रोहिणी शहा

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या इतिहास घटकाचे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण व त्या अनुषंगाने अभ्यास करताना कोणते मुद्दे विचारात घ्यायचे याबाबत पाहू.

अभ्यासक्रम

‘महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ’

राज्यसेवा परीक्षा आणि मागीलवर्षी झालेली पहिली महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांतील इतिहास घटकावर विचारलेले प्रातिनिधिक प्रश्न पाहू.

प्रश्न १. खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा

१) विठोबाची शिकवण

२) कुलकर्णी लीलामृत

३) शेटजी प्रताप ४) शेतकऱ्यांचा आसूड

हेही वाचा >>> चौकट मोडताना : कौतुकाच्या आनंदापेक्षा भीतीच अधिक

प्रश्न २. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते?

अ. आर. डी. भंडारे ब. राजाभाऊ भोळे.

क. दादासाहेब रुपवते. ड. इल्तुतमिश.

वरीलपैकी कोणते विधान/ विधानेबरोबर आहेत?

१) फक्त अ, क आणि ड

२) फक्त अ, ब आणि क

३) फक्त अ, ब आणि ड

४) अ, ब, क, ड

प्रश्न ३.जोड्या जुळवा:

अ. परिक्षित i. अथर्ववेदातील प्रशस्तिकाव्याचा नायक.

ब. जनमेजय ii. पृथ्वी प्रदक्षिणेचे श्रेय दिले जाते

क. प्रवहण – जैवाली iii. प्रसिद्ध तत्वज्ञ

ड. जनक iv.याज्ञवल्क्याचे संरक्षक

पर्यायी उत्तरे

१) अ- iv, ब- iii, क- ii, ड- i

२) अ- iii, ब- iv, क- i, ड- ii

३) अ- i, ब- ii, क- iii, ड- iv

४)अ- ii, ब- i, क- iv, ड- iii

हेही वाचा >>> नोकरीची संधी : न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि. मधील संधी

प्रश्न ४. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला?

१) प्रतियोगी सहकारी पक्षाची स्थापना करावी.

२) विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये.

३) कनिष्ठ जाती कामगारांमध्ये भेदाभेद करू नये. तसेच ५० स्वयंसेवकांचे पथक उभारावे व हिंदू मुस्लीम ऐक्य राखावे.

४) मोतीलाल नेहरू व जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधान मंडळाचे सदस्य निश्चित करावे.

प्रश्न ५ खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा.

i. श्वेत पत्रिका

ii. पुणे करार.

iii. नेहरू अहवाल

iv. धारासना सत्याग्रह.

पर्यायी उत्तरे

१) iv, ii, iii, i २) iv, i, ii, iii

३) iii, iv, ii, i ४) ii, iii, iv, i

प्रश्न ६. खालील विधाने कोणासंदर्भात आहेत?

अ. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली.

ब. सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले.

क. बाल विवाह थांबविणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले.

ड. सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याबाबत दावा केला.

१) बाबर २) हूमायूं ३) अकबर ४) औरंगजेब

मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिकांच्या विश्लेषणातून पुढील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.

एकूण १५ प्रश्नांपैकी प्राचीन, मध्य युगीन व आधुनिक कालखंडासाठीची प्रश्न संख्या निश्चित नाही. त्यामुळे सर्व कालखंडांची तयारी गांभीर्याने करणे गरजेचे आहे. मात्र आधुनिक कालखंडातील भारतीय राष्ट्रीय चळवळीचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असल्याने याबाबतची तयारी जास्त बारकाईने करणे आवश्यक आहे.

प्राचीन इतिहासातील प्रश्नांमध्ये प्रागैतिहासिक इतिहासावरील प्रश्नांचाही समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक उत्खनन स्थळांवर भर देऊन भारतातील प्रागैतिहासिक इतिहासाचा आढावा घेणे पुरेसे ठरेल.

प्राचीन इतिहासाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. यातील वैदिक, उत्तर वैदिक आणि संगम साहित्यावर आणि सिंधु संस्कृतीतील पुरातात्विक अवशेष यांवर प्रश्न विचारण्याचा भर जास्त आहे.

मध्ययुगीन इतिहासाच्या सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक पैलूंवर भर असला तरीही राजकीय इतिहासावरही प्रश्नांचा समावेश लक्षणीय आहे. उत्तर व दक्षिण भारतातील स्थापत्य आणि शिल्प व दृष्यकलांचा आढावा घेणे उपयुक्त ठरते.

आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय चळवळ हा भाग अभ्यासक्रमामध्ये स्वतंत्रपणे विहीत केलेला आहे. त्यामध्ये १८५७च्या उठावापासूनच्या स्वातंत्र्य चळवळी आणि त्याकाळातील काँग्रेस सहसर्व राजकीय पक्ष, संघटना, क्रांतिकारी चळवळी यांचा विचार करण्यात आलेला दिसतो.

आधुनिक काळातील स्वातंत्र्य चळवळी व्यतिरिक्त देशातील समाज सुधारणा, सामाजिक संस्था संघटना, आर्थिक प्रगती यांबाबतही प्रश्न समाविष्ट आहेत.

महाराष्ट्रातील सांस्कृतिक घडामोडींवरही प्रश्न विचारले जात अहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राचीन आणि मध्य युगीन कालखंडातील राज्यकर्ते / इतिहासकार/ साहित्यकार आणि आधुनिक कालखंडातील समाजसुधारक आणि राजकीय व्यक्तिमत्वे यांवर बहुविधानी प्रश्न विचारलेले दिसतात. या विश्लेषणाच्या आधारावर या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी याबाबत पुढील लेखांमध्ये पाहू.