मुलींच्या उच्च शिक्षणाला उत्तेजन देण्याकरता विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे ‘इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड’ही शिष्यवृत्ती दिली जाते. याद्वारे कुटुंबातील एकुलती एक मुलगी असणाऱ्या विद्यार्थिनीला तिच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी शुल्कमाफी दिली जाते.
अर्हता- ती विद्यार्थिनी कुटुंबातील एकुलती एक मुलगी असावी, जिने मान्यताप्राप्त विद्यापीठातील पूर्ण वेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतला आहे.
वयोमर्यादा- अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीचे वय ३० वर्षांहून अधिक नसावे.
अर्जप्रक्रिया- अर्ज ऑनलाइन पद्धतीने ३१ जुलैपर्यंत करावेत.
अधिक माहिती- सविस्तर माहितीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या http://www.ugc.ac.in/sgc/ या वेबसाइटला भेट द्यावी.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2015 रोजी प्रकाशित
एकुलत्या एक मुलीला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती
मुलींच्या उच्च शिक्षणाला उत्तेजन देण्याकरता विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे ‘इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड’ही शिष्यवृत्ती दिली जाते.
First published on: 27-07-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Masters degree scholarship for only girl child