राष्ट्रीय बँकांमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि IBPS PO परीक्षा २०२१ ची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी मोठी बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने विविध राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकूण ४१३५ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. भरती जाहिरात सीआरपी पीओ/एमटी-इलेव्हन २०२२-२३ नुसार संस्थेने आज, १९ ऑक्टोबर २०२१,बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनीची पदे साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

( हे ही वाचा: NFSC Recruitment 2021: ‘या’ पदांसाठी करा अर्ज; पगार १,४२,४०० रुपयांपर्यंत )

sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
BOI Officer Recruitment 2024
BOI Officer Recruitment 2024: बँक ऑफ इंडियाद्वारे १४३ पदांसाठी होणार भरती, १० एप्रिलपूर्वी करा अर्ज
Eligibility in Zopu Yojana without human intervention
झोपु योजनेत यापुढे पात्रता मानवी हस्तक्षेपाशिवाय!
South East Central Railway Bharti 2024
SECR Bharti 2024 : १०वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

IBPS PO/MT साठी अर्ज कसा करावा?

सरकारी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनीच्या ४००० हून अधिक पदांवर भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार IBPS, ibps.in च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होण्यासाठी ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रियेअंतर्गत, उमेदवार २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करू शकतील.तसेच, त्याच तारखेपर्यंत, उमेदवारांना विहित अर्ज शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाइन माध्यमातून भरता येईल.

( हे ही वाचा: IOCL Recruitment 2021: एकूण ७१ पदांसाठी भरती; पगार १,४०,००० रुपयांपर्यंत )

७८५५ लिपिक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

आयबीपीएस लिपिक २०२१ अंतर्गत विविध सार्वजनिक बँकांमध्ये ७८५५ लिपिक पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आधीच सुरू आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने ७००० हून अधिक लिपिक पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑक्टोबर २०२१ निश्चित केली आहे.कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवार देखील या पदांसाठी पात्र आहेत. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार या लिंकवरून IBPS लिपिक भरती २०२१ अधिसूचना तपासू शकतात.