scorecardresearch

Railway Jobs 2022: रेल्वेत २४०० पदांसाठी भरती, दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी संधी

सरकारी नोकरीच्या अनुभवासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे.

rail-mumbai-mega-block-
Railway Jobs: रेल्वेत २४०० पदांसाठी भरती, दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी संधी

सरकारी नोकरीच्या अनुभवासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. भारतीय रेल्वेकडून २४२२ पदाच्या अप्रेटिंस पदांसाठी भरती भरती केली जामार आहे. यात रेल्वे फिटर, वेल्डर, टर्नर, कारपेंटर, टेलर, मॅकेनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, प्रोग्रॅमिंग अँड सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट असा ठिकाणी कामाची संधी आहे.

जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सर्व पदांसाठी शिकाऊ उमेदवारीचा कालावधी एक वर्षासाठी निश्चित करण्यात आला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२२ आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही चाचणी द्यावी लागणार नाही, त्यांची थेट निवड केली जाईल. त्यासाठी दहावी आणि आयटीआय अभ्यासक्रमात मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेवर ठरवलं जाईल. अशा परिस्थितीत इच्छुक उमेदवार http://www.rrccr.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा बोर्डातून किमान ५०% गुणांसह दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, संबंधित नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त असले पाहिजे. निवडलेल्या उमेदवारांची मुंबई, क्लस्टर भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर येथील विविध युनिट्ससाठी नियुक्ती केली जाईल. कमाल २४ वर्षे असणे आवश्यक आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिसूचनेवर जाऊन तपासू शकतात.

याप्रमाणे अर्ज करा

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
  • फॉर्म भरा आणि फी जमा करा.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
  • फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Railway recruitment 2022 for 10th 12th pass candidate apply rmt