महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डात सिव्हिल इंजिनीअर्ससाठी १५ जागा :
अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना इंग्रजी आणि मराठीचे चांगले ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी व तपशिलासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या www.mahammb.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, मुंबई इंडियन र्मकटाइल चेंबर्स-तिसरा मजला, रामजीभाई कामानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०१२.
सैन्यदलाच्या खानपान विभागात अधिकारीपदाच्या ५ जागा :
अर्जदारांनी बारावीची परीक्षा हिंदी व इंग्रजी या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी त्यानंतर कॅटरिंग/ हॉटेल मॅनेजमेंटमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ सप्टेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी.
महाराष्ट्रातील अर्जदारांनी संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज हेडक्वार्टर्स-रिक्रूटिंग झोन, ३, राजेंद्रसिंहजी मार्ग, पुणे ४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०१२.
असम रायफलमध्ये कारकुनांच्या ३२८ जागा :
अर्जदारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट तर इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनीट पात्रता उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली असम रायफलची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टोरेट जनरल, असम रायफल (रिक्रूटमेंट सेल) लेतुमखर पोस्ट, शिलाँग, मेघालय ७९३०११ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१२.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १५ संशोधनपर फेलोशिप्स :
अर्जदारांनी केमिस्ट्री, अलाईड केमिस्ट्री, बॉटनी, प्राणीशास्त्र, लाईफ सायन्सेस, बायो-सायन्सेस, मायक्रोबायोलॉजी यासारख्या विषयांत एम.एस्सी. अथवा पर्यावरणशास्त्र वा सार्वजनिक आरोग्य यासारख्या विषयातील बीई/ बीटेक पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असायला हवी व त्यांना संबंधित विषयातील संशोधनपर कामाचा सुमारे दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३२ वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ ऑक्टोबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची जाहिरात पाहावी अथवा मंडळाच्या www.cpcb.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (रिक्रूटमेंट), सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, परिवेश भवन, इस्ट अर्जुननगर, शहादरा, दिल्ली ११००२३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१२.
आयुध निर्माणी- इटारसी येथे फायरमनच्या १० जागा :
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांच्याजवळ अवघड वाहन चालविण्याचा परवाना असावा व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी-इटारसीची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, इटारसी (मप्र) येथे पाठविण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१२.
न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (हेल्थ फिजिक्सच्या) २५ जागा : अर्जदारांनी फिजिक्स वा अप्लाईड फिजिक्समधील एमएस्सी पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनच्या www.upcilcareers.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१२.
दिल्ली पोलीस दलात हातांचे ठसे पडताळणी विभागात सबइन्स्पेक्टरच्या २१ जागा :
अर्जदारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र व अँथ्रॉपॉलॉजी यासारख्या विषयांसह बीएस्सी पदवी घेतलेली असावी अथवा बारावीनंतर हातांचे ठसे पडताळणी विषयक पदविका पूर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ ऑक्टोबर- २ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली दिल्ली पोलीस दलाची जाहिरात पाहावी अथवा दिल्ली पोलीस दलाच्या www.delhipolice.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ८०२०, दिल्ली ११००३३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०१२.
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2012 रोजी प्रकाशित
रोजगार संधी
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डात सिव्हिल इंजिनीअर्ससाठी १५ जागा : अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना इंग्रजी आणि मराठीचे चांगले ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा ३५ वर्षे.

First published on: 14-11-2012 at 01:44 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Self employment