उमेदवारांनी पदवी परीक्षा हिंदी व इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण करून त्यानंतर हिंदी अथवा इंग्रजीतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली
असावी अथवा हिंदी- इंग्रजी- हिंदी विषयातील भाषांतर पदविका पात्रता पूर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.
वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ सप्टेंबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल (ईस्टर्न) फ्रंटियर हेडक्वार्टर, आयटीबी पोलीस, शीला कॉम्प्लेक्स, विधानसभा मार्ग, रेडिओ स्टेशनजवळ, हजरतगंज, लखनऊ २२६००१ (उ. प्र.) या पत्त्यावर २३ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावे.

संरक्षण मंत्रालयांतर्गत संरक्षण उत्पादन विभाग, मुंबई येथे कनिष्ठ कारकुनांच्या २ जागा
अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे अद्ययावत ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ ऑक्टोबर २०१५च्या अंकातील संरक्षण मंत्रालय- संरक्षण उत्पादन विभागाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टोरेट जनरल ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स, चीफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट (नेव्हल स्टोर्स), डीक्यूएएन/ एनएमआरएल कॉम्प्लेक्स, आठवा मजला, नौदल गोदी, टायगर गेट, मुंबई- ४०००२३ या पत्त्यावर २४ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

संरक्षण मंत्रालयांतर्गत डीआरडीओ, हैदराबाद येथे फेलोशिपच्या ४ जागा
अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगमधील पदवी अथवा पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘डीआरडीओ’ची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डिफेन्स रिसर्च डेव्हलमेंट ऑर्गनायझेशन, डीआरडीओ, सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्सड् सिस्टीम, यादगारपल्ली (५), कीआर (एम), हैदराबाद- ५०१३०१ या पत्त्यावर २४ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

पूर्वतटीय रेल्वेत खेळाडूंसाठी ४६ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल, वेटलिफ्टिंग, क्रिकेट, टेबलटेनिस, अ‍ॅथलेटिक्स यांसारख्या क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी.
वयोमर्यादा २८ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ सप्टेंबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली पूर्वतटीय रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा http://www.eastcoastail.indianrailway. gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रुटमेंट), दुसरा मजला, साऊथ ब्लॉक, रेल सदन, पोस्ट मंचेश्वर, चंद्रशेखरपूर, भुवनेश्वर (ओडिशा)- ७५१०१७ या पत्त्यावर २६ ऑक्टोबर २०१५ पर्यंत या पत्त्यावर पाठवावेत.

सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिटय़ूट, नवी दिल्ली येथे साहाय्यकांच्या ९ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत व ते इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिटय़ूट जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.crridom.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज कंट्रोलर ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिटय़ूट, दिल्ली- मथुरा मार्ग, पोस्ट ऑफिस सीआरआरआय, नवी दिल्ली ११००२५ या पत्त्यावर २६ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

सैन्यदलात पदवीधर अभियंत्यासाठी ७० जागा
उमेदवार सिव्हिल, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर वा इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत अथवा इंजिनीअरिंग पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
ते शारीरिकदृष्टय़ा पात्र असावेत.
वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ सप्टेंबर- २ ऑक्टोबर २०१५च्या अंकातील सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २७ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

सैन्यदलाच्या शिक्षण विभागात १० जागा
उमेदवार इंग्रजी, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, लोक प्रशासन, सांख्यिकी, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा विदेशी भाषांमधील पात्रताधारक असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ सप्टेंबर- २ ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज २७ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय प्रदेश प्रशासन, दमण येथे कनिष्ठ कारकुनांच्या ५ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५ च्या अंकातील दमण प्रशासनाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडिशनल सेक्रेटरी (पर्सोनेल), युनिटन टेरिटरी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ दमण अ‍ॅण्ड दिव डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मस्, सेक्रेटरिएट, दमण या पत्त्यावर २८ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.