भारतीय स्टेट बँक (SBI) ने विशेषज्ञ अधिकारी (SO) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय स्टेट बँक भरती २०२१ साठी sbi.co.in वर १८ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रक्रियेद्वारे एकूण ६०६ पदांची भरती केली जाईल. ज्यात रिलेशनशिप मॅनेजरची ३१४ पदे, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) ची २० पदे, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हची २१७ पदे, गुंतवणूक अधिकाऱ्याची १२ पदे, सेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) ची २ पदे, सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) २ पदे, व्यवस्थापक (विपणन) ची १२ पदे, उपव्यवस्थापक (विपणन) ची २६ पदे आणि कार्यकारी पदाची १ पद आहेत.

फ्रेशर्सला नोकरीची संधी देणाऱ्या देशातील Top 5 शहरांमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश

अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवी / पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय २३ वर्षे ते ३५ वर्षे दरम्यान असावे. तर, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) पदासाठी २८ वर्षे ते ४० वर्षे, ग्राहक संबंध कार्यकारी साठी २० वर्षे ते ३५ वर्षे आणि गुंतवणूक अधिकारी साठी २८ वर्षे ते ४० वर्षे तर व्यवस्थापक (विपणन) साठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे, उपव्यवस्थापक (विपणन) साठी ३५ वर्षे आणि कार्यकारी पदासाठी ३० वर्षे आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

MbPT Recruitment: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांसाठी भरती; पगार २,६०,००० रुपये

स्टेट बँक ऑफ इंडिया नोकरी इच्छुक १८ ऑक्टोबर पर्यंत अधिकृत वेबसाइट sbi.co.in/careers किंवा bank.sbi/careers द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी त्यांची पात्रता तपासली पाहिजे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर तपासा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi recrutment 2021 sarkari nokriya apply online on website last date 18 october current openings careers ttg
First published on: 29-09-2021 at 12:44 IST