scorecardresearch

Premium

१० वी पास, ITI ते पदवीधर उमेदवारांना AIASL मध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदांच्या ८२८ जागांसाठी भरती सुरु

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहीती जाणून घेऊया.

AIASL Recruitment 2024
एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत, ‘डेप्युटी मॅनेजर रॅम्प/ मेंटेनेंस, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर, ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर, ड्यूटी मॅनेजर-कार्गो, ड्यूटी ऑफिसर/ज्युनियर ऑफिसर -कार्गो, सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव’ या पदांच्या जवळपास ८२८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहीती जाणून घेऊया.

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२४ –

Job after study crucial for women not marriage say youth in UNICEF surve
शिक्षणानंतर महिलांना लग्न नव्हे नोकरीच वाटतेय महत्त्वाची; बदलता सामाजिक ट्रेंड सर्वेक्षणातून स्पष्ट
Thane Municipal Corporation Recruitment 2024
TMC Recruitment 2024: ठाणे महापालिकेत २८९ जागांसाठी भरती; पगार 1 लाखापर्यंत, जाणून घ्या Details
mumbai municipal corporation marathi news, umbai municipal corporation fd break marathi news,
विश्लेषण : ‘एफडी’ मोडण्याची वेळ मुंबई महापालिकेवर का आली? राखीव निधीचा वापर योग्य की अयोग्य?
CAPF
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांनाही प्रोत्साहन, प्रसूती रजेसह ‘या’ सुविधाही मिळणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर रॅम्प/ मेंटेनेंस, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर, ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर, ड्यूटी मॅनेजर – कार्गो, ड्यूटी ऑफिसर/ज्युनियर ऑफिसर -कार्गो, सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव.

एकूण रिक्त पदे – ८२८

शैक्षणिक पात्रता –

डेप्युटी मॅनेजर रॅम्प/ मेंटेनेंस : पदवीधर + १८ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + १८ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी/ MBA + १५ वर्षे अनुभव.

ड्यूटी मॅनेजर- रॅम्प : पदवीधर + १६ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.

ज्युनियर ऑफिसर टेक्निकल : मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + HMV.

रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव : मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/ AC/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर विषयात ITI/ NCVT + HVM.

यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : १० वी पास + HVM.

ड्यूटी मॅनेजर – पॅसेंजर : पदवीधर + १६ वर्षे अनुभव.

ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर : पदवीधर + १२ वर्षे अनुभव.

ड्यूटी मॅनेजर – कार्गो : पदवीधर + १६ वर्षे अनुभव.

ड्यूटी ऑफिसर – कार्गो : पदवीधर + १२ वर्षे अनुभव.

ज्युनियर ऑफिसर – कार्गो : पदवीधर + १२ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA + ६ वर्षे अनुभव.

सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर + ५ वर्षे अनुभव.

कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर.

हेही वाचा- ‘या’ उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – ५०० रुपये.
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक – फी नाही.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
  • ओबीसी – ३ वर्षे सूट.
  • मागासवर्गीय -५ वर्षे सूट.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

अधिकृत बेवसाईट –

https://www.aiasl.in/

मुलाखतीचे ठिकाण – GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-२, गेट क्रमांक ५, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – ४०००९९

मुलाखतीची तारीख –

  • मुलाखतीची सुरवात – १८ डिसेंबर २०२३ सकाळी ९ पासून.
  • मुलाखतीचा शेवट – २३ डिसेंबर २०२३ दुपारी १२ पर्यंत.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1V4U9wx4E9yF_5CcP_LsPDhvLrUtLg-Kg/view

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 10th pass iti to graduate candidates job opportunity in air india air services limited recruitment started for 828 posts of these posts jap

First published on: 08-12-2023 at 11:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×