आयुर्विमा महामंडळांतर्गत आयुर्विमा सुवर्णजयंती फाऊंडेशनद्वारा आर्थिकदृष्टय़ा मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तींसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या २० असून त्यापैकी १० शिष्यवृत्ती मुलग्यांसाठी तर १० शिष्यवृत्ती मुलींसाठी उपलब्ध आहेत.
* वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी तसेच इतर पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम :
आवश्यक पात्रता- अर्जदारांनी २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात बारावीची परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांहून अधिक नसावे.
* औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अथवा सरकारमान्य संस्थांमधील रोजगारप्रवण
अभ्यासक्रम :
आवश्यक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात दहावीची शालान्त परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांहून अधिक नसावे.
अधिक माहिती- शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली आयुर्विमा महामंडळाची जाहिरात पाहावी तसेच महामंडळाचे नजीकचे विभागीय कार्यालय अथवा शाखेला भेट द्यावी अथवा एलआयसीच्या http://www.licindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २३ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2015 रोजी प्रकाशित
आयुर्विमा महामंडळाची सुवर्णजयंती शैक्षणिक शिष्यवृत्ती
आयुर्विमा महामंडळांतर्गत आयुर्विमा सुवर्णजयंती फाऊंडेशनद्वारा आर्थिकदृष्टय़ा मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तींसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 14-09-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life insurance corporation educational scholarships