*   बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्यखात्याअंतर्गत अ‍ॅक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालयात ‘निम्न वैद्यकीय कार्यकर्ता’ या संवर्गातील ७ रिक्त पदांची भरती.

पात्रता – १२ वी उत्तीर्ण  ‘कुष्ठरोग तंत्रज्ञ’ म्हणून मान्यताप्राप्त संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र  १० वी किंवा १२वीला १०० गुणांचा मराठी विषय असावा.

वयोमर्यादा – २८ ते ३८ वष्रे. (मागासवर्गीय – १८ ते ४३ वष्रे)  <http://portal.mcgm.gov.in/&gt;   या संकेतस्थळावरील जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. १० एप्रिल २०१७.

* परिवार कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र (स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय), मुंबई यांची प्रवेश सूचना कौशल्याधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम २०१७-१८.

(१) डायबेटिज एज्युकेटर. पात्रता – पब्लिक हेल्थ, न्यूट्रिशन, नìसग, फार्माकोलॉजी, ऑक्युपेशनल किंवा फिजिओथेरपी पदवीधर (३ महिने.)

(२) होम एड असिस्टंट. पात्रता – १२ वी (विज्ञान) (४ महिने.)

(३) जनरल डय़ूटी असिस्टंट. पात्रता – १२ वी (विज्ञान) (६ महिने.)

(४) सॅनिटरी इन्स्पेक्टर. पात्रता – १२ वी (विज्ञान) (१२ महिने.)

(५) फर्स्ट रिस्पोंडर. किमान ८ वी पास. पोलीस, औद्योगिक कामगार, सुरक्षा रक्षक, शालेय शिक्षक, ड्रायव्हर इ. यांना प्राधान्य (३ दिवस.)

वयोमर्यादा – १८ ते ३० वष्रे (इमाव – ३३ वष्रे, अजा/अज – ३५ वष्रे) एकूण कोर्ससाठी

एकूण १० जागा.

प्रशिक्षण शुल्क – रु. २००/-. अजा/अज यांना शुल्क लागू नाही. संस्थेच्या <http://www.fwtrc.gov.in/>  या संकेतस्थळावर असलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातील अर्ज दि. २१ एप्रिल २०१७ पर्यंत स्वीकारले जातील.

*   केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये भरती.

(१) सब इन्स्पेक्टर/ ओव्हरसियर (सिव्हिल) (१३५ पदे) पात्रता – सिव्हिल इंजिनीअिरगमधील अभियांत्रिकी पदविका. उमेदवाराचा जन्म ६ मे १९८७ ते ५ मे १९९६ दरम्यानचा असावा.

(२) एएसआय/ड्राफ्ट्समन (३ पदे)

पात्रता – सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनीअिरगमधील पदविका.

वय – उमेदवाराचा जन्म ६ मे १९९२ ते ५ मे १९९९ दरम्यानचा असावा.

(३) कॉन्स्टेबल (सीटी) – मेसॉन गवंडी

(६५ पदे)

(४) सीटी/प्लंबर (११ पदे)

(५) सीटी – इलेक्ट्रिशियन (१४ पदे)

(६) सीटी/कार्पेटर (६ पदे)

(७) सीटी/पेंटर (६ पदे)

सीटी पदांसाठी पात्रता – १० वी उत्तीर्ण  संबंधित ट्रेडमधील १ वर्षांचा अनुभव.

(संबंधित ट्रेडमधील सर्टिफकेट कोर्स केलेल्या उमेदवारांना ट्रेड टेस्टमध्ये ५ गुण अधिक दिले जातील.)

वय – उमेदवारांचा जन्म ६ मे १९९४ ते ५ मे १९९९ दरम्यानचा असावा.

सर्व पदांसाठी शारीरिक पात्रता – उंची १७० सें.मी., छाती – ८०-८५ सें.मी. (अ. जमाती – उंची – १६२.५ सें.मी., छाती – ७७-८८ सें.मी.)

निवड पद्धती – शारीरिक मापदंड, शारीरिक क्षमता चाचणी, कागदपत्र पडताळणी, लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट (फक्त सीटी पदांसाठी) वैद्यकीय तपासणी. परीक्षा केंद्र – हैद्राबाद, नीमच (मध्य प्रदेश), नवी दिल्ली इ.

शारीरिक क्षमता चाचणी – (पीईटी) एएस्आय्/ड्राफ्ट्समन पदासाठी (१) १.६ कि.मी. ६ मि. ३० सेकंदांत धावणे. (२) १०० मीटर १६ सेकंदांत धावणे. (३) लांब उडी – ३.६५ मीटर. (४ उंच उडी – १.२ मीटर. (५) गोळाफेक

(१६ पौंड) -४.५ मीटर. इतर पदांसाठी (पीईटी) – १.६ किमी ९ मिनिटांत धावणे.

परीक्षा शुल्क – एस्आय् पदासाठी रु. २००/-, इतर पदांसाठी रु. १००/-

ऑनलाइन अर्ज <http://www.crpfindia.com/>  या संकेतस्थळावर दि. ६ एप्रिल २०१७ ते ५ मे २०१७ पर्यंत करावेत. लेखी परीक्षेची तारीख  ३०जुल २०१७.

*   टाटा मेमोरियल सेंटर (टाटा मेमोरियल हॉस्पिटल) परळ, मुंबई पुढील दोन र्वष मुदतीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश.

(१) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे मान्यताप्राप्त दोन र्वष प्रगत पदविका.

(१) मेडिकल इमेजिंग तंत्रज्ञान पदविका,

(२) रेडिओथेरपी तंत्रज्ञान पदविका.

(३) भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतील एक अनुदानित संस्था (होमी भाभा राष्ट्रीय संस्था, अभिमत विद्यापीठासह संलग्न) यांच्या मार्फत.

(४) पदव्युत्तर पदविका – फ्यूजन इमेजिंग तंत्रज्ञान.

(५) क्लिनिकल रिसर्चमध्ये एमएससी.

पात्रता – पद क्र. (१) साठी बी.एस्सी. उत्तीर्ण. (कोणत्याही शाखेतील). पद क्र. (२), (३) आणि (४) साठी बी.एस्सी. किमान ५०%  गुणांसह उत्तीर्ण. (बी.एस्सी.) निकालाच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. (१) ते (३) अभ्यासक्रम दि. १ जुल २०१७ पासून सुरू होणार. (४) साठी अभ्यासक्रम दि. १ ऑगस्टपासून सुरू होणार. वयोमर्यादा – २० ते २५ वष्रे. (इमाव – २८ वष्रे, अजा/अज – ३० वष्रे) प्रशिक्षणादरम्यान दरमहा विद्यावेतन रु. ९,०००/- दिले जाईल. ऑनलाइन अर्ज  <http://tmc.gov.in/&gt;   या संकेतस्थळावर दि. २८ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.