इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी मंगळ यानाची मोहीम गेल्या बुधवारी फत्ते झाली आणि प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला. खगोलशास्त्रातील तज्ज्ञ संशोधकांचे या मोहिमेतील योगदान लक्षणीय आहे. या विशेष घटनेचे औचित्य साधून आज आपण खगोलशास्त्रातील अभ्यासक्रम, करिअर संधी आणि प्रशिक्षण संस्था याविषयी जाणून घेऊयात.

तसं पाहिलं तर, खगोलशास्त्राच्या (अ‍ॅस्ट्रॉनॉमी) अभ्यासाला ख्रिस्तपूर्व आठव्या शतकापासूनचा इतिहास असल्याचे आढळते. प्राचीन भारतात समुद्र पर्यटनात अचूक दिशा शोधण्यासाठी किंवा पिकांच्या पेरणी कापणीसाठी अनुकूल कालावधी, ज्योतिर्वज्ञिान अभ्यास, भविष्यकथन अशा मर्यादित उद्दिष्टांसाठी खगोलशास्त्राचा उपयोग आपल्या पूर्वजांकडून होत असे.
खगोलशास्त्राच्या अभ्यासात सामान्यपणे आकाशस्थ ग्रहताऱ्यांचा, सूर्यमालेचा अभ्यास करणे, त्यांचा पृथ्वीवरील सजीव सृष्टी, पर्जन्यमान व ऋतुमान यांवर होणारे बदल अभ्यासणे, तसेच मानवाच्या वास्तव्यासाठी पोषक वातावरण व सजीव सृष्टी अस्तित्वात असलेल्या अन्य ग्रहांचा शोध घेणे, अन्य ग्रह व उपग्रहांवर नसíगक ऊर्जा स्रोतांची शक्यता पडताळणे, गणिती आणि भौतिकशास्त्रातील संकल्पनांचा आधार घेऊन केलेल्या निरीक्षणाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करणे यांचा प्रामुख्याने समावेश या विद्याशाखेत होतो. सध्याच्या काळात खगोल अभ्यासकांनी आणि शास्त्रज्ञांनी या शास्त्राचा परीघ विस्तारला असून बिनतारी संदेश वाहन (वायरलेस नेटवर्क), जी.पी.एस. (ग्लोबल पोझिशिनग सिस्टीम), सॅटेलाइट इमेजिंग अशा प्रगत तंत्रज्ञानाच्या विकसनात खगोलशास्त्राचा अंतर्भाव केला आहे.. इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिक युनियन या खगोलशास्त्राला वाहिलेल्या जागतिक दर्जाच्या संस्थेने २०१० ते २०२० ही १० वष्रे खगोलशास्त्रीय अभ्यासाच्या उपयोजनेचे लक्ष्य तंत्रज्ञान आणि कौशल्य, विज्ञान आणि संशोधन, समाज आणि संस्कृती असे व्यापक करण्याचे योजले आहे. आधुनिक काळात होणाऱ्या खगोलशास्त्रीय संशोधनासाठी अद्ययावत उपकरणे, यंत्रणा आणि सुसज्ज प्रयोगशाळा याची गरज भासते. या सर्वाच्या निर्मितीसाठी आणि वापरासाठी कुशल तंत्रज्ञ, संगणकतज्ज्ञ, अभियंते, उत्तम प्रशिक्षण शाळा, प्रशिक्षक, गणिती, वैज्ञानिक, संशोधक आवश्यक असतात. अर्थातच वेगाने प्रगतिपथावर असणाऱ्या या संशोधन विद्याशाखेत प्रगतीच्या आणि संशोधनाच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत.
या प्रगतीच्या क्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे गणित, भौतिकशास्त्र या विषयांत उत्तम प्रतीची आकलनशक्ती, विश्लेषक वृत्ती, तर्कसुसंगत वैचारिकता, विचारांना वैज्ञानिक बठक, अंतराळ विश्वाबद्दल औत्सुक्य, संयम आणि मेहनती वृत्ती, खगोलशास्त्राविषयी अतीव ओढ असणे गरजेचे ठरते. खगोलशास्त्रातील संशोधन संधी, गणित, भौतिकशास्त्र, यांतील उच्च पदवीधर किंवा अभियांत्रिकी पदवीधर यांना उपलब्ध असतात.
खगोलशास्त्रीय अभ्यासात दोन पर्याय उपलब्ध आहेत-
एक्स्पिरिमेन्टल अ‍ॅस्ट्रॉनॉमी- यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शाखा निवडावी. (बी.ई./बी.टेक्.) (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक) व पदवीनंतर सामायिक प्रवेश परीक्षेद्वारा (जेईएसटी) खगोल संशोधन संस्थांच्या संशोधन कार्यक्रमात (पीएच.डी) सहभागी व्हावे.
थिअरटिकल अ‍ॅस्ट्रॉनॉमी- यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी बारावीनंतर विज्ञान (भौतिकशास्त्र, गणित) शाखेतील पदवी तसेच पदव्युत्तर (एम.एस्सी.) शिक्षण पूर्ण करून, सामायिक प्रवेश परीक्षेद्वारा (जेईएसटी) खगोल संशोधन संस्थांच्या संशोधन कार्यक्रमात (पीएच.डी.) सहभागी व्हावे.
या क्षेत्रात संशोधन तसेच पदवी व पदव्युत्तर प्रशिक्षण देण्यासाठी देशात विविध संस्थांद्वारे शिक्षणक्रम चालवले जातात. अशा संस्था व शिक्षणक्रमांची माहिती खालीलप्रमाणे आहे-

खगोलशास्त्रातील संशोधन संधी
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, बंगळुरू, कर्नाटक
या संस्थेत पूर्णवेळ संशोधन (पीएच.डी.) कार्यक्रम राबविला जातो. निवडप्रक्रिया दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या लेखी निवड चाचणीने सुरू होते. या विषयीची जाहिरात, सप्टेंबर महिन्यात वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केली जाते. त्याचप्रमाणे दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जॉइन्ट एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट (जेईएसटी) व मौखिक चाचणीमधूनही निवड केली जाते. या संस्थेतील संशोधन शिक्षणक्रमाची संधी मिळविण्यासाठी पात्रता-
एम.एस्सी. भौतिकशास्त्र / गणित किंवा एम.टेक्. इंजिनीअिरग किंवा बी.ई./ बी.टेक्. (फिजिक्स विषयाची पार्श्वभूमी) शिक्षण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर संपर्क साधा- http://www.iiap.res.in
इंटर युनिव्हर्सटिी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका), पुणे, महाराष्ट्र-
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यू.जी.सी.) खगोलशास्त्र व खगोल भौतिकी या विषयांतील संशोधनास चालना देण्यासाठी स्थापलेली ही स्वायत्त संस्था संशोधनात्मक शिक्षणक्रम राबवते. यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे-
फिजिक्स/ अप्लाइड मॅथेमॅटिक्स/ अ‍ॅस्ट्रॉनॉमी/ कॉम्प्युटर सायन्स या विषयांतून एम.एस्सी. उत्तीर्ण किंवा बी.ई./एम.ई. (गणित आणि भौतिक शास्त्राची पाश्र्वभूमी आवश्यक) उत्तीर्ण, निवडप्रक्रिया दर वर्षी जुल महिन्यात सुरू होते. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर संपर्क साधा- http://www.iucca.ernet.in
० जॉइंट एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट (जेईएसटी)- ही परीक्षा देशपातळीवर घेतली जाते. संशोधनात्मक पीएच.डी. (फिजिक्स, थिअरॉटिकल कॉम्प्युटर सायन्स) शिक्षणक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेतली जाते. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर संपर्क साधा- http://www.jest.org.in
जॉइंट अ‍ॅस्ट्रॉनॉमी प्रोग्राम
हा शिक्षणक्रम एक वर्षांचा असून तो इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस- बंगळुरू, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स – बंगळुरू, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, रामन रिसर्च इन्स्टिटय़ूट- बंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमाने चालवला जातो. या शिक्षणक्रमाची निवडप्रक्रिया जुल महिन्यात सुरू होते. यासाठी पात्रता एम.एस्सी./ बी.ई. / बी.टेक्. पदवी आवश्यक. शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर वरीलपकी कोणत्याही संस्थेत संशोधनाची संधीही दिली जाते. अधिक माहिती- http://www.physics.iisc.ernet.in

स्वायत्त संशोधन संस्था
रामन रिसर्च इन्स्टिटय़ूट (आर.आर.आय), बंगळुरू
नॅशनल सेंटर फॉर रेडियो अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (एन.सी.आर.ए.), पुणे
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टी.आय.एफ.आर)
फिजिकल रिसर्च लॅबोरॅटरी (पी.एल.आर.), अहमदाबाद
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (आय.एस.आर.ओ.)
वरील सर्व संस्था खगोलशास्त्र विषयातील संशोधन कार्यक्रम राबवतात. यासाठी निवडप्रक्रिया दरवर्षी जुल महिन्यात सुरू होते. (यांतील प्रवेशासाठी ‘जेईएसटी’ अपरिहार्य आहे.)

शिक्षणाच्या संधी
पृथ्वी भोवतालच्या अंतराळाचा अभ्यास आणि त्याचे उपायोजन क्षेत्र अत्यंत व्यापक स्वरूपाचे आहे. बदलत्या काळानुसार या क्षेत्रात अनेक अभ्यास शाखा समाविष्ट होत गेल्या, उदा- स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी, कॉस्मोलॉजी, अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी, अ‍ॅस्ट्रोकेमिस्ट्री, अ‍ॅस्ट्रोफिजिक्स.
अ‍ॅस्ट्रॉनॉमी –
डिप्लोमा इन अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रॉनॉमी- इंडियन अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी रिसर्च सेंटर, मुंबई , पात्रता- बारावी विज्ञान उत्तीर्ण. (अधिक माहितीसाठी संपर्क साधा- http://www.iarc .res.in)
कोस्रेस इन अ‍ॅस्ट्रोकेमिस्ट्री- एम. पी. बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च- बंगलोर http://www.mpbifr-blr.in
सर्टििफकेट कोर्स इन अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मुंबई विद्यापीठ, (नेहरू प्लॅनेटोरियम, वरळीच्या संयुक्त विद्यमाने)
बेसिक कोर्स इन अ‍ॅस्ट्रॉनॉमी- मुंबई विद्यापीठ
अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स इन अ‍ॅस्ट्रॉनॉमी- मुंबई विद्यापीठ (नेहरू तारांगण, वरळीच्या संयुक्त विद्यमाने)
एम.एस्सी अ‍ॅस्ट्रॉनॉमी- इंटर युनिव्हर्सटिी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका), पुणे, महाराष्ट्र.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू
पंजाब विद्यापीठ, चंदिगढ http://www.puchd .ac.in
उस्मानिया विद्यापीठ, हैद्राबाद, आंध्र प्रदेश
करपगम विद्यापीठ, कोइम्बतूर, तामिळनाडू

अवकाश तंत्रज्ञान
निरनिराळ्या अंतराळ मोहिमा, संशोधने, सुरक्षा यंत्रणा, तसेच सन्य दलांकडून वापरली जाणारी संदेश वहन यंत्रणा, या सर्वच क्षेत्रांतून अवकाश तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे होण्यासाठी उत्तम तंत्रशिक्षण आवश्यक आहे. यांतील अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत-
बी.ई. स्पेस टेक्नॉलॉजी- पात्रता बारावी गणित व विज्ञान विषयांसह उत्तीर्ण. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स, टेक्नोलॉजी (आय.आय.एस.टी., थिरुवअनंतपूरम, केरळ) http://www.iist.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधा
एम.टेक्. स्पेस टेक्नॉलॉजी- वेंकटेश्वरा विद्यापीठ. तिरुपती, आंध्र प्रदेश.
एम.एस्सी. स्पेस फिजिक्स- आंध्र विद्यापीठ. विशाखापट्टणम,
तीन वष्रे.
डिप्लोमा स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी- आंध्र विद्यापीठ विशाखापट्टणम, पात्रता एम.एस्सी. (फिजिक्स)/ एम.एस्सी. टेक्. इलेक्ट्रॉनिक.

अवकाश अभियांत्रिकी
विविध संशोधन मोहिमा, अंतराळ मोहिमा यासाठी अंतरिक्षात सोडली जाणारी अंतराळ याने, क्षेपणास्त्रे यांच्या निर्मितीचे व प्रभावी वापराचे तंत्रज्ञान याचा समावेश या विद्याशाखेत होतो.
बी.ई. एरोस्पेस इंजिनीअिरग- िहदुस्तान विद्यापीठ, तामिळनाडू http://www.hindustanuniv.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
६ विनायक मिशन्स किरूपानंदा वारियर कॉलेज, तामिळनाडू http://www.vmkvec.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
एम.ई. स्पेस इंजिनीअिरग, रॉकेट्री- बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची, झारखंड http://www.bitsmera.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधा.

अंतराळवीर होण्यासाठी..
आपल्यापकी प्रत्येकाच्या मनात अंतराळ प्रवास करण्याची सुप्त इच्छा दडलेली असते, परंतु त्यासाठी खालील प्राथमिक अटींची पूर्तता होणे अनिवार्य आहे-
अंतरिक्षात अंतराळवीर पाठवणाऱ्या संस्था असणाऱ्या देशाचे नागरिक असणे आवश्यक आहे.
युरोपिअन स्पेस एजन्सी ही संस्था अंतराळवीर पाठवण्यासाठी अन्य देशांशी करारबद्ध असते. सध्याचे त्यातील प्रमुख देश म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली वगरे.
नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा), अमेरिका- या संस्थेच्या अंतरिक्ष मोहिमांतून आतापर्यंत कॅनडा, जपान, रशिया, ब्राझील या देशांतील अंतराळवीर सहभागी झाले होते.
नासा (अमेरिका) या संस्थेच्या नियमांनुसार (२९.१.२००४) अंतराळवीर होण्यासाठी किमान पात्रता खालीलप्रमाणे आहे- मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. किंवा बायोलॉजिकल सायन्स/ गणित/ फिजिकल सायन्स यांतील उच्च शिक्षण आवश्यक. उमेदवार अमेरिकेचा नागरिक असणे गरजेचे आहे. वैमानिक म्हणून जेट एअर क्राफ्ट चालवण्याचा एक हजार तासांचा अनुभव आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- http://www.nasa.gov/audience/forstudents/postsecondary/features/F_Astronaut_Requirements.html

Extra curricular education course
Extra curricular, education course, carrier vrutante, loksatta, loksatta news, marathi, marathi news
शिक्षणेतर उपक्रम
अंतराळाबद्दल सामान्य नागरिकांना वाटणारे कुतूहल शमविण्यासाठी अनेक संस्था कार्यरत असतात. त्यापकी काही खालीलप्रमाणे आहेत-
अमॅच्युअर अ‍ॅस्ट्रोनॉमर असोसिएशन दिल्ली, बंगळुरू.
अमॅच्युअर अ‍ॅस्ट्रोनॉमर असोसिएशन मुंबई, सेंट झेविअर कॉलेज, मुंबई.
नेहरू तारांगण, वरळी, मुंबई.
आकाश मित्र मंडळ ( http://www.akashmitra.org)
खगोल मंडळ, कुर्ला, मुंबई http://www.khagolmandal.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खगोलशास्त्रातील करिअर संधी
विविध उद्दिष्टांसाठी अवकाशात आखल्या जाणाऱ्या कृत्रिम उपग्रह मोहिमा, तसेच चंद्र, मंगळ या ग्रहांवर व अन्य उपग्रहांवर होणाऱ्या शोधमोहिमांचे प्रमाण वाढू लागले आहे. साहजिकच या संशोधन मोहिमांसाठी आवश्यक संशोधक, तंत्रज्ञ, सल्लागार, अभियंते, विश्लेषक, अंतराळवीर यांची गरज असल्याचे जाणवते. या क्षेत्रातील उच्च शिक्षित, प्रशिक्षित उमेदवारांना इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, सरकारी खगोल संशोधन संस्था, खगोलशास्त्र प्रशिक्षण संस्था, नेव्हल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थांतून संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणून देशात व परदेशातही उत्तम आíथक प्राप्तीच्या संधी उपलब्ध असतात.
यासंदर्भातील कामाच्या संधी पुढील ठिकाणी उपलब्ध आहेत- विद्यापीठ, तारांगण, निरीक्षण प्रयोगशाळा (ऑब्झव्‍‌र्हेटरिज), संशोधन प्रयोगशाळा, संरक्षण क्षेत्र, अवकाश संशोधन संस्था, इलेक्ट्रिकल सुटे भाग बनविणारे कारखाने, इलेक्ट्रॉनिक सुटे भाग निर्मितीची ठिकाणे येथे तंत्रज्ञ, रिसर्च असिस्टंट, सोलार अ‍ॅस्ट्रोनॉमर, ऑब्जव्‍‌र्हेशनल अ‍ॅस्ट्रोनॉमर, रिसर्चर, सायन्टिफिक ऑफिसर, एज्युकेटर, रिसर्च फेलो, तंत्रज्ञ, विषयतज्ज्ञ अशा हुद्दय़ांवर नोकरी मिळू शकते.