ISI Recruitment 2022: इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटने (Indian Statistical Institute) पीएच.डी पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या अंतर्गत रिसर्च असोसिएट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार या पदांसाठी ISI च्या अधिकृत साइट isical.ac.in वर अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील १४ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घेण्यासाठी उमेदवार स्थानिक युनिटचे वेबपेज तपासू शकतात.

पात्रता निकष काय?

रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एससीआय जर्नलमध्ये किमान एक प्रकाशनासह पीएच.डी केलेली असावी. ज्यांनी आपला थीसिस सादर केला आहे ते देखील या पदासाठी अर्ज करू शकतात.

(हे ही वाचा: Railway Recruitment 2022: कनिष्ठ अनुवादक पदांसाठी अधिसूचना जारी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज)

पगार किती मिळणार?

या भरती प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना चांगला मासिक पगार दिला जाईल. गुणवत्तेच्या आणि अनुभवाच्या आधारावर निवडलेल्या तीन श्रेणींना संस्थेच्या नियमांनुसार ४७,००० रुपये, ४९,००० रुपये आणि ५४,००० रुपये अधिक एचआरए दिले जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर तपशील

उमेदवारांच्या नियुक्तीचा कालावधी त्यांच्या संस्थेत रुजू झाल्यापासून एक वर्षाचा असेल जो नंतर वाढवला जाऊ शकतो. उमेदवाराच्या कामगिरीवर आणि निधीच्या उपलब्धतेनुसार ते आधीही संपुष्टात येऊ शकते. या भरतीशी संबंधित तपशीलांसाठी उमेदवार ISI ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.