सुहास पाटील
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली एक्झामिनेशन सेक्शनमार्फत सहयोगी अककटर मधील नॉन-फॅकल्टी ग्रुप-बी आणि ग्रुप-सी पदांच्या भरतीकरिता ‘कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन फॉर AIIMS (CRE- AIIMS)’ घेणार आहे. एकूण रिक्त पदे – ३,०३६ (एकूण १०० वेगवेगळ्या संवर्गातील पदे). देशभरात अककटर, दिल्लीच्या एकूण १४ ठिकाणी सहयोगी संस्था आहेत. जसे की, अककटर, नागपूर (महाराष्ट्र); भोपाळ (मध्य प्रदेश); बिबीनगर (तेलंगणा); जोधपूर (राजस्थान); मंगलागिरी (आंध्र प्रदेश) इ.
महाराष्ट्र आणि जवळच्या राज्यांमधील AIIMS च्या सहयोगी संस्थांमधील एकूण १०० वेगवेगळ्या रिक्त पदांचा तपशील –
(१) असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर – भोपाळ – २ पदे, बिबीनगर – १, मंगलागिरी – १, नागपूर – २.
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण. इष्ट पात्रता – (i) एमबीए/ मॅनेजमेंटमधील पीजी डिप्लोमा, (ii) गव्हर्न्मेंट रूल्स अॅण्ड रेग्युलेशनचे ज्ञान, (iii) संगणकावरील प्रभुत्व.
(२) असिस्टंट डायटिशियन – नागपूर – २ पदे.
हेही वाचा >>> पदवीधरांना नोकरीची मोठी संधी! केंद्रीय गुप्तचर विभागात ‘या’ पदासाठी भरती सुरू
पात्रता : एम.एस्सी. (फूड अॅण्ड न्यूट्रिशन) आणि मोठ्या टिचिंग हॉस्पिटलमधील २ वर्षांचा अनुभव.
(३) असिस्टंट लॉन्ड्री सुपरवायझर – भोपाळ – ४ पदे, जोधपूर – ४.
पात्रता : (i) १२ वी उत्तीर्ण, (ii) ड्राय क्लिनिंग/ लॉन्ड्री टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा/ सर्टिफिकेट, (iii) मेर्केनाईज्ड लाँन्ड्रीमधील २ वर्षांचा अनुभव.
(४) कॅशियर – भोपाळ – १३ पदे, जोधपूर – ३.
पात्रता : (i) कॉमर्समधील किंवा समतूल्य पदवी आणि (ii) सरकारी संस्थेमधील अकाऊंट्स कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव आणि (iii) कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये प्राविण्य.
(५) कोडिंग क्लर्क/ मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन/ ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर/ ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर (रिसेप्शनिस्ट)/ मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन/ मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन (रेकॉर्ड क्लर्क) – भोपाळ – ४४ पदे, बिबीनगर – ५, जोधपूर – ३९, नागपूर – २, मंगलागिरी – २.
पात्रता : बी.एस्सी. (मेडिकल रेकॉर्ड) किंवा १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि मेडिकल रेकॉर्ड किपिंगमधील किमान ६ महिने कालावधीचा डिप्लोमा/सर्टिफिकेट आणि हॉस्पिटलमधील मेडिकल रेकॉर्ड किपिंगचा २ वर्षांचा अनुभव.
(६) डार्क रुम असिस्टंट ग्रेड- II – भोपाळ – ५ पदे, जोधपूर – ५. पात्रता – रेडिओग्राफी डिप्लोमा आणि १ वर्षाचा अनुभव.
(७) डायटेशियन – भोपाळ – ८ पदे, बिबीनगर – १.
पात्रता : एम.एस्सी. (होम सायन्स फूड अॅण्ड न्यूट्रिशन/ क्लिनिकल न्यूट्रिशन अॅण्ड डायटेटिक्स/ फूड सायन्स अॅण्ड न्यूट्रिशन/ फूड अॅण्ड न्यूट्रिशन डायटेटिक्स/ फूड सर्व्हिस मॅनेजमेंट अॅण्ड डायटेटिक्स) आणि ३ वर्षांचा २०० खाटांच्या हॉस्पिटलमधील अनुभव.
(८) डिसेक्शन हॉल अटेंडंट – जोधपूर – ८ पदे.
पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव किंवा १० वी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
(९) इलेक्ट्रिशियन – भोपाळ – ६ पदे, जोधपूर – ६.
पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण आणि (ii) इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट, (iii) इलेक्ट्रिकल सुपरवायझर सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी, (iv) HT आणि LT इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स चालविण्याचा/ देखभाल करण्याचा ५ वर्षांचा अनुभव.
(१०) हॉस्पिटल अटेंडंट ग्रेड- III (नर्सिंग ऑर्डर्ली)/ हॉस्पिटल अटेंडंट ग्रेड- III (स्टेचर Bearers) – भोपाळ – १०६ पदे, जोधपूर – १०६.
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि हॉस्पिटल सर्व्हिसेस कोर्स सर्टिफिकेट. इष्ट पात्रता : हॉस्पिटलमधील कामाचा अनुभव.
(११) ज्युनियर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट/ लोवर डिव्हिजनल क्लर्क/ ज्युनियर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट (LDC) – बिबीनगर – १२, मंगलागिरी – १४, नागपूर – १०, जोधपूर – २४.
पात्रता : (i) १२ वी उत्तीर्ण, (ii) कॉम्प्युटर टायपिंग स्किल टेस्ट नॉर्म्स ३५ श.प्र.मि. (इंग्रजी) किंवा ३० श.प्र.मि. (हिंदी), (iii) संगणक साक्षरता.
(१२) ज्युनियर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर/ ऑफिस असिस्टंट (N.S.)/ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (N.S.) – भोपाळ – ४३ पदे, बिबीनगर – ४, मंगलागिरी – ४, नागपूर – ४, जोधपूर – १०.
पात्रता : पदवी उत्तीर्ण आणि संगणकावरील प्रभुत्व.
(१३) स्टोअर किपर – भोपाळ – ९ पदे, बिबीनगर – ९, मंगलागिरी – ४, नागपूर – ४.
पात्रता : (i) पदवी उत्तीर्ण, (ii) मटेरियल मॅनेजमेंटमधील पोस्ट ग्रॅज्युएट पदवी/ पदविका किंवा मटेरियल्स मॅनेजमेंटमधील पदवी आणि ३ वर्षांचा स्टोअर हँडलिंगमधील अनुभव (शक्यतो मेडिकल स्टोअर्स).
(१४) ज्युनियर वॉर्डन (हाऊस किपर्स) – मंगलागिरी – २, नागपूर – २, जोधपूर – १०.
पात्रता : पदवी उत्तीर्ण आणि ज्युनियर वॉर्डन पदावरील किमान २ वर्षांचा अनुभव.
(१५) लॅब अटेंडंट्स ग्रेड- II – भोपाळ – ४१ पदे, जोधपूर – ४१.
पात्रता : १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी डिप्लोमा. इष्ट पात्रता – संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१६) मेनिफोल्ड टेक्निशियन (गॅस स्ट्युअर्ड)/ गॅस किपर – भोपाळ – ६ पदे, जोधपूर – ६.
पात्रता : १२ वी विज्ञान उत्तीर्ण आणि मेडिकल गॅस पाईप लाईन सिस्टीममधील २०० खाटांच्या हॉस्पिटलमधील किमान ५ वर्षांचा अनुभव.
(१७) मेकॅनिक (एअर कंडिशनिंग अॅण्ड रेफ्रिजरेशन) – भोपाळ – ६ पदे, जोधपूर – ६.
पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट, (iii) संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१८) मेडिको सोशल सर्व्हिस ऑफिसर ग्रेड- I – भोपाळ – ९ पदे, जोधपूर – १५.
पात्रता : एम.ए. (सोशल वर्क)/ MSW (मेडिकल सोशल वर्क स्पेशलायझेशनसह) आणि ५ वर्षांचा संबंधित कामाचा किमान २०० खाटांच्या हॉस्पिटलमधील अनुभव.
(१९) आर्टिस्ट (मॉडेलर)/ मॉडेलर (आर्टिस्ट) – भोपाळ – १४ पदे, जोधपूर – १४.
पात्रता : फाईन आर्ट्स/ कमर्शियल आर्ट्स/ मॉडेलिंगमधील डिप्लोमा/ सर्टिफिकेट आणि इलस्ट्रेशन आणि मॉडेलिंगमधील २ वर्षांचा अनुभव किंवा १० वी उत्तीर्ण आणि मेडिकल कॉलेजमधील संबंधित डिपार्टमेंटमधील ५ वर्षांचा अनुभव.
इष्ट पात्रता : ग्राफिक डिझाईनमधील पदवी. (शक्यतो एज्युकेशन, मीडिया आणि कम्युनिकेशनमधील पदवी.)
(२०) ऑफिस अटेंडंट ग्रेड- II – जोधपूर – २७ पदे. पात्रता – १० वी उत्तीर्ण किंवा आयटीआय समतूल्य.
(२१) पर्सोनल असिस्टंट (PA)/पर्सोनल असिस्टंट/ पीए टू प्रिंसिपल (एस) – भोपाळ – ६ पदे, बिबीनगर – १, जोधपूर – ४.
पात्रता : (i) पदवी उत्तीर्ण, (ii) स्किल टेस्ट नॉर्म्स १० मिनिटांचे डिक्टेशन १०० श.प्र.मि. वेगाने ट्रान्सक्रिप्शन – ४० मिनिटे इंग्लिश किंवा ५५ मिनिटे हिंदी.
इष्ट पात्रता : सेक्रेटरियल प्रॅक्टिस डिप्लोमा/ सर्टिफिकेट बोली/ लेखी इंग्रजी/ हिंदी भाषेवरील प्रभुत्व.
(२२) फार्मासिस्ट/ फार्मासिस्ट ग्रेड- II/ फार्मा केमिस्ट – भोपाळ – ३२ पदे, मंगलागिरी – ५, नागपूर – ५, जोधपूर – ३२.
पात्रता : फार्मसी डिप्लोमा आणि फार्मसी अॅक्ट, १९४८ अंतर्गत नोंदणी.
इष्ट पात्रता : ट्रान्सफ्युजन फ्लुईड मॅन्युफॅक्चरिंग/ टेस्टींग/ स्टोरेज कामाचा अनुभव.
(२३) सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रेड- II – भोपाळ – १८ पदे, जोधपूर – १८.
पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स (१ वर्ष कालावधीचा) उत्तीर्ण आणि किमान २०० खाटांच्या हॉस्पिटलमधील ४ वर्षांचा अनुभव.
(२४) सिनियर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट/ अप्पर डिव्हिजन क्लर्क – बिबीनगर – ५, जोधपूर – ३.
पात्रता : (i) पदवी उत्तीर्ण, (ii) संगणकावरील प्रभुत्व, (iii) स्किल टेस्ट नॉर्म्स – कॉम्प्युटर टायपिंग ३५ श.प्र.मि. इंग्लिश किंवा ३० श.प्र.मि. हिंदी.
(२५) सिनियर नर्सिंग ऑफिसर/ स्टाफ नर्स ग्रेड- I – भोपाळ – १२७ पदे.
पात्रता : बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा बी.एस्सी. (पोस्ट सर्टिफिकेट) आणि २०० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स ग्रेड- II वरील कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
(२६) स्टेनोग्राफर – बिबीनगर – ७, मंगलागिरी – ४, नागपूर – ४, जोधपूर – १३.
पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि स्किल टेस्ट नॉर्म्स डिक्टेशन १० मिनिटे ८० श.प्र.मि., ट्रान्सक्रिप्शन – ५० मिनिटे इंग्लिश किंवा ६५ मिनिटे हिंदी.
इष्ट पात्रता : हिंदी आणि इंग्लिश भाषेवर (लेखी/ बोली) प्रभुत्व.
(२७) स्टोअर अटेंडंट ग्रेड- II – जोधपूर – ८.
पात्रता : १० वी किंवा आयटीआय समतूल्य उत्तीर्ण. (उर्वरीत मजकूर उद्याच्या अंकात)