गट ब अराजपत्रित सेवांसाठीच्या पूर्वपरीक्षेमध्ये भूगोल घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे

संग्रहित छायाचित्र

रोहिणी शहा

गट ब अराजपत्रित सेवांसाठीच्या पूर्वपरीक्षेमध्ये भूगोल घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित केलेला आहे:

– भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) — पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

या अभ्यासक्रमाच्या आधारे तयारी करण्यापूर्वी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सन २०१७ पासूनच्या प्रश्नपत्रिकांमधील काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू. (या प्रश्नांतील योग्य उत्तराचा पर्याय ठळक केलेला आहे.)

प्रश्न १)  चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे?

१) कृष्णा आणि कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान

२) गोदावरी व कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान

३) गंगा व महानदी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान

४) महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान

प्रश्न २) जालना जिल्ह्य़ाच्या सीमा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्य़ांशी जोडल्या आहेत?

अ. बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद

ब. बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, औरंगाबाद, जळगाव

क. औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा

पर्यायी उत्तरे:

१) फक्त विधान अ बरोबर आहे.

२) फक्त विधान ब बरोबर आहे.

३) फक्त विधान क बरोबर आहे.

४) वरील सर्व विधाने चूक आहेत.

प्रश्न ३) महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे?

१) शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, सातमाळा, अजिंठा

२) अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव

३) सातमाळा, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, अजिंठा

४) अजिंठा, सातमाळा, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड

प्रश्न ४) राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर व बिकानेर जिल्ह्य़ांमध्ये ——————— ही खनिजे सापडतात.

१) कच्चे लोह, दगडी कोळसा आणि मॅंगनीज

२) बॉक्साइट, अभ्रक आणि तांबे

३) चुनखडक, जिप्सम आणि मीठ

४) क्रोमाइट, सिलिका आणि कच्चे लोह

प्रश्न ५) सन २०११च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची संख्या महाराष्ट्रात ————————— जिल्ह्य़ात सर्वाधिक आढळते.

१) नाशिक    २) औरंगाबाद

३) पुणे       ४) सोलापूर

प्रश्न ६. जोडय़ा लावा.

स्तंभ I      स्तंभ I I

प्राणी        ब्रीड

अ. गाई      i. मेहसाणा

ब. म्हशी     ii. गीर

क. शेळी     iii. गड्डी

ड. मेंढी      iv. जमुनापुरी

पर्यायी उत्तरे

१) अ— ii; ब— iii; क— iv; ड—i

२)  अ— i    ; ब— ii; क— iv ५; ड— iii

३) अ— ii; ब— i    ; क— iv; ड— iii

४) अ— ii; ब— i; क— ii; ड— iv

 

प्रश्न ७. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांचे खालीलपैकी कोणते/ती वैशिष्टय़/ष्टय़े बरोबर आहे/त?

अ. अत्यंत घनदाट जंगले        ब. वार्षिक पानगळ होते

क. लाकूड टणक व टिकाऊ असते ड. एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते.

पर्यायी उत्तरे:

१) अ फक्त   २) अ, क आणि ड

३) क फक्त   ४) ब आणि क

या प्रातिनिधिक प्रश्नांच्या आणि एकूणच विश्लेषणाच्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे पुढीलप्रमाणे..

ल्ल भारताचा प्राकृतिक भूगोल, कृषी व उद्योग यांव्यतिरिक्त आर्थिक भूगोलाचे घटक, महाराष्ट्राचा राजकीय भूगोल, जनगणना आणि सामाजिक भूगोल या घटकांचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरी त्यांवर प्रश्न विचारलेले दिसून येतात. त्यामुळे अभ्यासक्रमातील सर्व मुद्दय़ांसहित देश व राज्याचा प्राकृतिक, आर्थिक व सामाजिक भूगोल अभ्यासणे आवश्यक आहे.

ल्लसन २०१७ व २०१८ मधील बहुतांश प्रश्न हे एका शब्दाचा पर्याय असलेले सरळसोट प्रकारचे प्रश्न होते. मात्र सन २०१९ चे प्रश्न पाहता जोडय़ा लावण्यासारखे तसेच इतर बहुविधानी पर्याय असलेल्या प्रश्नांचे प्रमाण वाढलेले दिसते. मात्र तरीही विचारलेले मुद्दे हे विश्लेषणात्मक कमी आणि पारंपरिक पद्धतीचे जास्त आहेत.

ल्ल प्रश्नांचे स्वरूप बदलले असले तरी काठिण्य पातळी वाढली आहे असे नाही. ठउएफळ आणि पाठय़पुस्तक मंडळाच्या पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर हे प्रश्न सहज सोडविता येतात.

ल्ल सन २०१९मध्ये नकाशावर आधारित राजकीय भूगोलावरील प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे भूगोलाच्या सर्व आयामांचा अभ्यास नकाशा समोर ठेवून स्थान निश्चित समजून घेऊन (Spatial understanding) करणे फायदेशीर ठरणार आहे.

ल्ल आजवर अभ्यासक्रमातील पृथ्वी, महाराष्ट्रातील जमिनी या दोन घटकांवर प्रश्न विचारलेले नाहीत. त्यामुळे सन २०२० मध्ये परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या घटकांवर भर देऊन अभ्यास केल्यास फायदेशीर ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 1:07 am

Web Title: secondary service pre geography question analysis abn 97
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : यूपीएससी पूर्वपरीक्षा : भूगोल
2 एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा इतिहास घटकाची तयारी
3 यूपीएससी पूर्वपरीक्षा – भूगोल
Just Now!
X