गुवाहाटी येथील नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट येथे उपलब्ध असणाऱ्या ऑपरेशन अॅण्ड मेंटेनन्स ऑफ ट्रान्समिशन अॅण्ड डिस्ट्रिब्युशन या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
उपलब्ध जागा
अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ६० असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
शैक्षणिक अर्हता
अर्जदारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक अथवा पॉवर इंजिनीअरिंग यांसारख्या विषयातील पदवी घेतलेली असावी.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांमधून अर्जदारांच्या पदवी परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीनुसार त्यांची अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून ५०० रु. + १४ टक्के सेवा शुल्क एवढय़ा रकमेचा ‘नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटच्या नावे असणारा व गुवाहाटी येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ सप्टेंबर २०१५ च्या अंकातील नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी, अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.hptiguwahati.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज प्रिन्सिपल डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नॉर्थ ईस्टर्न रिजन, दक्षिणगाव रोड, खिलिपारा, गुवाहाटी- ७८१०१९ या पत्त्यावर २६ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
संग्रहित लेख, दिनांक 19th Oct 2015 रोजी प्रकाशित
‘ऑपरेशन अॅण्ड मेंटेनन्स ऑफ ट्रान्समिशन अॅण्ड डिस्ट्रिब्युशन’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम
ऑपरेशन अॅण्ड मेंटेनन्स ऑफ ट्रान्समिशन अॅण्ड डिस्ट्रिब्युशन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 19-10-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Operation and maintenance of transmission and distribution post graduate diploma course