JEE Main Exam 2023 Dates, Eligibility: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने २०२३ मध्ये होणाऱ्या जेईई मेन परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. याबाबत एक माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार २०२३ मध्ये जेईई मेन परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. यातील पाहिले सत्र जानेवारी २०२३ मध्ये असेल, तर दुसरे सत्र एप्रिल २०२३ मध्ये असेल.

१५ डिसेंबरपासून २०२३ मधील पहिल्या सत्रासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे, तर याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२३ असेल. अंडरग्रॅज्युएट इंजीनिअरिंग प्रोग्रॅम्ससाठी अर्ज करणारे विद्यार्थी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अधिक माहिती मिळवू शकतात.

आणखी वाचा: Talathi Bharti 2022: राज्यात ३६२८ तलाठी पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

२०२३ मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याबरोबर एनटीएने याबाबत अधिक माहिती देत सांगितले, ‘जेईई मेन परीक्षेत दोन पेपर असतील. पेपर १ (BE/BTech) हा पेपर एनआयटी, आयआयटी, सीएफटीआय, राज्या सरकारची मान्यता/निधी देण्यात आलेल्या युनिव्हार्सिटी/ संस्थांमध्ये अंडरग्रॅज्युएट इंजीनियरिंग प्रोग्राम्ससाठी प्रवेश मिळवण्यासाठी असेल. हा पेपर जेईई (ऍडव्हान्स) साठी पात्रता परीक्षेच्या स्वरूपात असेल. दुसरा पेपर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि बॅचलर ऑफ प्लॅनिंग यासाठी प्रवेश मिळवण्यासाठी असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परीक्षेच्या संभाव्य तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. २०२३ जानेवारी मधील पाहिले सत्र २४ जानेवारी ते ३१ जानेवारी यादरम्यान असेल. तर दुसरे सत्र २०२३ मधील ६ एप्रिल ते १२ एप्रिलच्या दरम्यान असेल.