राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षांसाठी घेण्यात येणाऱ्या मार्गदर्शन सत्रात प्रवेशासाठी पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
राज्यातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती. गोंडवना विद्यापीठ, गडचिरोली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.  स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, पुणे.
उपलब्ध जागांची संख्या व तपशील : वर नमूद केलेल्या मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्रावरील प्रवेशजागा प्रत्येकी २५ असून, एकूण उपलब्ध जागांपैकी ३० टक्के जागा अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारांसाठी तर ३ टक्के जागा अपंग विद्यार्थी- उमेदवारांसाठी राखीव आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : या संदर्भात अधिक माहितीसाठी ट्रायबल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, पुणेची प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी. इन्स्टिटय़ूटच्या दूरध्वनी क्र. ०२०- २६३६००२६ वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या http//:trti.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ५ ऑक्टोबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.