दि इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे घेण्यात येणाऱ्या सीएस – फाऊंडेशन प्रोग्रॅम या मूलभूत अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी बारावीची परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते बारावीच्या परीक्षेला बसलेले असावेत.

अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क – अर्जदारांनी आपल्या अर्जासह प्रवेश शुल्क म्हणून ४,५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियामध्ये भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी. दूरध्वनी क्र. ०११-३३१३२३३३ वर संपर्क साधावा. अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.icsi.edu या संकेतस्थळांना भेट द्यावी.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी संपर्क केंद्र – महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या संदर्भात अधिक माहिती राज्यातील पश्चिम भारत क्षेत्र कार्यालय मुंबई-  ६१३०७९०० (९०१, ९०२ आणि ९०४) नवी मुंबई- २७५७७८१६, पुणे- २४२६३२२८ अथवा ठाणे- २५८९१३३३, २५८९३७९३ वर संपर्क साधावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१७ आहे. बारावी उत्तीर्ण अशा ज्या विद्यार्थ्यांचा आवश्यक पात्रतेसह कंपनी सेक्रेटरी म्हणून आपले करिअर सुरू करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा अवश्य विचार करावा.