केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे केंद्र सरकारचे विविध विभाग आणि आस्थापनांमध्ये अभियंत्यांची नेमणूक करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘इंजीनिअरिंग सव्र्हिसेस एक्झामिनेशन-२०१४’ या राष्ट्रीय स्तरावरील निवड पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने सिव्हिल, मेकॅनिकल अथवा इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : उमेदवार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांचे वय ३० वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २० जून २०१४ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून उमेदवारांनी २०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया वा स्टेट बँकेच्या सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ मार्च २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट देण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०१४.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2014 रोजी प्रकाशित
केंद्रीय लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी परीक्षा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे केंद्र सरकारचे विविध विभाग आणि आस्थापनांमध्ये अभियंत्यांची नेमणूक करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘इंजीनिअरिंग सव्र्हिसेस एक्झामिनेशन-२०१४’ या राष्ट्रीय स्तरावरील निवड पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
First published on: 14-04-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineering exams of the union public service commission