अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समूहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी अल्पसंख्याक उमेदवारासाठी मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना ही महत्त्वाची योजना आहे.
उद्देश
- राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारांना शासकीय/निमशासकीय सेवेत रोजगारांच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देणे.
- केंद्रीय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग/बँकिंग सेवा इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमामधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण.
- इयत्ता १० वी १२वी अनुत्तीर्ण अल्पसंख्याक उमेदवारांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरू करणे.
उपक्रम
या योजनेंतर्गत राज्यातील मुंबई, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे व नाशिक या शहरांमध्ये प्रशिक्षण केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची जबाबदारी
- उमेदवारांची यादी तयार करणे.
- उमेदवारांसाठी जाहिरात देणे.
- उमेदवारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाहून प्राधान्यक्रम निश्चित करणे.
- उमेदवाराच्या हजेरीबाबत मासिक, तिमाही अहवाल शासनास सादर करणे.
- उमेदवारांची माहिती ठेवणे, शासनासमोर सादर करणे.
- उमेदवारांसोबत संपर्क, समन्वय ठेवणे.
- आवश्यकता भासल्यास उमेदवारांची चाळणी परीक्षा घेणे.