सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मार्केटिंग डिव्हिजन, सदर्न रिजन, चेन्नई (Advt. No. IOCL/MKTG/SR/APPR/ sqsr-ss Phase-I). IOCL च्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ इ. ठिकाणच्या युनिट्समध्ये टेक्निकल व नॉन-टेक्निकल ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेसच्या एकूण ४८० पदांची भरती.

डिसिप्लीननुसार व राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील –

(१) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस (ITI – (i) फिटर, (ii) इलेक्ट्रिशियन, (iii) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, (iv) इन्स्ट्रमेंट मेकॅनिक, (v) मशिनिस्ट इ. – कर्नाटक – २१, आंध प्रदेश – ३०, तेलंगणा – ३०, तमिळनाडू – ५०, केरळ – १६.

पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स उत्तीर्ण.

(२) टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस -(i) मेकॅनिकल, (ii) इलेक्ट्रिकल, (iii) इन्स्ट्रमेंटेशन,(iv) सिव्हिल, (v)इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, (vi) इलेक्ट्रॉनिक्स – कर्नाटक – १०, आंध प्रदेश – ९, तेलंगणा – ८, तमिळनाडू – १५, केरळ – ८.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ५०%गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांगांसाठी ४५%गुण)

(३) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – अकाऊंटंट – कर्नाटक – ५४, आंध प्रदेश – १६, तेलंगणा – १२, केरळ – ३०.

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान सरासरी ५०%गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांगांसाठी ४५%गुण)

(४) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – डेटा एन्ट्री ऑपरेटर (फ्रेशर) – कर्नाटक – ४, आंध प्रदेश – ३, तेलंगणा – ३, तमिळनाडू – १०, केरळ – ३.

पात्रता – किमान १२ वी उत्तीर्ण. (उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली नसावी.)

(५) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – डेटा एन्ट्री ऑपरेटर (स्किल्ड् सर्टििफकेट होल्डर) – कर्नाटक – २, आंध प्रदेश – २, तेलंगणा – २, तमिळनाडू – ५, केरळ – २.

पात्रता – किमान १२ वी उत्तीर्ण. परंतु पदवीधर नसावा आणि डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटरचा किमान १ वर्षांचा कोर्स उत्तीर्ण.

(६) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – रिटेल सेल्स असोसिएट (फ्रेशर) – कर्नाटक – ४, आंध प्रदेश – ३, तेलंगणा – ३, तमिळनाडू – १०, केरळ – ३.

पात्रता – किमान १२ वी उत्तीर्ण. (परंतु पदवीधर नसावा.)

(७) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – रिटेल सेल्स असोसिएट (स्किल सर्टििफकेट होल्डर) – कर्नाटक – २, आंध प्रदेश – २, तेलंगणा – २, तमिळनाडू – ५, केरळ – २.

पात्रता – किमान १२ वी उत्तीर्ण (परंतु पदवीधर नसावा.) आणि रिटेल ट्रेनी असोसिएट स्किल सर्टििफकेट कोर्स उत्तीर्ण. (किमान १ वर्ष कालावधीचा)

निवड पद्धती – उमेदवारांची निवड ऑब्जेक्टिव्ह टाइप (MCQ) लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित केली जाईल. लेखी परीक्षेत पुढील विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील.

(१) ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेस (आयटीआय) आणि टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिसेस (इंजिनीअरिंग डिप्लोमा) संबंधित विषयाचे ज्ञान; जेनेरिक अ‍ॅप्टिटय़ूड (क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूडसह), रिझिनग अ‍ॅबिलिटी; मूलभूत इंग्रजीचे कौशल्य.

(२) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस (अकाऊंटंट) – जेनेरिक अ‍ॅप्टिटय़ूड (क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूडसह), रिझिनग अ‍ॅबिलिटीज, मूलभूत इंग्रजी ज्ञान.

(३) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस (डेटा एन्ट्री ऑपरेटर) – जेनेरिक अ‍ॅप्टिटय़ूड (क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूडसह), जनरल इंग्लिश, न्यूमरिकल अ‍ॅप्टिटय़ूड, जनरल नॉलेज/अवेअरनेस.

(४) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस (रिटेल सेल्स असोसिएट) – जेनेरिक अ‍ॅप्टिटय़ूड, रिझिनग अ‍ॅबिलिटीज, बेसिक इंग्लिश.

लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची प्री-एगेंजमेंट मेडिकल फिटनेस टेस्ट घेतली जाईल.

उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संबंधित पोर्टलवर ट्रेड अ‍ॅप्रेंटिसकरिता रजिस्ट्रेशन करावे लागेल.

(१) टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस (डिप्लोमा) -https://www.mhrdnats.gov.in/boat/commonRedirect/ registermenunew! registermenunew.action

(२) इतर अ‍ॅप्रेंटिसेस -http://apprenticeshipindia.org/candidate-registration

ऑनलाइन अर्ज http://www.iocl.com या संकेतस्थळावर दि. २८ ऑगस्ट २०२१ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत. (Careers > Latest job opening > Engagement of Trade Apprentices in Southern Region (Marketing Division) FY 2020-21 Phase I) सोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे.

प्रशिक्षण कालावधी –

पद क्र. १ ते ३ साठी १२ महिने.

ट्रेड अ‍ॅप्रेंटिस डेटा ऑपरेटर पदांसाठी

१५ महिने.

ट्रेड अ‍ॅप्रेंटिस रिटेल सेल्स असोसिएट पदांसाठी १४ महिने.

वयोमर्यादा – दि. ३० जून २०२१ रोजी

१८ ते २४ वष्रे. (इमाव – २७ वष्रे, अजा/

अज – २९ वष्रे, दिव्यांग – ३४/३७/३९ वर्षे)