scorecardresearch

Premium

यूपीएससीची तयारी : दुय्यम सेवा पूर्व परीक्षा – भूगोल घटकाची तयारी

या संकल्पना समजून घेतानाच जगातील त्या त्या उदाहरणांचा आढावा कोष्टकामध्ये मांडून घ्यायला हवा.

यूपीएससीची तयारी : दुय्यम सेवा पूर्व परीक्षा – भूगोल घटकाची तयारी

रोहिणी शहा

मागील लेखामध्ये दुय्यम सेवा पूर्वपरीक्षेच्या इतिहास घटकाची तयारी कशी करावी याबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ajit pawar
“माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान

या घटकाचा अभ्यासक्रम भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या,  उद्योगधंदे इत्यादीह्ण असा विहित करण्यात आला आहे.

अभ्यासक्रमामध्ये दिलेले उपघटक हे तयारीचा मूळ गाभा असायला हवेतच, पण इत्यादीह्ण शब्दप्रयोगामुळे काही अनुल्लेखित बाबी तयारीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक ठरणार आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून आर्थिक भूगोलातील नैसर्गिक साधनसंपत्ती – खनिजे, ऊर्जा स्त्रोत, पायाभूत सुविधा, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल आणि राजकीय भूगोलह्ण हे मुद्दे अभ्यासामध्ये समाविष्ट असणे आवश्यक असल्याचे दिसते.

उपघटकनिहाय तयारी कशी करावी ते पाहू.

पृथ्वी, अक्षांशरेखांश, जगातील विभाग यांचा अभ्यास एकत्रितपणे करायला हवा. पृथ्वीची रचना, पृथ्वीचा आस आणि त्याचे कलणे, अक्षांश, रेखांश, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण झालेल्या पृथ्वीच्या विशिष्ट स्थिती (संपात दिन, आयन दिन), वातावरण, हवामानाचे घटक, मान्सूनची निर्मिती, मान्सूनवर परिणाम करणारे घटक, वाऱ्यांची निर्मिती, भूरूप निर्मिती, भूकंप, वादळांची निर्मिती, प्रमाण वेळ अशा पायाभूत संकल्पनांचा अभ्यास आवश्यक आहे. या घटकांचा दिलेल्या क्रमाने समजून घेत अभ्यास करणे फायद्याचे ठरेल. या संकल्पना समजल्या की, त्यावरील विश्लेषणात्मक, बहुविधानी प्रश्न तसेच चालू घडामोडींवर आधारित प्रश्न सोडविणे सोपे होते.

या संकल्पना समजून घेतानाच जगातील त्या त्या उदाहरणांचा आढावा कोष्टकामध्ये मांडून घ्यायला हवा. ज्वालामुखी, सागरी प्रवाह, पर्वतरांगा तसेच नदी, वारा, समुद्रलाटा, हिमनद्या यांच्याद्वारे निर्मित भूरुपे यांचा आढावा घेऊन त्यांची देश व राज्यातील उदाहरणे लक्षात ठेवावीत.

देशातील नदीप्रणाली, पर्वतप्रणाली यांचा उत्तर – दक्षिण व पूर्व – पश्चिम क्रम लक्षात ठेवावा. विशेषत: महाराष्ट्रातील नदी खोरी व पर्वतरांगा यांचा एकत्रित अभ्यास करावा. महत्त्वाच्या नदी खोऱ्यांचा अभ्यास, महत्वाच्या उपनद्या, त्यांचा लांबी व मुख्य नदीस येऊन मिळण्याच्या दृष्टीने क्रम, महत्त्वाचे सिंचन /जल विद्युत प्रकल्प या मुद्दय़ांच्या आधारे आढावा घ्यावा. महाराष्ट्राच्या पश्चिम वाहिनी नद्यांचा क्रम, घाटांचा क्रम लक्षात ठेवावा. पश्चिम वाहिनी नद्यांच्या महत्त्वाच्या खाडय़ांची नावे माहीत असायला हवीत.

भारतातील व महाराष्ट्रातील हवामान, पर्जन्यमान म्हणजेच भारतीय मान्सून आणि भारताचा प्राकृतिक भूगोल यांचा अभ्यास एकत्रित करायला हवा. यातील भारताच्या प्राकृतिक भूगोलामध्ये नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, हवामान प्रदेश, वनांचे प्रकार, खडकांचे व मृदेचे प्रकार यांचा आढावा नकाशाच्या आधारे घ्यायला हवा.

महाराष्ट्राच्या मुख्य हवामान विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास केल्यास हवामान, पर्जन्यमान, पिके आणि जमिनीचे प्रकार यांचा एकत्रित अभ्यास होईल आणि समजून घेणे व पर्यायाने लक्षात राहणे सहजशक्य होईल. प्रत्येक विभागाची भौगोलिक वैशिष्टय़े, हवामानाचे वैशिष्टय़पूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्टय़ांचे योगदान या बाबी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पश्चिम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल.

पशुधन, कृषीचे प्रकार, मासेमारी, वने, प्रमुख पिके – नगदी व अन्नधान्य – त्यांचे वितरण, कृषी क्षेत्रातील विविध क्रांती याचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरीही त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे त्यांचा पीक हवामान प्रदेशानुसार आढावा घेणे आवश्यक आहे.

पायाभूत सुविधांचा आढावा घेताना महत्त्वाचे महामार्ग, विकसित बंदरे, व्यापारी बंदरे, लोहमार्ग, जलविद्युत तसेच मोठे सिंचन प्रकल्प यांचा आढावा घ्यायला हवा.

आर्थिक भूगोलामध्ये महत्त्वाची खनिजे व त्यांचे स्रोत, खडक आणि मुख्य उत्पादक जिल्हे / राज्ये, महत्त्वाची पर्यटन स्थळे, धबधबे, धार्मिक स्थळे, जिल्ह्याची मुख्य केंद्रे, उद्योगांची मुख्य स्थाने, महत्त्वाच्या शहरांची वैशिष्टय़े व त्यांची टोपण नावे, ती नदीकिनारी असल्यास संबंधित नद्या हे कोष्टकामध्ये मांडल्यास त्याच्या जोडय़ा जुळवा प्रकारातील प्रश्न सोडविताना खूप फायदा होतो.

महाराष्ट्राचा राजकीय भूगोल अभ्यासताना प्रशासकीय विभागांतील जिल्हे, जिल्ह्यांची मुख्यालये, जिल्ह्यांचे आकार, किनारी जिल्हे, शेजारी राज्यांच्या सीमारेषेवरील जिल्हे, महत्त्वाचे तालुके यांचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करावा.

मृदा, हवामान, वने, बंदरे, स्थानिक वारे, विविध आखाते, सामुद्रधुनी आणि महासागर, हवामान प्रदेश, नद्या, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारे या घटकांचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करावा. त्यामुळे फोटोग्राफिक मेमरीचा वापर होऊन तो व्यवस्थित लक्षात राहतो. या बाबींच्या ठळक उदाहरणांच्या कोष्टकामध्ये नोट्स काढणे शक्य आणि तयारीच्या दृष्टीने व्यवहार्य आहे.

भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंगगुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्यांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्युदर, बाल लिंगगुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मृत्युदर, बाल मृत्युदर, अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या/प्रमाण यांची माहिती असायला हवी.

यामध्ये सन २००१ व  २०११च्या जनगणनेची तुलना, वरील मुद्यांबाबत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली तीन राज्ये, तुलनेने सर्वात जास्त व सर्वात कमी वाढ झालेली राज्ये व सर्व बाबतीत महाराष्ट्राचे दोन्ही वर्षांमधील स्थान तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण व वाढीचे जिल्हे अशा टेबलमध्ये नोट्स काढणे फायदेशीर ठरेल.

महाराष्ट्रातील आदीम जमाती, देशातील महत्त्वाच्या आदीम जमाती व त्यांचे भूप्रदेश, त्यांच्या शेतीचे प्रकार, चर्चेत असल्यास त्यांच्याबाबतचे महत्त्वपूर्ण मुद्दे यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2022 at 01:14 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×