• मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे करणे (कलम १२२.)
  • मोटार वाहनचालकाने सार्वजनिक ठिकाणी आपले वाहन उभे करताना इतर वाहनचालकांना धोका, अडथळा किंवा त्रास होणार नाही यांची खबरदारी घ्यावी.
  • वाहनाच्या बाहेर लटकून अथवा वर बसून प्रवास करू नये.
  • चालकाने वाहन चालविताना अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे कोणत्याही इसमास बसवू नये अथवा वस्तू ठेवू नये (कलम १२५.)
  • चालकाने वाहन उभे करून जाताना वाहनाचे इंजिन बंद करावे. वाहन गियरमध्ये ठेवून, हातरोधक लावून ते पूर्ण लॉक करावे. चावी स्वत:जवळ घेऊन जावी (कलम १२६.)
  • दुचाकी वाहनचालकाने आपल्या वाहनाच्या मागील सीटवर एकापेक्षा अधिक व्यक्ती नेऊ नयेत (कलम १२८.)
  • वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, विमा, प्रदूषण नियंत्रण दाखला व आपले ड्रायव्हिंग लायसन्स नेहमी जवळ बाळगा आणि गणवेशातील पोलीस किंवा आर.टी.ओ. अधिकाऱ्याने मागितल्यावर त्वरित सादर करा. व्यावसायिक वाहन असल्यास वरील कागदपत्रांशिवाय परवाना व योग्यता प्रमाणपत्रदेखील जवळ बाळगणे आवश्यक आहे (कलम १३०.)
  • अपघात घडल्यास चालकाची कर्तव्ये : अपघातास कारणीभूत झालेल्या वाहनचालकाने जखमींना ताबडतोब वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात घेऊन जाणे बंधनकारक आहे. तसेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्वरित खबर देणे आवश्यक आहे (कलम १३४.)
  • ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालविणे कायदेशीर गुन्हा असून त्यास ३ महिने कैद, ५०० रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात (कलम १८०.)
  • ज्या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही अशा व्यक्तीस वाहन चालविण्यास दिल्यास वाहन मालकास ३ महिने कैद, १ हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात(कलम १८१.)
  • दारू पिऊन किंवा अमली पदार्थाच्या नशेत वाहन चालविल्यास पहिल्या अपराधाबद्दल ६ महिने कैद किंवा दंड २ हजार रुपये किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित किंवा रद्द होते (कलम १८५.)