North Eastern Railway Recruitment 2023 : रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे उत्तर पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ११०४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२३ आहे. उत्तर पूर्व रेल्वे भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
उत्तर पूर्व रेल्वे भरती २०२३ –
पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी).
एकूण रिक्त पदे – ११०४
शैक्षणिक पात्रता –
५० टक्के गुणांसह १० वी पास + संबंधित विषयात ITI.
हेही वाचा- पदवीधर आणि डिप्लोमा उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! NIV अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १५ ते २४ वर्षे.
- ओबीसी – ३ वर्षे सूट.
- मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
नोकरीचे ठिकाण – उत्तर पूर्व रेल्वे.
अधिकृत वेबसाईट – https://ner.indianrailways.gov.in/
अर्ज फी –
- खुला प्रवर्ग – १०० रुपये.
- राखीव/ महिला/ PWD – फी नाही.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहीरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1ig6N6UbPERTUnPhphfEii1QYtnOXUJHo/view
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २५ नोव्हेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ डिसेंबर २०२३
सूचना – अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.