भारतीय नौदलाने १० + २ (B.Tech) कॅडेट प्रवेश योजनेसाठी पात्र आणि अविवाहित पुरुष उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in द्वारे १० ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी या पदांवर भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू केली जाईल.

या प्रक्रियेद्वारे भारतीय नौदलात एकूण ३५ पदांची भरती केली जाईल. ज्यात शिक्षण शाखेची ५ पदे आणि कार्यकारी आणि तांत्रिक शाखांची ३० पदे समाविष्ट आहेत. जेईई मेन २०२१ (B.E. / B.Tech) परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना NTA ने प्रकाशित केलेल्या JEE Main – 2021 अखिल भारतीय रँकच्या आधारावर सेवा निवड मंडळ (SSB) साठी बोलावले जाईल. त्यानंतर SSB मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

SBI Recruitment 2021: एकूण ६०६ पदांसाठी होणार भरती; अधिसूचना जारी

उमेदवारांनी १२ वी किंवा समकक्ष परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह कोणत्याही बोर्डातून किमान ७०% एकूण गुणांसह आणि इंग्रजीमध्ये किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी (१० वी किंवा १२ वी). वयोमर्यादेबद्दल बोलताना, शिक्षण शाखा किंवा कार्यकारी आणि तांत्रिक शाखेत भरतीसाठी उमेदवारांचा जन्म २ जुलै २००२ ते १ जानेवारी २००५ दरम्यान असावा. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

MbPT Recruitment: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांसाठी भरती; पगार २,६०,००० रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय नौदलात भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी त्यांची पात्रता तपासली पाहिजे. याशिवाय भारतीय नौदलाने विविध शाखांमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसरच्या १८१ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार इंडियन नेव्ही एसएससी ऑफिसर भरती २०२१ साठी अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर ५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. २१ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.