संगणकाच्या वाढत्या वापरासोबतच सायबर क्राइमच्या संख्येतही वाढ होताना दिसते. या गुन्हेगारीचे आपण लक्ष्य ठरू नये म्हणून कुठली काळजी घ्यावी, याची माहिती असणे संगणकाचा वापर करणाऱ्या प्रत्येकालाच जणू अनिवार्य आहे. हे लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि पुण्याच्या इंटेलिजन्ट कोशन्ट सिक्युरिटी सिस्टीम या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘अवेअरनेस कोर्स इन सायबर सिक्युरिटी’ हा ऑनलाइन अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. त्याविषयी..
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाच्या वाढत्या वापरामुळे या क्षेत्रातील गुन्हेगारीही वाढली आहे. सायबर सुरक्षिततेबद्दल उपाययोजना करण्यात येत असल्याने, वेबसाइट हॅकिंगचे गुन्हे नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न असले तरी इंटरनेटद्वारे आर्थिक गरव्यवहार, अश्लीलता आणि त्यासंबंधित पसवणुकीच्या गुन्ह्य़ांत मोठी वाढ होताना दिसते. इंटरनेटचा वापर सेवासुविधांसाठी जसा होतो तसाच त्याचा वापर समाजविघातक शक्तींकडून वेबसाइटचे हॅकिंग, अश्लील साहित्य प्रकाशित करणे, छेडछाड यासाठी होताना दिसतो. सायबर गुन्हेगारीची माहिती आणि त्याला तोंड कसे द्यावे, यासंबंधीचे उपाय इंटरनेटचा वापर करणाऱ्या समाजातील प्रत्येकाला असणे आवश्यक झाल्याने, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘सायबर सिक्युरिटी’ हा महिन्याभराचा वैशिष्टय़पूर्ण ऑनलाइन शिक्षणक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात बनावट ईमेल ओळखणे, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावी लागणारी काळजी, आयटी कायदे, पेटंट अशा दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
जगभरात आज संगणकसंबंधित गुन्ह्य़ांचे स्वरूप मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण धोकादायक आहे. यासंबंधित तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी होताना दिसतो सायबरविश्वाची माहिती असल्यास या गुन्हेगारीचा शोध घेणे शक्य बनते आणि आपले संगणकावरील व्यवहार सुरक्षित होऊ शकतात. हे लक्षात घेता मुक्त विद्यापीठाने सुरू केलेल्या सायबर सिक्युरिटी शिक्षणक्रमाचे महत्त्व अधिक वाढते.
सोशल नेटवर्किंगचे धोकेकॉम्प्युटर यंत्रणा अथवा नेटवर्क यात बेकायदा शिरकाव
करून हॅकर्स आर्थिक वा इतर लाभांसाठी हा गुन्ह्य़ाकडे वळताना दिसतात. क्रेडिट कार्डविषयक माहिती काढून घेणं, अनेक बँकांतील पसे स्वत:च्या खात्यात वळवून घेणं. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या नोंदी, माहिती चोरणे अथवा एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यासाठी संबंधित माहिती वापरणे असा गैरवापर हॅकर्स करताना दिसतात.
बालकांच्या लैंगिक शोषणासाठीही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक इंटरनेटचा वापर करतात. एखाद्याला त्रास देण्यासाठी सतत फोन करणं, लेखी संदेश पाठवणं, मालमत्तेचं नुकसान करणं हे सर्व प्रकार ‘सायबर स्टाकिंग’मध्ये मोडतात. त्यातून एखाद्या व्यक्तीला शारीरिक दुखापत करण्यापर्यंतही मजल जाते.
काही प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीला संशयास्पद संदेश पाठवून त्याच्या ‘मेल बॉक्स’वर अतिक्रमण करून त्या व्यक्तीला येणाऱ्या ‘ई-मेल’ ची सेवा अडचणीत आणण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.
बनावट ई-मेलद्वारे फसवणूक करणे, एखाद्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळवणे, त्या माहितीच्या आधारे त्याचा ऑनलाइन बँकिंगचा पासवर्ड हॅक करून त्याच्या अकाऊंटमधून पसे लुबाडणे, सरकारी/ खासगी संकेतस्थळावर सायबर हल्ला करून महत्त्वाचा डेटा मिळवणे आणि त्या माहितीचा उपयोग देशविघातक कृत्ये करण्यासाठी करणे. या अशा प्रकारांमुळेच सायबर गुन्ह्य़ांमध्ये पाचपट वाढ झाली आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, अश्लील संदेश, हॅकिंग आणि लॉटरी गरप्रकार या गुन्ह्य़ांचासुद्धा समावेश आहे.
मेट्रोपॉलिटियन शहरांबरोबरच, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सायबर गुन्ह्य़ांचे जाळे आता वाढत असून त्याचे लोण ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहोचले आहे. सायबर क्राइमला कोणत्याही सीमारेषा नसल्याने त्यास रोखण्यासाठी संगणकीय ज्ञान घेणे समाजातील प्रत्येक घटकाला आवश्यक आहे. म्हणूनच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सहयोग व विशेष उपक्रम केंद्राच्या अंतर्गत मुक्त विद्यापीठ आणि पुण्याच्या इंटेलिजन्ट कोशन्ट सिक्युरिटी सिस्टीम या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘अवेअरनेस कोर्स इन सायबर सिक्युरिटी’ हा ऑनलाइन अभ्यासक्रम विकसित केला आहे.
अत्यंत साध्या, सोप्या पद्धतीचा हा अभ्यासक्रम असून इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकाला हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. या अभ्यासक्रमाची पात्रता : दहावी उत्तीर्ण असून अभ्यासक्रमाचे शुल्क : रु. १८००/- आहे. हा महिन्याभराच्या कालावधीचा अभ्यासक्रम असून शिकवण्याचे माध्यम इंग्रजी राहील. अभ्यास साहित्य : एक पुस्तक (Safe Practices in Cyber Security) आणि ऑनलाइन अभ्यास साहित्यासोबत सायबर संबंधित ऑनलाइन व्हिडीओ पाहण्याची सुविधा या अभ्यासक्रमात आहे.
मूल्यमापन आणि परीक्षा पद्धत : या अभ्यासक्रमाची परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची ३० गुणांची ३० मिनिटे कालावधीची आहे. ही परीक्षा जास्तीतजास्त तीन प्रयत्नांत उत्तीर्ण होण्याची मुभा देण्यात आली आहे. ४० टक्के गुण प्राप्त झाल्यास विद्यार्थ्यांला ऑनलाइन प्रमाणपत्र वितरित करण्याची सुविधा आहे.
नोंदणी प्रक्रिया : या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांला नजीकच्या अभ्यास केंद्रात जावे लागेल. अभ्यास केंद्रांची यादी आणि माहिती पत्रकाकरिता http://ycmou.digitaluniversity.ac  संकेतस्थळावर Programmes / Admissions या लिंकअंतर्गत या अभ्यासक्रमाची माहिती आणि प्रवेश अर्ज उपलब्ध आहे.
प्रवेश संपर्क : इच्छुकांनी प्रत्येक महिन्याच्या १ ते ७ या तारखेस विद्यापीठाच्या http//:ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळास भेट देऊन माहिती घ्यावी.                
ssable917@gmail.com