* सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स, नवी दिल्ली येथे असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगच्या २० जागा–
उमेदवारांनी कॉम्प्युटर सायन्स वा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमधील पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी गेट- २०१६ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी.
वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १२ ते १८ नोव्हेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंटर फॉर रेल्वे इन्फरमेंशन सिस्टिमची जाहिरात पहावी अथवा सेंटरच्या ६६६.ू१्र२.१ॠ.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०१६.
* ‘नाल्को’मध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्ससाठी
५५ जागा- अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल वा केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी ‘गेट २०१६’ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ नोव्हेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली नाल्कोची जाहिरात पहावी अथवा कंपनीच्या www.nalcoindia.com संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०१६.
* संरक्षण मंत्रालयांतर्गत एएससी, बंगलोर येथे कॅटरिंग इंस्ट्रक्टर म्हणून संधी–
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व पाक कला क्षेत्रातील प्रशिक्षित असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १२ ते १८ नोव्हेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली एएससी ट्रेनिंग सेंटर, बंगलोरची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दी कमांडंट, २ एएससी ट्रेनिंग सेंटर, बंगलोर- ९००४९३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०१६.
* कर्मचारी भविष्य निधी कार्यालयात मुंबईसह विविध ठिकाणी नेमण्यासाठी ऑडिटरच्या ५५ जागा–
अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ ते ११ नोव्हेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची जाहिरात पहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज रिजनल प्रॉव्हिडंट कमिशनर (एचआरएम), भविष्य निधी भवन, १४, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली ११००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०१६.
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे बायो–सायन्सेस अॅण्ड बायो–
इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, एनर्जी सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग, ह्य़ुमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्सेस, इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर व मेकॅनिकल इंजीनिअरिंगमधील संशोधनपर संधी- अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९ ते २५ नोव्हेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली आयआयटी मुंबईची जाहिरात पहावी अथवा दूरध्वनी क्र. ०२२-२५७६५९५१ वर संपर्क साधावा. संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट रजिस्ट्रार (आर अॅण्ड डी ऑफिस), आयआरसीसी विंग, एसजेएमएसओएम बिल्डिंग, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पवई, मुंबई ४०००७६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१६.
* सीएई ऑक्सफर्ड एव्हिएशन अकादमी, गोंदिया येथे विमान चालकांसाठी संधी–
अधिक माहिती व तपशिलासाठी अकादमीच्या http://www.caeoaa.com/nfti-gondia/#.WDwDTNR95kg या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०१६.