Air India Recruitment : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवार मुलाखतीकरिता हजर राहू शकता. आज आपण वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता मुलाखतीची तारीख आणि पत्ता याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव –

  • कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक (Junior Officer-Technical)
  • ग्राहक सेवा कार्यकारी (Customer Service Executive)
  • कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी (Junior Customer Service Executive)
  • रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह (Ramp Service Executive)
  • युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर (Utility Agent and Ramp Driver)
  • हँडीमन (Handyman)

पदसंख्या –

  • कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक (Junior Officer-Technical) – ०२
  • ग्राहक सेवा कार्यकारी (Customer Service Executive) – २१
  • कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी (Junior Customer Service Executive) – २१
  • रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह (Ramp Service Executive) – १८
  • युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर (Utility Agent Ramp Driver) – १७
  • हँडीमन (Handyman) – ६६

हेही वाचा : NIRRCH Mumbai recruitment 2024 : आयसीएमआर मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांवर होणार भरती

शैक्षणिक पात्रता –

  • कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक (Junior Officer-Technical) – बीइ/बीटेक
  • ग्राहक सेवा कार्यकारी (Customer Service Executive) – पदवीधर
  • कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी (Junior Customer Service Executive) – १२ पास डिप्लोमा
  • रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह (Ramp Service Executive) – आयटीआय डिप्लोमा
  • युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर (Utility Agent Ramp Driver) – दहावी
  • हँडीमन (Handyman) – दहावी

वयोमर्यादा – वरील पदांकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षे असावे.

पगार –

  • कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक (Junior Officer-Technical) – २९७६० रुपये/प्रति महिना
  • ग्राहक सेवा कार्यकारी (Customer Service Executive) – २४,९६० रुपये/प्रति महिना
  • कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी (Junior Customer Service Executive) – २१,२७० रुपये/प्रति महिना
  • रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह (Ramp Service Executive) – २४,९६० रुपये/प्रति महिना
  • युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर (Utility Agent Ramp Driver) – २१,२७० रुपये/प्रति महिना
  • हँडीमन (Handyman) – १८,८४० रुपये/प्रति महिना

अर्ज शुल्क – अर्ज भरण्यासाठी अर्ज शुक्ल ५००/- रुपये आहे.

निवड प्रक्रिया – पात्र उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल.

मुलाखतीचा पत्ता – खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी यावे. – मध्यवर्त एव्हिएशन ॲकॅडमी, 102 विनायक प्लाझा, डॉक्टर्स कॉलनी बुद्धसिंग पुरा, सांगानेर, जयपूर-302029.

मुलाखतीची तारीख – पदांनुसार ८ ते ११ मे २०२४ दरम्यान मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीला येताना अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे.

अधिकृत वेबसाइट – या भरती विषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर या https://www.aiasl.in/ या लिंकवर क्लिक करावे.

अधिसुचना – अर्ज भरताना किंवा मुलाखतीस येण्यापूर्वी https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20%20Jaipur%20Station.pdf या लिंकवरील अधिसुचना नीट वाचावी.