फारुक नाईकवाडे
राज्य लोकसेवा आयोगाकडून सन २०२० मध्ये प्रस्तावित असलेल्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेची जाहिरात मेमध्ये प्रकाशित होईल आणि पूर्व परीक्षा जुलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे तयारीसाठी किमान सहा महिने उपलब्ध आहेत हे लक्षात घेऊन अर्हताप्राप्त उमेदवारांनी तयारी सुरू केली पाहिजे.
मागील लेखांमध्ये भाषा घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या व पुढील लेखांमध्ये सामान्य अध्ययन घटकातील उपघटाकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येईल. या लेखामध्ये सामान्य अध्ययन घटकावर मागील प्रश्न पत्रिकांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे विचारात घ्यायचे मुद्दे याबाबत चर्चा करण्यात येत आहे. काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू.
(योग्य उत्तराचे पर्याय ठळक करण्यात आले आहेत.)
* प्रश्न : एप्रिल २०१७ मध्ये भारत व बांग्लादेशमध्ये खालीलप्रमाणे करार करण्यात आले.
अ. भारत बांग्लादेशाला ३२,१४० कोटी रुपये देणार.
ब. शांतिपूर्ण कार्यासाठी परमाणू ऊर्जेचा वापर करणार.
क. तिस्ता नदी पाणीवाटपाचे योग्य समाधान करण्यात आले.
ड. एकूण २२ करार करण्यात आले.
वरीलपकी कोणते/ ती विधान /ने चुकीचे आहे/त
पर्यायी उत्तरे
१) फक्त ड २) फक्त क
३) अ व ड फक्त ४) क व ड फक्त
* प्रश्न : खालील विधाने विचारात घ्या.
अ. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या
अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
ब. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या
अध्यक्ष व सदस्यांना गरवर्तनाच्या कारणावरून पंतप्रधान बडतर्फ करू शकतात.
क. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कालावधी ५ वर्षे किंवा
६२ वर्षे यापकी जो आधी असेल
तो असा विहित केलेला आहे.
वरीलपकी कोणते/ ती विधान /ने चुकीचे आहे/त
पर्यायी उत्तरे
१) फक्त अ २) अ आणि ब
३) फक्त क ४) ब आणि क
* प्रश्न : मानव धर्म सभेचे संस्थापक कोण होते?
१) महात्मा फुले
२) महात्मा गोविंद रानडे
३) लॉर्ड मेकॉले
४) गोपाळ कृष्ण गोखले
* प्रश्न : भारतात १९५१ साली प्रथम वर्गाची शहरे नऊ होती. त्यांची संख्या १९७१ आणि १९९१ साली किती झाली?
१) ११ आणि २७
२) १२ आणि १८
३) २८ आणि ३६
४) १८ आणि २७
* प्रश्न : शेती उद्योगामध्ये इ कॉमर्स म्हणजे काय?
१) वस्तू आणि सेवांची डिजिटल यंत्रणेमार्फत खरेदी व विक्री करणे
२) मालाची निर्यात करणे.
३) इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करणे.
४) वरीलपैकी कोणतेही नाही.
* प्रश्न : ग्रामीण भागातील बेकारी कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने (१९७३) खालीलपकी कोणती योजना सर्वप्रथम राबविली होती?
१) SFDA २) रोहयो (EGS)
३) नरेगा (NREGA)
४) IRDP
* प्रश्न : हवेतील प्रदूषण हे वातावरणातील थेट अथवा अप्रत्यक्ष ——– बदलाचा विशिष्ट परिणाम आहे.
१) भौतिक
२) रासायनिक ३० जैविक
४) वरील सर्व
* प्रश्न : बचत गटांचा मुख्य उद्देश खालीलपकी कोणता आहे?
अ. अल्प बचतीचा प्रसार करणे
ब. मोठय़ा रकमेची कर्जे वितरित करणे
क. उत्पादक घटकांचे वाटप करणे
ड. अल्प प्रमाणावर कर्जे देणे
(छोटय़ा रकमेची)
वरीलपकी कोणते/ ती विधान /ने बरोबर आहे/त
पर्यायी उत्तरे
१) फक्त अ
२) फक्त ब
३) क आणि ड फक्त
४) अ आणि ड फक्त
वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे पुढील बाबी लक्षात येतात.
४५ पकी किमान १४ ते १५ प्रश्न हे बहुविधानी आहेत.
एकूण नऊ उपघटकांसाठी प्रत्येक उपघटकासाठी प्रश्नसंख्या निश्चित केलेली नाही. मात्र सर्वात जास्त भर इतिहास, समाजसुधारक व ग्रामविकासावर आहे तर सर्वात कमी भर संगणक आणि माहिती तंत्रज्ञानावर आहे.
शाश्वत विकस आणि भारतीय अर्थव्यवस्था आणि तिच्यावरील उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा परिणाम या उपघटकावर संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
भारतीय राजकीय व्यवस्था या घटकावर बहुतांश प्रश्न हे बहुविधानी आणि नेमकी माहिती विचारणारे आहेत. चालू घडामोडींवरील प्रश्न बहुतांशपणे बहुविधानी आणि नेमक्या मुद्दय़ांची माहिती असेल तरच सोडविता येतील असे आहेत.
भारताच्या भूगोलावर सन २०१७ मध्ये सरळसोट पण नेमकी तथ्यात्मक माहिती विचारणारे आहेत तर सन २०१८ मध्ये संकल्पनात्मक आणि बहुविधानी अशा प्रकारचे आहेत.
एकूण प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास एक बाब निश्चितपणे सांगता येते की उपघटकांवर किती, कशा प्रकारचे आणि स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात
येतील याचा नेमका अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे संकल्पनात्मक, तथ्यात्मक आणि विश्लेषणात्मक अशा सर्व पलूंचा आढावा घेणे चालू घडामोडी, राज्यव्यवस्था, भूगोल, अर्थव्यवस्था आणि ग्रामविकास या उपघटाकांसाठी आवश्यक आहे.