कृषी शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेचा विचार करता आपल्या महाराष्ट्रातील सीईटी मधील मार्कच्या टक्केवारीवर प्रवेश दिला जातो. त्याचप्रमाणे ठएएळ व खएए या प्रवेश प्रक्रियेच्या टक्केवारीवरसुद्धा प्रवेश दिला जातो.

● अतिरिक्त गुणांची बेरीज

कृषी प्रवेश पात्रता ग्राह्य धरत असताना जर विद्यार्थ्यांला बारावीला कृषी व्होकेशनल विषय असेल तर त्याचे १२ अतिरिक्त गुण ग्राह्य धरतात.

● सातबारा खाते उतारा यांचा भारांक

जर विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असेल तर त्याच्या वडिलांच्या किंवा आईच्या नावावर जमीन ग्राह्य धरून त्याची सीईटी मार्कवर अतिरिक्त १२ गुणांचा भारांक ग्राह्य धरतात.

● इतर भारांक

१.खेळाचे गुणपत्रक – २ भारांक

२.जमीन नसलेल्या विद्यार्थ्यास – शासकीय अतिरिक्त कोटा

परंतु सर्वांचा विचार करता विद्यार्थ्यांच्या सीईटी मार्कवर जास्तीत जास्त २० भारांक वाढवला जातो. म्हणजेच विद्यार्थ्याला सीईटीला ८० गुण असतील व तो विद्यार्थी शेतकरी असेल तर त्याचे १२ व व्होकेशनल विषय असेल तर त्याचे १२ परंतु जास्तीत जास्त २० वाढवले जातात म्हणून ८० अधिक २० म्हणजेच त्या विद्यार्थ्याला १०० गुणांक किंवा मार्क या आधारावर प्रवेश दिला जातो.

● प्रवेश वाटपाची कार्यपद्धती

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद व महाराष्ट्र प्रवेश नियामक मंडळ सर्व शासकीय आरक्षण विचारात घेऊन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये अंतर्गत (कॅप) जागांचे वाटप करते. केंद्रीभूत प्रक्रिये दरम्यान (कॅप) जागेचे वाटप झालेले असल्यास (सदर जागा वाटप प्रवेश नियामक मंडळ करते) जागा स्वीकारण्यासंदर्भात उमेदवाराला प्रवेश पात्रात नमूद केल्याप्रमाणे जागा वाटपाच्या जागेवर किंवा नंतरच्या फेऱ्यांमध्ये महाविद्यालयांना फ्रीझ, फ्लोट जागा वाटप नाकारणे किंवा स्वीकारणे या विकल्पाची निवड करून प्रवेश प्रक्रिया करता येईल.

● फ्रीझ

उमेदवार त्यांना देऊ केलेली जागा स्वीकारतील आणि त्यांना जागा वाटपाच्या पुढील कोणत्याही फेऱ्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा असणार नाही अशा, अशा उमेदवारांचा नंतरच्या प्रवेश फेऱ्यामध्ये विचार केला जाणार नाही.

● फ्लोट

उमेदवार त्यांना देऊ करण्यात आलेली जागा स्वीकारतील आणि वरच्या पसंती क्रमाच्या इतर कोणत्याही महाविद्यालयांमध्ये प्रवेश देऊ करण्यात आला तर तो स्वीकारतील असा निर्देश करतील. ज्या उमेदवारांनी फ्लोट हा पर्याय निवडलेला असेल आणि ज्यांना, दुसऱ्या प्रवेश वाटप फेरीद्वारे वरच्या पसंती क्रमाचे त्यांच्या निवडीचे महाविद्यालय मिळाले असेल, अशावेळी त्या उमेदवारांनी अगोदरच्या फेरीमध्ये स्वीकारलेली महाविद्यालय ते आपोआप गमावतील.

तसेच फ्लोट पर्याय निवडलेल्या उमेदवारांनी दुसऱ्या प्रवेश वाटप फेरीसाठी नव्याने पसंती क्रम दिल्यास त्यांचे पहिल्या प्रवेश फेरीचे वेळी दिलेले महाविद्यालयाचे पसंतीक्रम विचारात घेतले जाणार नाहीत. आणि नवीन पसंतीक्रमामधील कोणत्याही महाविद्यालयाचे वाटप झाल्यास अगोदरच्या फेरीमध्ये स्वीकारलेले महाविद्यालय ते आपोआप गमावतील.

महाविद्यालयामध्ये उपस्थित राहून प्रवेश कायम करणे:

केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे (कॅप) मिळालेला प्रवेश कायम करण्याकरिता, उमेदवाराने त्यास वाटप केलेल्या महाविद्यालयांमध्ये वेळापत्रकात नमूद केलेल्या कालावधीत उपस्थित राहून आवश्यक ती मूळ कागदपत्रे आणि प्रथम सत्राची आवश्यक ते शैक्षणिक शुल्क महाविद्यालयाकडे जमा करावे. याबाबत महाविद्यालयाने, उमेदवारास रितसर पावती द्यावी.

● प्रवेश रद्द करणे

● ऑनलाइन प्रवेश फेऱ्यांद्वारे प्रवेशाची वाटप झालेल्या उमेदवाराने वेळापत्रकात नमूद केलेल्या कालावधीत संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून मूळ कागदपत्रे व आवश्यक ते शुल्क भरल्यानंतर, प्रवेश रद्द करण्याची सुविधा उमेदवाराच्या लॉगइन मध्ये उपलब्ध असेल.

● उमेदवार प्रवेश रद्द करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करील आणि प्रवेश रद्द करण्यासाठी असलेल्या प्रणालीनिर्मित अर्जाची स्वाक्षरीत प्रत संस्थेला सादर करील.

कागदपत्राची पूर्तता, शैक्षणिक शुल्क, शासकीय महाविद्यालयाचा कट ऑफ, खासगी महाविद्यालयाचा कट ऑफ याविषयीची माहिती आपण पुढील लेखात पाहूया.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sachinhort.shinde@gmail.com