डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेिनग इन्स्टिटय़ूट (BARTI), पुणे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी (सिव्हिल सर्व्हिसेस) परीक्षेच्या तयारीकरिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण महाराष्ट्रातील एकूण ६ डिव्हिजन्समध्ये प्रत्येकी ३० उमेदवार निवडणार.

नागपूर डिव्हिजन –

(१) प्रीमियर अकॅडमी सोसायटी – सेल नं. ९८२२९२२५०४.

(२) सिद्धार्थ गौतम शिक्षण समिती – फोन नं. ०७१२-२०२१८४३.

(३) अमरावती डिव्हिजन – श्री शेतकरी शिक्षण संस्थेची युनिक अकॅडमी  – सेल नं. ९६८९०६३२७७.

(४) नाशिक विभाग – स्पेक्ट्रम अकॅडमी (प्रबोधन बहुउद्देशीय संस्था, नाशिक) सेल नं.९२२५१२०४५५.

(५) औरंगाबाद विभाग – स्पेक्ट्रम अकॅडमी (प्रबोधन बहुउद्देशीय संस्था, औरंगाबाद) सेल नं. ७७२२०७००६६.

(६) पुणे विभाग – यूपीएससी अकॅडेमिया – सेल नं. ९९६०३३९०४४/ ९९१९०४४६४६.

(७) मुंबई विभाग – स्पेक्ट्रम अकॅडमी (प्रबोधन बहुउद्देशीय संस्था, मुंबई) फोन नं. ०२२-२५३७३७३७ / ८३०८९०८८८४.

एकूण १८० जागांपैकी ३०% जागा महिलांसाठी आणि ३% जागा विकलांगांसाठी राखीव आहेत. निवडलेल्या उमेदवारांची फी बार्टी भरणार आहे. तसेच त्यांना दर महिन्याला स्टायपेंड म्हणून रु. ९,०००/- दिले जातील.

पात्रता –  महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे उमेदवार. उमेदवाराचे वय २१ ते ३७ दरम्यान असावे. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.

निवड पद्धती – प्रवेश परीक्षा (बार्टी यूपीएससी – एमएएचए – सीईटी – २०१७-१८) ज्यात पेपर-१ जनरल स्टडीज – १०० गुण आणि पेपर-२(सीएसएटी) – १०० गुण. पेपर-२ केवळ पात्रता स्वरूपाचा असेल. किमान ३३ गुण. पेपर-२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पेपर-१ च्या कामगिरीवरून गुणवत्ता यादी बनविली जाईल.

ऑनलाइन अर्ज  http://barti.in/ या संकेतस्थळावर दि. १० डिसेंबर, २०१७ पर्यंत करावेत. यासाठीची प्रवेश परीक्षा दि. २४ डिसेंबर,२०१७ ला घेतली जाईल.

 सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) मध्ये ‘कॉन्स्टेबल/फायर’ टेंपररी पदांची भरती.

एकूण ४८७ पदे. (यूआर – २४६, इमाव – २३८, अजा – ७५, अज – ३८).

पात्रता – बारावी (विज्ञान) विषयांसह किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. ११ जानेवारी, २०१८ रोजी १८ ते २३ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १२ जानेवारी, १९९५ ते ११ जानेवारी, २००० दरम्यानचा असेल.) (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज –  ५ वर्षे).  (उकरा मधील कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा ४० वर्षेपर्यंत.)

शारीरिक मापदंड – उंची – १७० सें.मी. (ट्रायबल (अज) साठी – १६२.५ सें.मी.) छाती – ८० ते ८५ सेंमी. (अजसाठी ७७ सेंमी. ते ८२सेंमी.)

वेतन – पे मॅट्रिक्स लेव्हल – ३ (रु. २१,७००/- – ६९,१००/-). दरमहा रु. ३०,०००/- अंदाजे.

ऑनलाइन अर्ज  http://cisfrecit.in/ या संकेतस्थळावर दि. ११ डिसेंबर २०१८ ते ११ जानेवारी २०१८ पर्यंत करावेत.

फी – रु. १००/- नेट बँकिंग/क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा एसबीआय चलान मार्फत.