Ministry of Defence Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय लष्कराचे मुख्यालय १०१ क्षेत्र, शिलाँग यांनी मल्टी टास्किंग स्टाफ आणि स्टेनोग्राफर पदांच्या भरतीसाठी रोजगार बातम्यांमध्ये अधिसूचना जारी केली आहे. सर्व पात्र उमेदवार या पदांवर भरतीसाठी विहित नमुन्यात जाहिरात जारी झाल्यापासून ३० दिवसांच्या आत म्हणजेच १ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदांचा तपशील

अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे मल्टी टास्किंग स्टाफच्या ४ पदे आणि स्टेनो ग्रेड II च्या १ पदाची भरती केली जाईल. मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना १८००० रुपये ते ३८७०० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. त्याच वेळी, स्टेनो पदांवर निवडलेल्या उमेदवारांना २५५०० रुपये ते ५५१०० रुपये प्रति महिना पगार मिळेल.

(हे ही वाचा: Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती, बारावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज)

१०वी, १२वी पास करू शकतात अर्ज

भारतीय सैन्यात या पदांवर भरतीसाठी, ओबीसी उमेदवारांचे वय १८ ते २१ वर्षे आणि एससी प्रवर्गातील उमेदवारांचे वय १८ वर्षे ते ३० वर्षे असावे. याशिवाय, एमटीएस पदांसाठी भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावी पास असावा. तर स्टेनो पदांसाठी १२वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच, इंग्रजी टायपिंगमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक वेग असावा. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

(हे ही वाचा: ESIC Recruitment 2022: पदवीधरांसाठी नोकरीची संधी, पगार १ लाख ४० हजाराहून अधिक; पाहा तपशील)

अर्ज कसा करायचा?

सर्व पात्र उमेदवार त्यांचे अर्ज विहित नमुन्यात आणि इतर आवश्यक कागदपत्रे विहित वेळेत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिसूचनेद्वारे त्यांची पात्रता तपासली पाहिजे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट पाहू शकता.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ministry of defense recruitment 2022 job opportunities for 10th 12th pass salary more than 55 thousand ttg
First published on: 03-04-2022 at 14:59 IST