आपण खरंच ओळखतो का
स्वत:ला; अगदी डोळसपणे..
एक ‘माणूस’ म्हणून.
स्वत:मधल्या क्षमता नि उणिवा
ठाऊक असतात का ठळकपणे..?
कसे जगतो? वागतो? बोलतो?
याचा बारकाईनं विचार करतो का?
जगण्याविषयी.. समष्टीविषयी
तटस्थपणे अवलोकन करतो का?
काय गमावलं नि काय गवसलं
यासंदर्भात गोळाबेरीज करतो का?
निसर्ग आणि समाज यांच्यातलं
नातं जपतो का सजगतेनं?
आपण स्वत:विषयी अनभिज्ञ असतो.
माणूस असण्याचं मोल आणि
वेगळेपण ना कधी जाणून
घेतलेलं असतं? ना कुणी नीट
समजावून दिलेलं असतं.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी
स्वत:ला नीट ओळखणं..
पारखणं; सर्वात महत्त्वाचं असतं,
मानवी इतिहासामध्ये स्वतंत्र
‘व्यक्तित्व’ लाभलेली प्रत्येक
व्यक्ती ही एकमेव, अद्वितीय
आणि जगावेगळी असते.
प्रत्येकाचं जगणं, दिसणं, वागणं,
बोलणं आणि शिकणं वेगळंच असतं.
only one nothing none.