ज्यांना काही हटके, चाकोरीच्या पलीकडचे आणि साहसी करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी काही मुलखावेगळ्या वाटांची आणि संबंधित प्रशिक्षणक्रमांची माहिती देत आहोत..
मळलेली पाऊलवाट सोडून, चाकोरीबाहेर झेपावत स्वत:ला सिद्ध करण्याची धमक असेल, काहीतरी जगावेगळं करून दाखवण्याची पॅशन असेल, तर अशा धाडसी मनोवृत्तीच्या युवक-युवतींचे करिअरसुद्धा साहसी असू शकते. साहसी करिअरचा राजमार्ग म्हणजे देशाच्या संरक्षण विषयक वेगवेगळ्या दलांमध्ये प्रवेश घेणे. मात्र, ज्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने ते शक्य होत नाही अशांना केवळ छंद, हौस म्हणून कधीमधी उपयोगात येणाऱ्या आपल्या
साहसी वृत्तीचा उपयोग जोडव्यवसाय किंवा हंगामी स्वयंरोजगार म्हणून मूळ करिअरच्या मजबूत बांधणीसाठीही करता येईल.
या लेखात, आपण अशाच काही साहसी करिअर वाटांची ओळख करून घेऊयात.
* साहसयुक्त पर्यटन (अॅडव्हेंचर टुरिझम) :
आज पर्यटन व्यवसायाचे स्वरूप आणि आवाका बदलताना दिसून येत आहे, देशी-विदेशी पर्यटकांचा ओढा भारतातील पर्यटनभ्रमंतीकडे वाढलेला जाणवत आहे. निव्वळ स्थलदर्शन किंवा विश्रांती या मूलभूत गरजांव्यतिरिक्त, निसर्गाशी निगडित साहसी खेळ किंवा धाडसी अनुभव घेण्याकडे पर्यटकांचा कल वाढू लागला आहे. गिर्यारोहण, रॅपलिंग, रॉकक्लाइंबिंग, व्हॅली क्रॉसिंग, जंगल भ्रमंती, स्कीइंग, पॅरासेलिंग, पॅराग्लायिडग अशा साहसी क्रीडा प्रकारांना मागणी वाढली आहे. काही पर्यटनस्थळे केवळ या धाडसी अनुभवासाठीच लोकप्रिय होऊन यांतून व्यापारउदीम वाढत आहे तसेच या साहसी खेळांशी निगडित रोजगार संधीही उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर अंगी विशिष्ट क्षमता बाणवून घेणे गरजेचे ठरते.
पर्यटन आणि भ्रमंती यांची मनापासून आवड, निसर्गाशी जुळवून घेण्याची शारीरिक, मानसिक क्षमता, खेळांची आवड, उत्तम संवाद कौशल्य, दिशाज्ञान, भूगोल, विज्ञान यांचे मूलभूत ज्ञान, कणखर शरीर आणि मानसिकता असणाऱ्या व्यक्ती पर्यटन व्यवसायात अंतर्भूत होणाऱ्या साहसी उपक्रमांत उत्तम प्रगती करू शकतात.
अशा क्षेत्रांत टूर गाइड, अॅडव्हेंचर टूर गाइड, अॅडव्हेंचर ट्रेनर अशा प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध आहेत. विविध प्रवासी संस्था, पर्यटन व्यावसायिक, हॉलिडे रिसॉर्ट अशा ठिकाणी प्रशिक्षितांना नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
* साहसी खेळ– साहसी वृत्तीचा युवावर्ग साहसी खेळांचे प्रशिक्षण घेऊन, त्या कौशल्याचा उपयोग प्रगतीसाठी करू शकतात. साहसी खेळ प्रामुख्याने तीन प्रकारांत विभागता येतील-
* जमिनीवरील साहसी खेळ– गिर्यारोहण, प्रस्तरारोहण, स्केट बोìडग, अॅडव्हेंचर रेसिंग, ट्रेकिंग, माऊंटन बायकिंग.
* पाण्यातील साहसी खेळ– स्कुबा डायिव्हग, राफ्टिंग, कयाकिंग, क्लिफ डायिव्हग, स्नॉर्केलिंग, पॉवरबोट रेसिंग, िवड सìफग.
* हवेतील साहसी खेळ– बंजी जंपिंग, पॅराग्लायिडग, स्कायडायिव्हग, स्काय सìफग.
* गिर्यारोहण मार्गदर्शक– गिर्यारोहण, प्रस्तरारोहण विषयक प्रशिक्षक होण्याकरता विशिष्ट भौगोलिक प्रदेशाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. त्याकरता आवश्यक कौशल्यांचे रीतसर प्रशिक्षण घेणे अनिवार्य ठरते. गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
* हिमालयन माउंटनीअिरग इन्स्टिटय़ूट, दार्जििलग, पश्चिम बंगाल.
वेबसाइट- www.hmi-darjeeling.com
* नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटनिअिरग, उत्तरकाशी.
वेबसाइट- www.nimindia.net
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, पणजी, गोवा.
वेबसाइट- www.niws.nic.in
* साहसी सहल प्रशिक्षक किंवा आयोजक – साहसी क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षणवर्ग किंवा साहस शिबिरांचे आयोजन, फ्री-लान्स तत्त्वावर कौशल्यसेवा पुरवणे अशा स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात.
* वॉटर, एअरो स्पोर्ट्स ट्रेनर– पाण्याखालील व हवेतील साहसी खेळांतील या आव्हानात्मक करिअर प्रकारांसाठी आवश्यक ते प्रशिक्षण गरजेचे आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये साहसी वृत्ती, खेळांची, निसर्गाची आवड, भटकंती, शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती असावी लागते. त्यांनी संबंधित क्रीडाप्रकारांचे रीतसर प्रशिक्षण घेणे अनिवार्य ठरते, त्याचबरोबर त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापराचे प्रशिक्षण घेतलेले असावे.
वरील साहसी क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती काही विशिष्ट भौगोलिक प्रदेशांत अंगभूत कौशल्य सेवेद्वारा स्वयंरोजगार मिळवू शकतात. (सह्यद्री, पर्वतातील गिरिशिखरे, महाराष्ट्र गोव्यातील किनारपट्टी भाग, भारताच्या उत्तरेकडील हिमाच्छादित डोंगररांगा, लेह-लदाख.)
* व्यावसायिक साहसवीर (स्टंटमन) – बहुतांश चित्रपटांतून, मग तो कोणत्याही भाषेत चित्रित झाला असला तरी त्यात थोडय़ाफार प्रमाणात साहसी दृश्यांचा नेहमीच अंतर्भाव होत असतो. अशी साहसी दृश्ये बऱ्याचदा व्यावसायिक साहसवीरांवर चित्रित होताना दिसतात. विविध दूरदर्शन वाहिन्यांवरील रिअॅलिटी शोज, चित्रपट, मालिका यांतून या व्यावसायिक साहसवीरांना संधी उपलब्ध होऊ शकतात.
* अग्निशमन यंत्रणा– रासायनिक उद्योग, गजबजलेल्या लोकवस्ती, ज्वलनशील पदार्थाची कोठारे या सर्व ठिकाणी, आग लागून मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी अथवा वित्तहानी होण्याची शक्यता असते, या संकटांचा सामना करण्यासाठी प्रत्येक प्रभागातून शासनाची अग्निशमन सेवा कार्यरत असते. या यंत्रणेतील रोजगारसंधी ही साहसी म्हणायला हवी.
यासाठी प्रशिक्षण पुरवणाऱ्या महाराष्ट्रातील संस्था खालीलप्रमाणे आहेत-
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फायर इंजिनीअिरग, सेफ्टी मॅनेजमेंट, नागपूर.
वेबसाइट- www.nifesmindia.net
* आपत्कालीन व्यवस्थापन (डिझास्टर मॅनेजमेंट)- नसíगक आपत्ती (पूर, भूकंप, सुनामी) किंवा मानवनिर्मित दुर्घटना (बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, अपघात) अशा वेळी संकटातील सजीवांचे रक्षण, सुटका, शोधकार्य व विस्थापितांच्या पुनर्वसन कामात सक्रिय मदत, सरकारी संस्था, सरकारमान्य सेवाभावी संस्था, खासगी सेवा संस्था यांद्वारे केली जाते. या अंतर्गत, साहसी युवावर्गाला, प्रत्यक्ष घटनास्थळी कार्यरत होता येते. या क्षेत्रातील रीतसर प्रशिक्षण देणाऱ्या संस्था खालीलप्रमाणे आहेत-
* जमशेदजी टाटा स्कूल ऑफ डिझास्टर स्टडीज, मुंबई. वेबसाइट- www.tiss.edu
* इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. वेबसाइट- www.rcmumbai.ignou.ac.in
* इन्स्टिटय़ूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड फायर सायन्स. वेबसाइट- www.idmfs.com
* खासगी गुप्तहेर (प्रायव्हेट डिटेक्टिव्ह) – साहसी युवावर्गासाठी हा एक हटके करिअर पर्याय होऊ शकतो. सत्यशोधन, कट कारस्थाने, चोरी, गुन्हे शोध, कौटुंबिक किंवा कार्यालयीन राजकारणाचा छडा लावणे, अपत्य किंवा जोडीदाराची सुरक्षा या कारणांसाठी खासगी गुप्तहेर नेमले जातात, या क्षेत्रात काम करण्यासाठी, मेहनत, कारणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याची जिद्द, तर्कसुसंगत विचारसरणी, धाडसी मनोवृत्ती, आवश्यक त्या आधुनिक तंत्रज्ञांनाची जाण या गोष्टी अत्यावश्यक ठरतात.
* साहसी छायाचित्रण
* वन्यजीवन छायाचित्रण– छायाचित्रणच्या जोडीला धाडसी वत्ती, जंगलभ्रमंतीची, पशुपक्ष्यांची आवड, चिकाटी आणि संयम असलेल्या व्यक्तींसाठी हा एक पर्याय असू शकतो. मुक्त छायाचित्रकार म्हणून स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात. वृत्तपत्रे, मासिके, जाहिरात कंपन्या, दूरदर्शन वाहिन्यांसाठी स्वतंत्ररीत्या छायाचित्रणाची कामे मिळू शकतात. छायाचित्रण क्षेत्रातील प्रशिक्षण देणारी संस्था – जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई. वेबसाइट- www.jjiaa.org/home.htm
* पाण्याखालील छायाचित्रण– या प्रकारातील छायाचित्रकाराला उत्तम स्कुबा डायव्हिंग येणे गरजेचे आहे. पाण्याखालील, प्राणीजगत, वनस्पती आणि जमिनीची रूपे, त्यांचा अभ्यास आणि निरीक्षण, त्याचे छायाचित्रण करून, इतरांना तो आनंद व माहिती मिळवून देणे, हा या छायाचित्रणामागील प्रमुख हेतू. म्हणता येईल.
जाहिरात कंपन्या, प्रवासी कंपन्या, दूरदर्शन वाहिन्या येथे मुक्त छायाचित्रकार म्हणून स्वयंरोजगार संधी मिळू शकतात.
geetazsoni@yahoo.co.in