SSC Phase 10 Recruitment 2022: कर्मचारी निवड आयोगाने केंद्रीय विभागांमधील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण २०६५ रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे. ही भरती एस एस सी द्वारे निवड पोस्ट फेज-१० अंतर्गत करण्यात आली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १२ मे २०२२ पासून सुरू झाली आहे. उमेदवार १३ जून २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. वयोमर्यादा आणि या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

(हे ही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील)

निवड प्रक्रिया

परीक्षेसाठी अर्जदारांची निवड केली जाईल. परीक्षा CBT मोडमध्ये अर्थात कम्प्युटर बेस टेस्ट असेल.

(हे ही वचा: SBI Jobs 2022: विविध पदांसाठी भरती! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज)

‘या’ तारखा लक्षात ठेवा

अर्जप्रक्रिया सुरू होण्याची तारीख – १२ मे २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जून २०२२

अर्ज बदलण्याची तारीख – २० जून ते २४ जून २०२२

परीक्षेची तारीख – ऑगस्ट २०२२ (संभाव्य)

असा करा अर्ज

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.
  • मुख्यपृष्ठावर दिलेल्या लॉगिन विभागात क्लिक करा.
  • आता विनंती केलेली माहिती टाकून नोंदणी करा.
  • आवश्यक शैक्षणिक दस्तऐवज अपलोड करा.
  • अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
  • शेवटी सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या.

अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.